लग्नांमध्ये ‘ऑफिशियंट’ चा मानही प्रियांकाने दिला आईलाच…
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. प्रियांका आणि निक यांनी ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीत लग्न केले. या बहुचर्चित लग्नसोहळा राजस्थान मधील उमेद भवनमध्ये पार पडला. उमेद भवनच्या बॅक लॉनवरील ख्रिश्चन पद्धतीतील लग्नसोहळयाचा एक अतिशय सुंदर व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आईने एकटीने निभावल्या साऱ्या जबाबदाऱ्या
ज्या व्हिडीओ मध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न लागताना प्रियांका तिच्या आईसोबत लग्नमंडपामध्ये आली.वास्तविक ख्रिश्चन धर्मामध्ये या विधीचा मान हा नववधूच्या वडिलांचा असतो. बापलेकीचं नाते हे जगातील अतूट नातं आहे. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे जगातील सर्वात प्रिय व्यक्ती असतात.लग्नासारख्या हळव्या क्षणी तर नववधूला तिच्या वडिलांचा आधाराची जास्त गरज असते.म्हणूनच कदातिच ख्रिस्ती धर्मातील लग्नात ही पद्धत रुढ झाली असावी. मात्र 2013 साली प्रियांकाच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे प्रियांकाच्या लग्नात हा विधी तिच्या वडिलांकडून करणे शक्य नव्हते. मात्र पॉवरगर्ल प्रियांकाने हा मान तिच्या आईला म्हणजेच मधु चोप्रा यांना दिला.
प्रियांकांच्या आईने निवडलं वेडिंग डेस्टीनेशन
हिंदू पद्धतीने पार पडलेल्या लग्नसोहळ्याची देखील संपूर्ण जबाबदारीदेखील तिच्या आईनेच स्वीकारली होती.प्रियांकाच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारीदेखील तिची आईच सांभाळते. सहाजिकच तिची आई ही तिच्यासाठी सर्वांत महत्वाची व्यक्ती आहे. तिच्या आईला जोधपुर फार आवडतं म्हणून प्रियांकाने डेस्टीनेशन वेडिगसाठी जोघपूरचं उम्मेद भवन पॅलेस निवडलं. 27 नोव्हेंबरला मधु चोप्रा स्वतः जोधपूरात लेकीच्या लग्नाची तयारी करण्यासाठी हजर होत्या. लेकीच्या लग्नासाठी त्यांनी उम्मेद भवन ज्या प्रकारे सजवलं ते पाहून सगळ्यांच्या डोळ्याचे पारणंच फिटलं.
तुम्हाला माहीत आहे का? प्रियांकाच्या आईने निवडलेलं ‘उम्मेद भवन पॅलेस’ म्हणजे राजा उम्मैद सिंह यांचा महाल आहे. सध्या हा महाल ताज हॉटेलच्या मालकीचा आहे. मधु चोप्रांनी हा पॅलेस 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत तब्बल 60 हजार डॉलर म्हणजेच 43 लाखाला बुक केला होता. प्रियांकाची मेंदी, संगीत आणि ख्रिस्ती व हिंदू पध्दतीतील लग्न सोहळा सारं काही या महालात दिमाखात साजरं झालं.
प्रियांका आणि निकच्या दिल्लीतील रिसेप्शनला मान्यवरांची उपस्थिती
#Nickyanka चं पहिलं रिसेप्शन नुकतंच दिल्लीला पार पडलं तर दुसरं रिसेप्शन मुंबईला होणार आहे. त्यांच्या दिल्ली रिसेप्शनला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उपस्थिती लावली होती. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या रिसेप्शनला उपस्थित राहत नवविवाहीत जोडप्याला शुभेच्छा दिल्या.
फोटो आणि व्हीडिओ सौजन्यः Instagram