ADVERTISEMENT
home / आपलं जग
बरी-वाईट स्वप्नं पडण्यामागची कारणे

बरी-वाईट स्वप्नं पडण्यामागची कारणे

रात्री झोपेत पडणारी स्वप्नं माणसाच्या हातात नसतात. स्वप्नं नेहमी विचार करत करत गाढ झोप लागण्याच्या आधीच्या अवस्थेत पडतात. ही ना धड जागृत अवस्था असते आणि ना धड निद्रिस्त अवस्था असते. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच वाईट स्वप्न पडू शकतात. कधी कधी एखाद्या स्वप्नामुळे आपण रात्रभर न झोपल्याची भावना मनात निर्माण होते. आपण आताच काही मिनीटांपूर्वी झोपलो आणि लगेच उठलो असे वाटू शकते. कधी कधी शेवाळावरून पाय घसरल्याचा भास होतो आणि आपण दचकून जागे होतो. त्यामुळे बऱ्याचदा स्वप्नं तुम्हाला घाबरवून उठवतात. काही स्वप्नं तर अंगावर घाम आणि छातीत धडधड निर्माण करतात. कधी स्वप्नात आपण राजे-महाराजे असतो आपल्या सेवेत हजारो माणसे आपल्या दिमतीला असतात तर कधी कधी जंगलात एखादा जंगली प्राणी आपल्या मागे लागलेला आहे असं दिसतं. त्यामुळे स्वप्नं कशी पडतात, स्वप्नं पडण्याची कारणे कोणती असतात अशा अनेक गोष्टींबाबत आपल्याला उत्सुकता लागलेली असते. थोडक्यात झोपेत पडणारी स्वप्नं ही एक गुढ आणि रहस्यमय गोष्ट आहे.
night-dreams

स्वप्नांतील जग हे एक अद्भूत आणि प्रतीसृष्टीप्र्माणे भासू शकते. शास्त्रीय दृष्या दिवसभर आपण नेणिवपूर्वक ज्या गोष्टींचा विचार करतो त्यांचा काहीसा भाग स्वप्नांमध्ये गुंतलेला असतो. आपल्या विचारांचा आपल्या स्वप्नांवरदेखील प्रभाव पडत असतो. जी माणसे सतत सकारात्मक विचार करतात, दिवसभर चांगल्या गोष्टींच्या सानिध्यात राहतात त्यांना भितीदायक स्वप्न कमी प्रमाणात पडतात. यासाठीच आपण काही भितीदायक आणि सुखावह स्वप्नं आणि त्यामागची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र हे केवळ अंदाज आहेत आणि समाजात निर्माण झालेले समज -गैरसमज आहेत. याबाबत कोणताही पुरावा सिद्ध करणे शक्य नाही. कारण स्वप्नांविषयी आजही अनेक संशोधने सुरूच आहेत. काहींच्या मते स्वप्न वायु आणि जल तत्वाच्या लोकांना अधिक प्रमाणात पडतात. काहीजण स्वप्नांच्या मागे तुमचे आचार, विचार आणि उच्चार कारणीभूत आहेत असं म्हणतात. तर काहीजणांच्या मते या मागे तुमच्या ग्रहांची दिशा आणि राशींचा प्रभाव असू शकतो. खरंतर स्वप्नं म्हणजे मनाची अशी एक अवस्था आहे ज्यामध्ये तुमचं मन एक आभासी जगत निर्माण करतं आणि त्यामध्ये रममाण होतं. कधी कधी काही स्वप्नं तुम्हाला भविष्यातील एखाद्या गोष्टीचे संकेतही देऊ शकतात.

काही स्वप्नं आणि त्याबाबत असलेले काही समज-गैरसमज

उंचावरून कोसळणे-

night-dreams 1

बऱ्याचदा स्वप्नात तुम्ही एखाद्या उंच ठिकाणावरून घसरल्याचा भास होतो. याचा अर्थ तुम्ही तुमच्या भविष्यकाळाचा अती विचार करत आहात असा सांगितला जातो. तर शास्त्रीयदृष्ट्या झोपेत रक्तप्रवाहाच्या गतीत बदल झाल्यामुळे तुम्हाला असा भास होतो असे सांगितले जाते. कारण काहिही असले तरी हे  स्वप्न तुम्हाला अनेकवेळा पडते आणि तुम्ही दचकून जागे होता हे मात्र नक्की.

ADVERTISEMENT

कोणीतरी पाठीमागे लागणे-

अनेकवेळा स्वप्नात आपण जोरजोरात धावत आहोत आणि आपल्या पाठीमागे कोणीतरी लागले आहे असे स्वप्नात दिसते. कधी कधी मागे वाघ लागलेला आहे, एखादी भयंकर व्यक्ती अथवा राक्षस मागे लागला आहे असे दिसते. तर कधीकधी कोणीही दिसत नाही आणि तरीही आपण वेगाने धावत असतो. झोपेतून दचकून जाग आल्यावर आपल्याला दरदरून घाम येतो, ह्रदयाची धडधड वाढते, घसा कोरडा झालेला जाणवतो. याचा झोपेत पडणाऱ्या स्वप्नांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे असं स्वप्न पडणं हे तुमच्या मानसिक अवस्थेचा एक भाग असू शकतं. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता सतावत असेल अथवा तुम्ही एखाद्या मानसिक ताण-तणावात असाल तर तुम्हाला अशी स्वप्न पडू शकतात.

साप दिसणे-

अनेकांना स्वप्नात सतत साप दिसण्याची समस्या असते. झोपेत आजूबाजूला साप रेंगाळत आहेत असं स्वप्नात दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनात गोंधळ आहे असा असतो. ज्यांना साप या प्राण्याची किळस वाटते त्यांना स्वप्नात साप दिसण्याची समस्या सतावत असते.

धनलाभ होणे-

अनेकांना स्वप्नात पैसे दिसतात. जमिनीखाली पुरलेले अथवा एखाद्या गुहेत संपत्तीचा साठा मिळाल्याची स्वप्ने अनेकांना पडतात. यामागे मनात सतत पैशांचा विचार करणे हे एक महत्त्वाचे कारण असू शकते. मात्र काही लोकांच्या मते यामागे स्वप्नात धन दिसणे हे गुड लक असून भविष्यात सुख, समृद्धी येणार असल्याचा तो एक संकेत असू शकतो.

देव-देवता दिसणे-

काही जणांना स्वप्नात देवाचे दर्शन घडते. अचानक प्रखर उजेड दिसू लागतो एखादी तेजस्वी मुर्ती अथवा देव-देवता दिसते. अशी स्वप्न नेहमीच शुभ असतात. कारण जे लोक सतत नामस्मरण करतात त्यांचे मन भगवंताच्या चरणी लीन झालेले असते. त्यामुळे अशा लोकांना अशी स्वप्न पडतात. स्वप्नात प्रकाश अशा देव-देवता दिसणे हे तुमच्या अध्यात्मिक प्रगतीचे एक लक्षण समजले जाते.

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य –  इ्न्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

22 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT