ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
नाक टोचल्यावर घ्यायची  काळजी

नाक टोचल्यास कशी घ्यायची काळजी, वापरा सोप्या टिप्स

हल्ली नाक टोचून घेणं (Nose piercing) हे परंपरेपेक्षाही स्टाईल म्हणून जास्त प्रमाणात दिसून येतं. अधिकांश पूर्व आशियाई देशांमध्ये नाक टोचणे ही परंपरा  आणि संस्कृती मानली जाते.  पण आजकाल आधुनिक दुनियेत सध्या नाक टोचणे ही एक फॅशन आणि स्टाईल म्हणून पाहिली गेली आहे. टोचलेले नाक आणि त्यात घातलेल्या नथ अथवा चमकी दिसायला खूपच सुंदर दिसतात पण नाक टोचताना होणारा त्रास आणि टोचल्यानंतर काही जणांना त्याचे बरेच परिणामही भोगावे लागतात.  पहिले एक ते दोन आठवडे खूपच त्रास होतो. त्यामुळे नाक टोचल्यानंतर काही प्रमाणात काळजी घ्यावी लागते. नाक टोचल्यावर नक्की कशी काळजी घ्यायची हे आपण या लेखातून पाहणार आहोत. आपल्याला नाक टोचल्यानंतर बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि ती कशी घ्यायची ते पाहूया. 

नाक टोचल्यानंतर ठेवा स्वच्छता

नाक टोचल्यानंतर त्याच्या आजूबाजूला नियमित स्वरूपात तुम्हाला स्वच्छता ठेवावी लागते. जोपर्यंत टोचलेले नाक दुखणे बंद होत नाही तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित स्वच्छता ठेवा अन्यथा त्यामध्ये पस होण्याची शक्यता असते. रोज कोमट पाण्याने त्यावर मसाज देऊ शकता अन्यथा संक्रमण होण्याचा धोकाही असतो. 

संक्रमणापासून वाचा

वास्तविक नाक टोचल्यानंतर आजूबाजूची त्वचा सुकते आणि त्यामुळे अधिक त्रास होतो आणि त्यामुळेच यामध्ये जंतूसंसर्ग अथवा संक्रमणाचा धोका अधिक असतो. त्यामुळे नाक टोचल्यानंतर तुम्ही अँटिबॅक्टेरियाल उत्पादनाचा वापर करा. जेणेकरून नाक लवकर सुकेल आणि कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन तुम्हाला होणार नाही. यावेळी तुम्ही तेलकट खाणं सहसा टाळा.  म्हणजे नाकाला जास्त त्रास होणार नाही. 

नाक स्वच्छ करताना वापरा सुती कपडे

नाक टोचलेल्या ठिकाणी स्वच्छ करत असताना अजिबात रफ कापडांचा वापर करू नका. त्याऐवजी टिश्यू पेपर, पेपर टॉवेल अथवा शुद्धी सुती कपड्यांचा अर्थात कॉटनच्या कपड्यांचा वापर करा. सतत नाकाला हात लाऊ नका. त्यापेक्षा त्रास होत असेल अथवा नाकातून अचानक रक्त आल्याचं जाणवलं तर ते सुती कपड्यानेच स्वच्छ करा आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर योग्य त्या मलमाचा वापर करा. तसंच तुम्हाला नाक टोचलेल्या ठिकाणी खाज येत असेल अथवा त्रास सहन करणे कठीण होत असेल तर तसे करू नका. थोडेसं सहन करा आणि जर अगदीच त्रास होत असेल तर त्याठिकाणी सुती कापडाने स्पर्श करून हळूवार नाक स्वच्छ करा. 

ADVERTISEMENT

या दिवाळीसाठी वापरा खास आकर्षक दागिने, निवड करा अशी

नाक टोचल्यावर लावा लव्हेंडर ऑईल

Shutterstock

नाक टोचल्यानंतर काही जणांना खूपच त्रास होतो.  मग अशावेळी तुम्ही लव्हेंडर ऑईलचा वापर करा आणि त्यामुळे तुम्ही  नाकाजवळील लालसरपणा कमी करू शकता. यामुळे तुमच्या नाकाचा होणारा त्रासही कमी होतो आणि नाक सुजतही नाही. तसंच तुम्ही यासाठी विटामिन बी चा देखील प्रयोग करू शकता आणि नाकाच्या आजूबाजूला त्रास कमी करण्यासाठी याचा वापर करू शकता. 

ADVERTISEMENT

नाकाचे सौंदर्य खुलवायचे, तर नक्की करा असा प्रयोग

जबरदस्ती नाकातील रिंग ओढू नका

नाक टोचल्यावर सहसा धातूची मऊ आणि मुलायम तार सहसा नाकात घातली जाते. पण काही जण नाकात रिंग घालतात. मग अशा वेळी तुम्ही ही रिंग सतत ओढत राहिल्यास तुम्हाला नाकाला त्रास होऊ शकतो. अन्यथा ही खेचल्यामुळे नाकामध्ये पस अथवा सूज,  संक्रमण अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे शक्यतो असं करणं टाळा. तसंच यावर त्वरीत विटामिन बी युक्त सप्लिमेंटचा वापर करा.  जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही.  

‘नथ’ घातल्याशिवाय महाराष्ट्रीयन साजशृंगार अपूर्ण, पाहूया सध्याचा Trend

नाक टोचल्यावर घ्या अशी काळजी आणि करा नाकाची सुरक्षा

नाक टोचल्यावर तुम्ही काय आणि कशी काळजी घ्यायची हे महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स – 

ADVERTISEMENT
  • नाक टोचल्यावर तुम्ही ओव्हर द काऊंटर अँटिसेप्टिक अर्थात नियोस्पोरिन लाऊ नका. तुम्हाला नाक टोचल्यावर इन्फेक्शनचा त्रास झाला तर मीठाच्या  पाण्याने नाक धुवा आणि डॉक्टरांकडूनही सल्ला घ्या
  • कधीही हायड्रोजन पॅराक्साईडचा उपयोग करू नका अन्यथा नाकाला जळजळ आणि खाज येऊ शकते 
    खराब हात नाकाला अजिबात लाऊ नका 
  • दुसऱ्याची वापरलेली नोजरिंग अर्थात नाकातले अजिबात वापरू नका 
  • टोचलेल्या नाकात जबरदस्तीने रिंग घालू नका. अगदी हळूहळू रिंग घाला आणि तेदेखील क्लॉकवाईज पद्धतीने घाला 
    नाकात जी रिंग अथवा चमकी घालणार आहात त्याचा दर्जा  चांगला आहे की नाही ते बघूनच घाला. अलर्जिक रिअॅक्शन होऊ नये याची काळजी घ्या 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT