भावना मांडण्यासाठी शब्दांचा आधार घेणं गरजेचं असतं. कारण शब्दातून तुमच्या मनातील भावना समोरच्याला पटकन समजतात. पण यासाठी खूप लिहणं नक्कीच गरजेचं नाही. मोजक्या आणि कमी शब्दातही आपण आपल्याला काय बोलायचं आहे हे सांगू शकतो. आजकाल मनातील भावना मांडण्याचे मुक्त ठिकाण म्हणजे सोशल मीडिया… सोशल मीडियावर आपण आपल्या भावना शब्दांतून बिनधास्तपणे मांडू शकतो. यासाठीच आजकाल प्रत्येकाच्या प्रोफाइलवर स्टेट्स ठेवण्याचा ट्रेंड आहे. व्हॉट्स अप, फेसबूक, ट्विटर अथवा इन्स्टाग्रामवर तुम्ही तुमच्या भावना लिहून स्टेट्स अपडेट करू शकता. ज्यामुळे तुमच्या मनात काय सुरू आहे याची तुमच्या प्रियजनांना, जवळच्या लोकांना आणि तुम्हाला फॉलो करणाऱ्या फॉलोव्हर्संना जाणीव होते. तुम्हालाही अगदी कमी शब्दात म्हणजेच एका ओळीत तुमच्या भावना मांडायच्या असतील. तर तुमच्या प्रोफाइलवर अपडेट करा हे वन लाइन स्टेटस – One Line Status in Marathi… यासोबत वाचा आयुष्यावरील स्टेटस | Marathi Status On Life, मराठी स्टेटस नाती | Relationship Quotes In Marathi, भावनिक आठवण कोट्स मराठी | Emotional Athavan Quotes In Marathi
व्हॉट्सअपसाठी शॉर्ट वन लाइन स्टेटस – Short One Line Whatsapp Status
आजकाल व्हॉट्सअप हे संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे व्हॉट्सअपच्या माध्यामातूनही तुम्ही या वन लाइन स्टेटस – One Line Status in Marathi मधून तुमच्या भावना इतरांना सांगू शकता.
1.आम्ही मराठी मुली दिसतोच सुंदर
2. स्वतःची चूक कळली की अनर्थ टळतात
3. आयुष्य एक उत्सव आहे तो रोज साजरा करा
4.काही गोष्टी बोलून नाही करून दाखवायच्या असतात
5.विचार बदला नशिब बदलेल – सदगुरू श्री वामनराव पै
6. माणूस कर्माने महान ठरतो जन्माने नाही
7. हजार वेळा ठेच लागल्यावरच चांगलं चरित्र निर्माण होतं – स्वामी विवेकानंद
8. कोणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका – महात्मा गांधी
9. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे – महात्मा फुले
10. स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी आधी ती पहावी लागतात – डॉ. एपीजे अब्दुल कलाम
वन लाइन स्टेटस व्हॉट्सअपसाठी – Whatsapp Marathi Status in One Line
व्हॉट्सअपवर फोटो आणि स्टेटस ठेवून तुम्ही तुमचं प्रोफाइल अपडेट करू शकता. यासाठी शेअर करा हे वन लाइन स्टेटस – One Line Status in Marathi
1. एखाद्याला हरवणं सोपं आहे पण जिंकणं कठीण
2. बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य मोलाचे आहे
3. ध्येय जितकं मोठं तितकंच आव्हानात्मक असतं
4. शुन्यापुढे एक होऊन उभे राहा त्याची किंमतपण वाढेल
5. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील ‘वादळं’च जास्त मोठं असतं
6. माणसाला दोनच गोष्टी हुशार करतात, एक वाचलेली पुस्तकं आणि भेटलेली माणसं
7.एखाद्याला अडचणीत जपाल तर तो तुम्हाला आयुष्यभर जपेल
8. माणूस पैशाने नाही मनाने मोठा असायला हवा
9. उंच ध्येय गाठण्यासाठी झेपदेखील तितकीच मोठी हवी
10. आयुष्यात एक छोटा बदल पण यशाकडे टाकलेलं एक पाऊल असू शकतो.
वन लाइन स्टेट्स इन्स्टाग्रामसाठी – One Line Status for Instagram Caption
इन्टाग्रामवर खूप कमी शब्दात व्यक्त व्हावं लागतं. कारण हे फोटोज शेअर करण्याचं प्रभावी माध्यम आहे. मात्र या मीडियावरही प्रोफाइल आणि फोटोसोबत तुमचं स्टेटस अपडेट करण्यासाठी बेस्ट आहेत हे वन लाइन स्टेटस – One Line Status in Marathi
1. ज्याच्या असण्याला अर्थ असतो त्याच्यात नसण्याची पोकळी जाणवते – व. पु. काळे
2. ज्याच्याजवळ सावरण्याची शक्ती असते त्याला कोणाला आवरत बसण्याची गरज नसते
3.संवादाचे दुसरे नाव म्हणजे मित्र – व. पु. काळे
4. माणसाचे केस गेलेले असतील तरी चालतील, पण माणूस गेलेली केस असू नये – पु. लं. देशपांडे
5. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येतं
6. लग्न अशी जखम आहे जी होण्याआधीच हळद लावतात
7.श्रीमंतीचा साज असावा पण संपत्तीचा माज नसावा
8. जिथे आईसोबत असते तिथे साक्षात देव सोबत असतो
9. तुम्हाला खाली खेचणारे लोक तुमच्यापेक्षा खालच्या पायरीवरच असतात
10. हक्क मागून मिळत नसतील तर ते मिळवावे लागतात
प्रेमासाठी वन लाइन स्टेटस – Whatsapp Status in Marathi Love One Line
प्रेमात पडल्यावर तुमच्या पार्टनरला आणि समाजाला तुमच्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी स्टेटस अपडेट करण्याचा विचार करत असाल तर हे वन लाइन स्टेटस – One Line Status in Marathi नक्कीच फायद्याचे आहेत.
1. एकत्र राहायला अक्षता लागत नाहीत अंडरस्टॅंडिंग लागतं – व. पु. काळे
2. तू हे बरं असतं, थोडंसं रडतेस आणि बाकी सर्व माझ्यावर सोडतेस
3. तू साधा आहेस पण माझा आहेस
4. शिंपल्यांचा शो पिस नको जीव अडकला जीव अडकला मोत्यात
5. जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम
6. खूप भारी वाटतं कोणीतरी स्वतःसाठी नाही तर किमान माझ्यासाठी काळजी घे असं म्हणतं तेव्हा…
7. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं
8. आठवणी खरंच चांदण्यासारख्या असतात, कोणती कधी लुकलुकेल सांगता येत नाही
9. प्रेम म्हणजे एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना – सदगुरू श्री वामनराव पै
10. बायका जेवढं दुःख सोसू शकतात, तेवढं दुःख पुरूषांना पेलत नाही – व. पु. काळे
मजेशीर वन लाइन स्टेटस – Whatsapp Funny Status in Marathi One Line
सोशल मीडिया जसं अपडेट्स देणारं माध्यम आहे तसंच मनोरंजनाचं माध्यमही आहे. यासाठीच इतरांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी अपडेट करा हे मजेशीर वन लाइन स्टेटस – One Line Status in Marathi
1.मी लोकांचा अपमान करत नाही, फक्त त्यांचे कुठे चुकतंय एवढंच त्यांना दाखवतो
2. मी योगासने शिकावी असं म्हणतोय, पण त्याचा ‘योग’च येत नाही
3. दिसणं आणि असणं यातील फरक समजला की ‘फसणं’ बंद होतं
4. मजा या गोष्टीची वाटते की, बोलणार नाही म्हणून भांडत-चिडत का होईना तू नेहमी माझ्याशी सतत बोलत राहतेस…
5. चांगलं वागायचा प्रयत्न केला की लोक वाईट वागायला मजबूर करतात
6. जगणं सोपं आहे फक्त काड्या करण्याऱ्यांच्या नाड्या समजायला हव्या
7. खडूस तुझ्यावर प्रेम करण्यापेक्षा सर्वात जास्त मजा तुझ्याशी भांडण्यात येते
8. झोप उडवून म्हणतेस “आता आपण उद्या बोलू” सांग आता मी उद्यापर्यंत काय करू
9. पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभलेले पावसाळे जास्त महत्त्वाचे असतात
10. माझी मनोवृत्ती तुम्ही माझ्याशी कसे वागता यावर ठरेल
वन लाइन लव्ह स्टेटस – Love Status in Marathi One Line
प्रेमदिन साजरा करण्यासाठी, जोडीदाराचा वाढदिवस, प्रेमाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अपडेट करा हे वन लाइन लव्ह स्टेटस – One Line Status in Marathi
1. मला तुझी तितकीच गरज आहे जितकी शरीराला श्वासाची…
2. आयुष्यात त्यांनाच महत्त्व द्या जे तुम्हाला समजून घेतात
3. आयुष्यात एक वेळ अशी असते जेव्हा प्रश्न नको फक्त साथ हवी असते
4. जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम पण ती सर्वांनाच मिळत नाही
5. आकर्षण तात्पुरतं असतं प्रेम मात्र कायम टिकतं
6. जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो तेव्हा सर्वात आनंदी माणूस असतो
7. प्रेम म्हणजे काय हे समजण्यासाठी आधी प्रेमात पडावं लागतं
8. माझ्या आयुष्यात उशीरा आलीस तरी चालेल पण साथ मात्र कायमची दे
9. गप्पा नको साथ हवी, तुझ्यासारखी नको तूच हवी
10. माझं मन माझं जितकं नाही तितकं आता तुझं आहे
वन लाइन मिस यू स्टेटस – Miss You Status in Marathi One Line
एखाद्याची आठवण येत असेल तर त्याला ही गोष्ट सांगण्याचा सुंदर पर्याय म्हणजे सोशल मीडियावर स्टेट्स अपडेट करणं… साठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत हे वन लाइन मिस यू स्टेटस – One Line Status in Marathi
1. आठवणी हसवतात, आठवणी रडवतात काहीच न बोलता आठवणी निघून जातात
2. आठवण नाही काढलीस तरी विसरून मात्र जाऊ नकोस
3. आजही एकटंच बसायला आवडतं, मन शांत ठेवून आठवणीच्या विश्वात रमायला आवडतं
4. बघ माझी आठवण येते का?
5. आठवणीत तुझ्या स्वतःला विसरून बसलोय, कधी तरी येशील या आशेत जगत बसलोय
6. आठवण ही अशी एक गोष्ट आहे जी एकाचवेळी चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणते
7. काळजाला स्पर्श करते ती आठवण
8. मला तुझी इतकी का आठवण येते, की रात्र सारी तुझ्या आठवणीतच सरते
9.जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पण आईबाबांचे प्रेम परत मिळत नाही
10. नव्या गोष्टी नेहमीच चांगल्या असतात पण जुन्या आठवणी मला नेहमीच जास्त छान वाटतात