ADVERTISEMENT
home / xSEO
भावनिक आठवण कोट्स मराठी | Emotional Athavan Quotes In Marathi

55+ भावनिक आठवण कोट्स मराठी | Emotional Athavan Quotes In Marathi 

आपली प्रिय व्यक्ती आपल्यापासून लांब असली तरी आपल्या मनात तिच्या आठवणी कायम रुंजी घालत असतात. कधी हा दुरावा थोड्या दिवसांसाठी असतो पण कधी आयुष्यात असे काही घडते की दोन जीवांच्या मध्ये कायमचा दुरावा येतो. कधी ती व्यक्ती गैरसमजामुळे आपल्या आयुष्यातून निघून जाते किंवा कधी ती दुर्दैवाने या जगातूनच निघून जाते. ती व्यक्ती जरी आपल्या जवळ नसली तरी तिच्या आठवणी आपल्या मनात कायम ताज्या असतात. मग ती व्यक्ती नवरा असो ,बायको असो, प्रियकर असो की प्रेयसी… कधी कधी आपले मित्र मैत्रिणी सुद्धा काही कारणाने आपल्यापासून दुरावतात तेव्हाही मनाला खूप दुःख होते. काही लोक त्यांचे दुःख मनातच ठेवून जगतात तर काहींना ते व्यक्त केल्याशिवाय चैन पडत नाही. जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला एकदा मिस करत असाल आणि तुम्हाला स्टेटस वर काही भावनिक आठवण कोट्स मराठी (Emotional Athavan Quotes In Marathi ) ठेवायचे असतील किंवा कुणा खास व्यक्तीसाठी Miss You Marathi Athavan Status हवे असतील तर आम्ही तुमच्यासाठी खास मराठीतून आठवण कोट्स (Athavan Quotes In Marathi) आणले आहेत.हे मिस यु स्टेटस मराठीतून वाचा किंवा सुंदर प्रतिमांसह डाउनलोड करा आणि ते तुमच्या आवडत्या एखाद्या व्यक्तीसोबत शेअर करा. तुम्ही त्या व्यक्तीला किती मिस करत आहात हे दाखवण्यासाठी त्यांना हे भावनिक आठवण कोट्स मराठी (Emotional Athavan Quotes In Marathi ) पाठवा. मनातील भावना अशा व्यक्त करा.

इमोशनल आठवण कोट्स मराठी | Emotional Athavan Quotes In Marathi

आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात अन जातात.. पण काही खास लोकांच्या आठवणी मात्र कायम मनात रुतून बसतात. त्या काही केल्या विसरता येत नाहीत. अशाच भावना व्यक्त करणारे इमोशनल आठवण कोट्स वाचा. 

भावनिक आठवण कोट्स मराठी (Emotional Athavan Quotes In Marathi )
भावनिक आठवण कोट्स मराठी

जिथे गोड आठवणी आहेत तिथे हळुवार भावना आहेत, जिथे हळुवार भावना आहेत तिथे अतूट प्रेम आहे. आणि जिथे अतूट प्रेम आहे तिथे नक्कीच तू आहेस.. 

आजही मला एकटंच बसायला आवडतं…मन शांत ठेवून तुझ्या आठवणींत रमायला आवडतं… 

ADVERTISEMENT

आठवणींचं तर कामच आहे आठवण करून देत राहणे… ती काही काळ वेळ बघत नाही, सतत चोवीस तास तुझी आठवण करून देत असते… 

एक वेळ माणूस आठवणी विसरेल, पण प्रेम विसरता येत नाही. तुझे माझ्यावर प्रेम आहे असं म्हणत होतीस ते प्रेम कसे विसरलीस?

आठवणी हसवतातही अन रडवतातही…कधी काहीच न बोलता व्यक्ती निघून जातात पण तरी त्यांच्या आठवणी आयुष्यभर सतावतात… 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला तुझी आठवण येतच राहील… अन तुझी आठवण आल्यावर डोळ्यांतून एखादा अश्रू अलगद गालावरून ओघळून जाईल… 

ADVERTISEMENT

फक्त मलाच का तुझी इतकी आठवण येते, अन मग माझी सारी रात्र तुझ्याच आठवणींत सरते…

जगातील सगळ्यात मोठी वेदना म्हणजे अशा लोकांची आठवण ज्यांना विसरताही येत नाही आणि पुन्हा भेटताही येत नाही. 

माझ्या डोळ्यांना मी सांगितलंय की आजची रात्र जागून काढायची आहे… कारण मनात तुझी आठवण साठवायची आहे. 

ती आठवण आहे… तिचं तर कामच आहे विसरून न देणे… ती काळ-वेळ बघत नाही, तिला वाटते तेव्हा ती अशी अचानक धडकते… कधी हसवते तर कधी रडवते… 

ADVERTISEMENT

वाचा – मर्मावर बोट ठेवणारे स्वार्थी मराठी कोट्स

गर्लफ्रेंडसाठी इमोशनल आठवण कोट्स मराठी | Emotional Athavan Quotes In Marathi For Girlfriend

भावनिक आठवण कोट्स मराठी (Emotional Athavan Quotes In Marathi )
भावनिक आठवण कोट्स मराठी

प्रेयसी ही आयुष्यातली एक खास व्यक्ती असते. ती दूर गेली असेल तर प्रियकराला चैन पडत नाही. लाँग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये काही काळ विरह सहन करावा लागतो.हा विरह काहीच काळापुरता असेल तर प्रियकर तो सहन करतो. पण दुर्दैवाने हा विरह कायमचा असेल तर मग त्या प्रियकराच्या मनाची अवस्था खूप कठीण होऊन बसते. त्याच्या मनात प्रेयसीच्या आठवणींचा सागर असतो. तुमच्याही मनाची अवस्था काहीशी अशीच असेल तर वाचा गर्लफ्रेंडसाठी इमोशनल आठवण कोट्स मराठी- 

तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर मी प्रेम केलं.. मी प्रेम केलं तुझ्या हृदयातील प्रत्येक स्पंदनावर… मी प्रेम केलं माझ्याशी बोलत तू जागून काढलेल्या रात्रीवर आणि तुझ्या आठवणींवरही मी तेवढंच प्रेम केलं… 

तू इतकी सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार, पण मी प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी ही काय करणार… असे काय आहे तुझ्यात ते मला कळत नाही, तुझ्या आठवणींशिवाय माझा एक दिवसही जात नाही… 

ADVERTISEMENT

तू केसांत गजरा माळलास की मोगराही धुंद होतो, आणि तुझ्या आठवणींत मात्र मी बेधुंद होतो… 

तुझ्या आठवणींत एक एक क्षण मी तरसतो … पण तुलाही माझी आठवण येत नसेल हा विचार मनात आला की  भीतीने माझ्या काळजाचा ठोका चुकतो.. 

मला विसरण्याची हजार कारणे तू शोधशील पण तुला एकही कारण सापडणार नाही.. आपल्यात इतका दुरावा असेल की यापुढे मी तुझी आठवण कधीही काढणार नाही… 

तू जरी मला समजत असलीस आयुष्यातील एक त्रास… पण तरीसुद्धा तू परतण्याची मी वाट बघेन जोवर घेत नाही मी शेवटचा श्वास!

ADVERTISEMENT

श्रावणात बरसणाऱ्या रिमझिम रेशीमधारांनी तुला आणले माझ्यासाठी, तिथेच मी ठरवून टाकले की आता जगणे फक्त तुझ्याचसाठी… 

मी तुझ्या आठवणींत किती झुरतो हे सांगण्यासाठी माझ्याकडे माप नाही. फक्त एवढंच म्हणेन की शेवटच्या क्षणापर्यंत मी तुझाच होतो आणि तुझाच राहीन… 

माझ्या संगीतातील सूर तूच आहेस.  माझ्या गीतातील आलाप तूच आहेस. तुझ्या आठवणींत जे गीत गातो मी, त्या गीतातील आत्माही तूच आहेस. 

आठवतात का तुला ते सुंदर क्षण… जेव्हा तू माझ्या मिठीत असताना लोक जळू लागले होते आणि आपल्यावर प्रेमाचा अभिषेक करण्यासाठी ढग कोसळू लागले होते… 

ADVERTISEMENT

वाचा – भावना व्यक्त करण्यासाठी हमखास उपयोगी पडतील असे Emotional Status

बॉयफ्रेंसाठी भावनिक आठवण कोट्स मराठी | Emotional Athavan Quotes In Marathi For Boyfriend

भावनिक आठवण कोट्स मराठी (Emotional Athavan Quotes In Marathi )
भावनिक आठवण कोट्स मराठी

प्रियकर प्रेयसीचे नाते खूप तरल आणि अलवार असते. हे नाते जितके नाजूक तितकेच पक्के देखील असते. पण नात्यात गैरसमज आले की ते तुटायला वेळ लागत नाही. कुठलेही नाते तुटताना माणसाला त्रास होतोच. तुमचाही प्रियकर तुमच्यापासून दूर गेला असेल आणि तुम्हाला त्याची आठवण सतावत असेल तर त्याला पाठवा हे बॉयफ्रेंसाठी भावनिक आठवण कोट्स- 

पुन्हा भेटेन मी,  त्याच जुन्या वळणावर नव्या वाटा शोधताना तुला पुन्हा भेटेन मी… 

तू आणि मी.. तुझ्याच हातात सारे काही…तुझ्याच कडे जीव गुंतलेला माझा अन माझ्याकडे मात्र तुझ्या आठवणींशिवाय काही नाही… 

ADVERTISEMENT

मी स्वप्नांची वाट पाहते कारण स्वप्नात तुझी ओढ असते. मी तुझ्या भेटीची वाट पाहते कारण तुझ्याशिवाय माझे कोणीच नसते… 

तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही. तू म्हणतोस कविता कर माझ्यावर पण मला शब्दच सुचत नाहीत… 

माझ्या मनात तुझ्या आठवणींचा सागर आहे आणि माझ्या भावनांच्या सागराचा किनारा देखील तूच आहेस. 

परक्यांनाही आपलेसे करतील असे काही गोड शब्द असतात. शब्दांनाही कोडे पडावे अशा काही गोड आठवणी असतात आणि किती मोठं भाग्य माझं की त्या आठवणी तुझ्या असतात… 

ADVERTISEMENT

इतक्या जवळ राहा की आपल्या नात्यात विश्वास कायम राहील. पण कधी इतक्याही दूर जाऊ नकोस की केवळ तुझ्या आठवणींवरच माझे जग टिकून राहील.. 

डोळ्यांतले पाणी पुसणारे कोणी असेल तरच त्या अश्रूंना काही अर्थ आहे.. मनातल्या आठवणी कुणी वाटून घेणारं असावं नाहीतर हे जीवन व्यर्थ आहे. 

काही नाती ही तुटत नाहीत पण ती आपल्या नकळत मिटून जातात… जशी मनात आठवणी ठेवून लोक आयुष्यातून निघून जातात आणि बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातातून उडून जातात… 

नात्यापेक्षा अहंकार मोठा झाला तर नाते तुटायला कितीसा वेळ लागतो… माणसाने सगळ्याच आठवणीच पुसून टाकल्या तर माणूस विसरायला एक क्षणही पुरतो…

ADVERTISEMENT

वाचा – ब्रेकअप स्टेटस मुलींसाठी (Breakup Status In Marathi For Girl)

मित्रांसाठी इमोशनल आठवण कोट्स | Emotional Athavan Quotes In Marathi For Friends 

भावनिक आठवण कोट्स मराठी (Emotional Athavan Quotes In Marathi )
भावनिक आठवण कोट्स मराठी

मैत्रीचे नाते जगातल्या सर्वात सुंदर नात्यांपैकी एक आहे. कुठलेही बंधन नाही, रक्ताचे नाते नाही तरीही जीवाला जीव देणारे मित्र ज्याला भेटतात ती व्यक्ती भाग्यवान! पण कधी काही कारणांनी हे मित्र दुरावतात किंवा शरीराने लांब जातात. तुम्ही तुमच्या जिवलग मित्राला मिस करत असाल तर त्यांच्यापर्यंत तुमच्या भावना पोचवा. त्यांना पाठवा मित्रांसाठी इमोशनल आठवण कोट्स- 

फुले नित्य फुलतात आणि ज्योती अखंड जळतात… आयुष्याचेही असेच आहे, चांगली माणसे नकळत मिळतात. नाते तोडायला एक क्षणही पुरेसा असतो पण जोडून ठेवणं हा आयुष्यभराचा खेळ असतो. 

मनाने जोडलेल्या नात्याला सतत भेटण्याची गरज नसते. आपल्या जवळच्यांच्या चेहेऱ्यावर हसू फुलवण्यासाठी त्यांची एक आठवणही पुरेशी असते. 

ADVERTISEMENT

कधी कधी आपण त्या खास व्यक्तीला मिस करत नसतो तर आपण त्यांच्याबरोबर घालवलेल्या सुंदर क्षणांना मिस करत असतो. 

डोळ्यांतले अश्रू लपवण्याच्या प्रयत्नांत मी स्वतःलाच दोष देत राहतो आणि या खोट्या प्रयत्नांत तुझी आठवण अधिक तीव्रतेने येतच राहते. 

माझे दुःख, विरह, अश्रू हे तुझ्यापासून सगळेच कसे बरे आहे अजाणते… तुझ्या विश्वात तू आहेस रममाण आणि केवळ आसवांचे देणे माझ्या नशिबी येते. 

आठवणी सांभाळून ठेवणे खूप सोपे असते कारण त्या मनात नीट जपून ठेवता येतात. पण एक एक क्षण सांभाळणे खूप कठीण असते कारण याच क्षणांच्या नंतर आठवणी तयार होतात. 

ADVERTISEMENT

वाचा – खास मित्रांसाठी मिस यू स्टेटस

मराठी आठवण स्टेटस | Marathi Athavan Status

भावनिक आठवण कोट्स मराठी- Miss You Marathi Athavan Status
भावनिक आठवण कोट्स मराठी

हल्ली WhatsApp आणि सोशल मीडियामुळे आपल्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोचवणे सोपे झाले आहे. राग आला असेल तर पाठवा इमोजी, समोरच्याला हसवायचे असेल तर पाठवा एखादे meme आणि कुणाची खूप आठवण येत असेल तर त्याच्यासाठी खास स्टेटस ठेवता येते. तुम्हालाही तुमच्या भावना व्यक्त करायला स्टेटस ठेवायचे असेल तर खालील मराठी आठवण स्टेटस मधून एखादे छानसे स्टेटस निवडा. 

तुझी आठवण ही कस्तुरीसारखी आहे. जी कधीच साथ सोडत नाही पण सतत माझ्या मनात दरवळत असते आणि मला हवीहवीशी वाटते. 

माझ्या सुन्या मैफिलीत आज अंधार दाटला होता, भूतकाळातील आठवणींना आज पाझर फुटला होता.. 

ADVERTISEMENT

येणारा रोजचा दिवस कधीच तुझ्या आठवणींशिवाय येत नाही.. दिवस जरी निघून गेला तरी तुझी आठवण मात्र जात नाही. 

माझ्या डोळ्यांतून वाहणारा प्रत्येक अश्रू हा तुझ्याच शोधात निघतो आणि नकळत तुझ्याच आठवणींच्या गावात हरवतो. 

संध्याकाळी, कातर वेळी अचानक या हृदयात धडधड झाली… डोळे पाण्याने भरले आणि पुन्हा तुझी आठवण आली…

का कोण जाणे पण आज तुझी खूप आठवण येते आहे… माझ्या आयुष्यात तुझी कमतरता आणखी तीव्रतेने भासते आहे. 

ADVERTISEMENT

मन माझं कुठेतरी हरवलेलं होतं.. हरवताना देखील ते तुलाच शोधत होतं..तुला कधीच ते ओळखता आलं नाही पण ते फक्त तुझ्याच साठी झुरत होतं… 

वाचा – आयुष्याला नवी प्रेरणा देणारे ह्रदयस्पर्शी कोट्स

आठवण कोट्स इन मराठी | Athavan Quotes In Marathi 

भावनिक आठवण कोट्स मराठी-Athavan Quotes In Marathi
भावनिक आठवण कोट्स मराठी

कधी कधी आपल्या मनात खूप काही साचले असते. ते आपल्याला व्यक्त देखील करायचे असते. पण मन हळवे झाले असल्याने आपल्याला शब्दच सुचत नाहीत. कुणाची खूप आठवण येत असेल तर त्यावेळी मन कातर होते. कुणाशी तरी खूप बोलावेसे वाटते, एकटेपणा सतावतो. याच भावना शब्दांत मांडणारे आठवण कोट्स मराठीतून वाचा. 

तुझ्यात अन माझ्यात कुठे दुरावा आहे, मला आठवण आली की तुला उचकी लागते हाच तर आपल्या प्रेमाचा पुरावा आहे. 

ADVERTISEMENT

जिथे भावना आहेत तिथे प्रेम आहे. जिथे प्रेम आहे तिथे आठवण आहे, जिथे आठवण आहे तिथे जीवन आहे आणि जिथे जीवन आहे तिथे फक्त तू आहेस… 

वेड लागले आहे तुझ्या भेटीचे… तुझ्या स्पर्शाने दरवाळणाऱ्या सांजेचे, पण आसुसलेले माझे मन घेऊन रडते मी उराशी, तू तिकडे दूर अन तुझ्या आठवणीत अश्रू माझ्या डोळ्यांशी… 

तू माझ्यासवे नाहीस असा एकही क्षण जात नाही. नेहमीच असतो मी तुझ्या सहवासात आणि तुझाच ध्यास असतो माझ्या मनात!

तुझ्या आठवणीतला प्रत्येक क्षण मला आठवतो, तुझे गोड हास्य मी माझ्या नजरेत साठवतो…सुंदर तो प्रत्येक क्षण तुझ्या सोबतीतला, इतका मंत्रमुग्ध की लाजवेल तो सुखाला… 

ADVERTISEMENT

रातराणीच्या फुलांनी ही सांज बहरू दे, तुझ्या आठवणींच्या सुगंधाने माझे मन दरवळू दे.. 

मी अशीच उंबऱ्याशी बसलेली असते तुझी वाट पाहताना,  तुझ्या आठवांना माझ्या शब्दांशी जोडताना.. 

वाचा – दु:खात साथ देतील अशा शायरी

मिस यु मराठी आठवण स्टेटस | Miss You Marathi Athavan Status

भावनिक आठवण कोट्स मराठी | Emotional Athavan Quotes In Marathi
भावनिक आठवण कोट्स मराठी

आपण नसताना कुणाला तरी आपली आठवण येणे, आपली कमी जाणवणे ही भावना मनाला सुखावून जाते. कुणी आपल्याला मिस यु म्हटलं की अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे वाटते. कुणाला तरी आपण हवे आहोत ही भावना मनाला आनंद देऊन जाते. मनातल्या भावना व्यक्त केल्याने नाते अधिक घट्ट होते. तुम्हालाही कुणाची आठवण येत असेल तर त्यांना मिस यु म्हणायला विसरू नका. 

ADVERTISEMENT

हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात तुझीच आठवण ताजी आहे, शरीराने तू कितीही दूर गेलीस तरी मनाने अजूनही तू माझी आहे. 

वाट पाहशील माझी तर एक गोड आठवण बनून येईन मी, संगीतात शोधशील मला तर तुझे गाणे बनून येईन मी… एकदा मनापासून माझी आठवण काढून तर बघ, तुझ्या चेहेऱ्यावरचे गोड हास्य बनून येईन मी… 

नातं जपलं की सगळं जमतं. हळूहळू कोणीतरी आपलंसं होतं.. आठवणींचं गाठोडं आणि डोळ्यात प्रेमाचा ओलावा देऊन जातं… ओळख नसली तरी साता जन्मांची साथ देऊन जातं… 

डोळ्यांत साठल्या आहेत तुझ्या आठवणी, रात्र सरता ही सरेना… किती दिवस लोटले तुला बघून, निदान माझ्या स्वप्नात तरी ये ना… 

ADVERTISEMENT

मला विसरण्याची तुझी ही सवय आहे जुनी..पण तुझ्याविना तुझ्या आठवणींत माझी रात्र आहे सुनी-सुनी …

वेळ लागला तरी चालेल पण मी वाट तुझी पाहीन… विसरलास जरी तू मला तरी मी नेहमी तुझीच राहीन… 

माझ्या एकाकी जीवनात तू केवळ एक आठवण बनून राहिलीस, माझ्या प्रत्येक सुखदुःखात तू माझ्या डोळ्यांतले अश्रू होऊन वाहिलीस… 

इंग्रजीत एक म्हण आहे, ” आऊट ऑफ साईट, आउट ऑफ माईंड.” परंतु कधीकधी असे होत नाही. जे तुमच्यापासून लांब गेले आहेत त्यांना तुम्ही विसरू शकत नाही. ती व्यक्ती तुमचा जिवलग मित्र असू शकते  ज्याला तुम्ही मिस करत असाल. किंवा तुमचे कुटुंबीय असू शकतील ज्यांना तुम्ही खूप दिवस झाले भेटला नसाल किंवा तुमचे प्रियकर प्रेयसी असू शकतील,जे तुमच्यापासून दूर गेले आहेत. हे खास व्यक्ती लांब जाताना तुमच्या मनावर एक छाप सोडून जातात आणि आठवणी ठेवून जातात.  त्या खास व्यक्तींबरोबर या आठवणी पुन्हा शेअर करा, त्यांना पाठवा हे भावनिक आठवण कोट्स मराठी (Emotional Athavan Quotes In Marathi ). 

ADVERTISEMENT

Image Vectors – istock 

अधिक वाचा – मराठी स्टेटस नाती | Relationship Quotes In Marathi

वाचा – ब्रेकअप शायरी (Breakup Shayari Marathi)

Tea Quotes In Marathi

ADVERTISEMENT
29 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT