पैठणी साडी म्हटले की, प्रत्येक महिलेसाठी खास विषय. त्यातही येवला पैठणी साडी, कापसे पैठणी या तर प्रसिद्ध आहेतच. पूर्वी पैठणी साड्यांचे जास्त डिझाईन्स नव्हते. पूर्वीपासून पारंपरिक पैठणी (traditional paithani type in marathi) आपल्याकडे असणे म्हणजे अगदी मान समजला जायचा. पण आता पैठणी साड्यांचे डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीत समोर येऊ लागले आहे आणि त्यामुळे महिलांना पैठणी साड्यांमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी मिळू लागल्या आहेत. साड्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत पण त्यापैकी सर्वात प्रसिद्ध साडी असलेल्या या मराठमोळ्या पैठणी साडी डिझाईन (marathi paithani saree designs) नक्की कोणते आहेत, पैठणीचे प्रकार कोणते आहेत, येवला पैठणी (yeola paithani saree) साडी किंमत, सेमी पैठणी साडी किंमत, कापसे पैठणी येवला किंमत, पेशवाई पैठणी किंमत, पैठणी साडी कलर, पैठणी कशी ओळखावी हे सर्व आपण या लेखातून पाहणार आहोत. पैठणी साडी पाहण्याआधी ती कशी ओळखावी हे आपण आधी जाणून घेऊया.
Table of Contents
- पारंपारिक पैठणी (Traditional Paithani Type In Marathi)
- ब्रोकेड पैठणी साडी डिझाईन (Brocade Paithani)
- कॉटन पैठणी साडी डिझाईन (Cotton Paithani)
- खण पैठणी साडी डिझाईन (Khun Paithani)
- नऊवारी पैठणी साडी डिझाईन (Nauvari Paithani)
- बनारसी पैठणी साडी डिझाईन (Banarasi Paithani)
- हँडलूम पैठणी साडी डिझाईन (Handloom Paithani)
- सिल्क पैठणी साडी डिझाईन (Silk Paithani)
- पेशवाई पैठणी साडी डिझाईन (Peshwai Paithani)
- डिझाईनर पैठणी साडी डिझाईन (Designer Paithani)
- महाराणी पैठणी साडी डिझाईन (Maharani Paithani)
- सेमी पैठणी साडी डिझाईन (Semi Paithani)
- भरजरी पल्लू पैठणी साडी डिझाईन (Heavy Pallu Paithani)
- प्युअर सिल्क पैठणी साडी डिझाईन (Pure Silk Paithani)
- हातमागावरची पैठणी साडी डिझाईन (Hatmag Paithani)
- मल्टीकलर पैठणी साडी डिझाईन (Multicolour Paithani)
- मोर पैठणी साडी डिझाईन (Peacock Paithani)
- चेक्स पैठणी साडी डिझाईन (Checks Paithani)
- प्रश्नोत्तरे (FAQ’s)
पैठणी दोन पद्धतीच्या (paithani type in marathi) असतात. पैठण ही पुरातन काळी महाराष्ट्राची राजधानी होती. पैठणमध्ये तयार होणारी वैशिष्ट्यपूर्ण साडी म्हणजे ‘पैठणी’. चौकोनी नक्षी तसेच पदरावरील मोराच्या नक्षीमुळे पैठणी लगेच ओळखू येते. भारतातील सर्वात महागड्या साड्यांपैकी एक मानली जाते. ही भारतातील सर्वात प्रसिद्ध साड्यांपैकी एक आहे. ही भारतातील उत्कृष्ट रेशीमपासून बनविली जाते. आजही पैठणी साडी ही महाराष्ट्राची शान आहे. कोणत्याही समारंभात पैठणी साडीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यातही येवल्याची पैठणी ही जास्त प्रसिद्ध आहे. साडी कशी नेसावी हेदेखील कसब आहे. आपण त्याचे प्रकार पाहू.
पारंपारिक पैठणी (Traditional Paithani Type In Marathi)
खरी पैठणी आणि सेमी पैठणीमधील फरक हा साडी उलटी करून पाहिल्यावर समजतो. पैठणीवरील जरीचं विणकाम, मोर, नक्षीकाम उलट बाजून बघितल्यावर मशीनवर केलेले विणकाम हे वेगळे दिसते. हातमागावर विणलेले साडी उलट्या बाजूनेही वेेगळी दिसत नाही. हीच खरी पैठणी. हातमागावर विणलेल्या साडीची बॉर्डर ही पुढून आणि मागून दोन्ही बाजूने सारखीच दिसते.
पैठणी साडी डिझाईन दाखवा असे दुकानात गेल्यानंतर सांगितल्यानंतर आजही सर्वात प्रथम पारंपरिक पैठणीच दाखवण्यात येतात. कारण या पैठणी जास्त विकत घेतल्या जातात. आजकाल जी पैठणी मिळते ती बऱ्याचदा मशीनमेड असते. पण खरी पैठणी मात्र पूर्णतः ताग्यावर विणली जात असे. एकेकाळी पैठणीसाठी चीनहून सिल्कचे धागे येत असत. तसंच पैठणीच्या पदरावरील जरीकामात खऱ्या सोन्याचे आणि चांदीचे धागे वापरून विणकाम केले जात असते. आज मात्र या साडीसाठी बंगळूरचे मलबेरी सिल्क किंवा सुरतहून आलेली जर विणकामसाठी वापरली जाते. एक सहावारी पैठणी विणण्यासाठी तब्बल 500 ग्रॅम सिल्क धागे आणि 250 ग्रॅम जर लागते तर नऊवारी विणण्यासाठी जास्त कच्चा माल लागतो. खरी पैठणीचं वैशिष्ट्य म्हणजे ती दोन्ही बाजूंनी अगदी सारखी दिसते. हो अगदी बॉर्डर आणि पदरही. खऱ्या ताग्यावर विणलेल्या पैठणीची हीच ओळख आहे. तसंच खऱ्या पैठणीची जर कधीही काळी पडत नाही. पारंपरिक पैठणी साडी किंमत विचारायला गेली तर ती नक्कीच महाग असते. 10 हजार पासून या साड्यांची किंमत सहसा आपल्याला पहायला मिळते. पैठणी जुनी झाल्यानंतर तुम्ही यापासून नवे ड्रेसही शिऊ शकता. जे सध्या ट्रेंड्समध्ये आहेत याशिवाय गौराईलाही तुम्ही पैठणी साडी नेसवू शकता.
पैठणी साडी किंमत – रू 10 हजार पासून सुरू
POPxo Recommandation – पारंपरिक पैठणी, इथून खरेदी करा
वाचा – नऊवारी साडी कोट्स मराठीमध्ये
ब्रोकेड पैठणी साडी डिझाईन (Brocade Paithani)
सध्या ब्रोकेड पैठणीचा तर ट्रेंडच आला आहे. विविध कार्यक्रमांना ब्रोकेड पैठणी अधिक वापरताना दिसून येते. संपूर्ण साडीवर असणारी नक्षी अत्यंत सुंदर आणि मनमोहक दिसते. तसंच या साड्यांमधील रंग हे अधिक उठावदार आणि आकर्षक असतात. त्यामुळे ब्रोकेड पैठणीला सध्या जास्त मागणी आहे. पारंपारिक पैठणीवर फक्त पदरावरच नक्षीकाम असते तर ब्रोकेड पैठणीवर संपूर्ण साडीवर नक्षीकाम केलेले आढळते. हे प्रकार पारंपरिक पैठणीत मोडत नाहीत. ब्रोकेड पैठणी साडी किंमत साधारणतः रूपये 5000 पासून सुरू होते. तसंच कमी किमतीतदेखील या साड्या मिळतात पण मग त्या साड्यांमध्ये हवे तसे फिनिशिंग दिसून येत नाही.
पैठणी साडी किंमत – रू. 5 हजार पासून सुरू
POPxo Recommandation – ब्रोकेड पैठणी, इथून खरेदी करा
कॉटन पैठणी साडी डिझाईन (Cotton Paithani)
काही महिलांना साड्यांची सवय नसते. त्यामुळे सुळसुळीत पैठणी नेसण्यापेक्षा कॉटन पैठणी नेसणे आणि कॉटनची पैठणी निवडणे त्यांना अधिक योग्य वाटते. अंगाला अगदी व्यवस्थित चापूनचोपून बसणारी अशी ही साडी एखाद्या कार्यक्रमात नेसल्यावर तुम्हाला आकर्षकही दिसेत आणि त्याशिवाय तुम्हाला आरामदायी वाटेल अशी ही साडी आहे. सहसा या साड्यांची अधिक खरेदी होत नाही. पण साधारण 50 वय असणाऱ्या पुढच्या महिलांना अशा स्वरूपाचे डिझाईन्स आणि कॉटन पैठणी नक्कीच आवडतात.
पैठणी साडी किंमत – रू. 4 हजार पासून सुरू
POPxo Recommandation – कॉटन पैठणी, इथून खरेदी करा
खण पैठणी साडी डिझाईन (Khun Paithani)
सध्या सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहे ती म्हणजे खण साडी. अगदी अभिनेत्रींनादेखील भुरळ पाडणाऱ्या अशा खणांच्या साड्या अतिशय आकर्षक दिसतात. नऊवारीपासून ते अगदी पाचवरीपर्यंत खणाच्या पैठणी साड्या दिसून येतात. याचे विशिष्ट डिझाईन आता तयार करण्यात येत आहे. या साड्यांना अधिक मागणी असल्यामुळे खण पैठणी साडीही अधिक विणली जात आहे. खण पैठणी साड्यांची किंमत खिशाला परवडण्यासारखी असून अगदी महाग साड्याही मिळतात. तसंच यातील गडद आणि आकर्षक रंग हे या साड्यांचे वैशिष्ट्य आहे.
पैठणी साडी किंमत – रू. 2 हजार पासून सुरू
POPxo Recommandation – खण पैठणी साडी, इथून खरेदी करा
नऊवारी पैठणी साडी डिझाईन (Nauvari Paithani)
नवरी असो अथवा कोणत्याही लग्न, मुंज कार्यक्रमात मराठमोळ्या पद्धतीच्या साडीमध्ये नऊवारी साडी हे खास वैशिष्ट्य आहे. त्यातही नऊवारी पैठणी साडी असेल तर त्याला अधिक शोभा येते. विविध कपड्यांच्या रेंजमध्ये नऊवारी पैठणी साडीचे डिझाईन्स असतात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या साड्या निवडू शकता. नऊवारी साडी म्हटलं की त्यावर साजेसे दागिने आणि मेकअप केला की, तुमचे काम झाले. या साडीमध्ये तुम्ही आकर्षक दिसणार यात काही शंकाच नाही.
पैठणी साडी किंमत – रू. 4 हजार पासून सुरू
POPxo Recommandation – नऊवारी पैठणी साडी, इथून खरेदी करा
बनारसी पैठणी साडी डिझाईन (Banarasi Paithani)
बनारसी साडी आणि पैठणी साडी याचे कॉम्बिनेशन म्हणजे बेस्ट. साड्यांमध्ये उत्तम कलाकृती हवी असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या लग्नासाठी अथवा समारंभासाठी बनारसी पैठणी साडी निवडावी. बनारसी आणि पैठणी डिझाईन्सचे कॉम्बिनेशन तुमच्या लुकला अधिक शोभा आणते. कोणत्याही कार्यक्रमात तुम्हाला अधिक आकर्षक आणि वेगळे दिसायचे असेल तर या साडीचा तुम्ही आधार घ्यावा. बनारसी साड्यांचे पॉलिश आणि पैठणीचे डिझाईन्स हे आगळेवेगळे कॉम्बिनेशन तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमात अधिक उठावदार दिसून येते.
पैठणी साडी किंमत – रू. 4 हजार पासून सुरू
POPxo Recommandation – बनारसी पैठणी साडी, इथून खरेदी करा
हँडलूम पैठणी साडी डिझाईन (Handloom Paithani)
पैठणीमधील महागड्या स्वरूपाची ही साडी आहे. ज्या महिलांना पारंपरिक लुक हवा आणि हातमागावर विणलेली प्युअर पैठणी ज्याना नेसायची आहे त्यांच्यासाठी हे डिझाईन्स बनविण्यात येतात. या साड्या बनविण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे यामध्ये प्रचंड मेहनत आहे. म्हणूनच याच्या किमतीही जास्त असतात. यावर जरीचे काम आणि कलाकुसर तुम्हाला अधिक प्रमाणात दिसते. त्यासाठी खूप वेळ लागतो. तसेच कामगारांची अधिक मेहनतही लागते.
पैठणी साडी किंमत – रू. 10000 च्या पुढे
येवला हँडलूम पैठणी साडी – रू. 20000 च्या पुढे
Popxo Recommends – हँडलूम पैठणी, इथून खरेदी करा
सिल्क पैठणी साडी डिझाईन (Silk Paithani)
गडद रंग आणि यावरील जरीची कलाकुसर यानेच ही साडी मन जिंकून घेते. पैठणी सिल्क ही महाराष्ट्रात जास्त प्रसिद्ध आहे. हे डिझाईन बऱ्याच जणींना आवडतं. पैठणी सिल्कमध्ये अनेक व्हरायटी असतात. त्याचप्रमाणे यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रंगही उपलब्ध होतात. सहसा मुंज, लग्न, बारसे यासारख्या सणसमारंभाला याप्रकारच्या पैठणी सिल्क साड्या नेसण्यात येतात. कापसे पैठणी सिल्क साडी जास्त चांगली असल्याचंही म्हटलं जातं. त्याप्रमाणेच येवला पैठणी (yeola paithani saree) सिल्क साड्याही प्रसिद्ध आहेत.
पैठणी साडी किंमत – रू. 2000 च्या पुढे
Popxo Recommends – पैठणी सिल्क, इथून खरेदी करा
पेशवाई पैठणी साडी डिझाईन (Peshwai Paithani)
सध्या लग्नामध्ये सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहे ते पेशवाई पैठणीचे डिझाईन. दिसायला सुंदर आणि नेसायलाही तितकीच हलकी आणि आकर्षक असणारी पेशवाई ही बऱ्याच जणांना आवडत आहे. हे डिझाईन खरे तर अनेक वर्षांपासूनचे आहे पण त्याला आता पुन्हा एकदा नवी झळाळी मिळाली आहे. बॉलीवूडमधील ऐतिहासिक चित्रपटांमध्ये अशा प्रकारची पेशवाई पैठणी जास्त प्रमाणात नेसली गेल्याचे आढळते. तर सहसा पुणे आणि आसपासच्या शहरांमध्ये पेशवाई पैठणीची फॅशन जास्त प्रमाणात आहे. सहसा नवरीची पिवळी साडी पेशवाई पैठणी डिझाईन्समध्ये जास्त प्रमाणात दिसून येते.
पैठणी साडी किंमत – 3000 च्या पुढे
Popxo Recommends – पेशवाई पैठणी , इथून खरेदी करा
डिझाईनर पैठणी साडी डिझाईन (Designer Paithani)
काही जणींंना पारंपरिक पैठणी आवडत नाही तर त्यांच्यासाठी डिझाईनर पैठणी हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये साडीवर वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात. गडद रंगाच्या या पैठणीवर वेगवेगळे डिझाईन्स असतात. जे पारंपारिकता आणि आधुनिकता याचा एक योग्य मेळ आहे. आजकाल बऱ्याच मुलींना पारंपरिक साड्या नेसण्यापेक्षा त्यामध्ये वैविधता असलेली जास्त आवडते. त्यामुळे आजकालच्या ट्रेंडनुसार पैठणीमध्ये असे डिझाईन्स बनविण्यात येत आहेत.
पैठणी साडी किंमत – 3000 च्या पुढे
Popxo Recommends – डिझाईनर पैठणी, इथून खरेदी करा
महाराणी पैठणी साडी डिझाईन (Maharani Paithani)
सर्व पैठण्यांची राणी अशी महाराणी पैठणी साडी. पैठणीमध्ये ही सर्वात महाग साडी म्हणून ओळखण्यात येते. या साडीचे खास डिझाईन म्हणजे याची बॉर्डर. इतर सर्व पैठणीपेक्षा याची बॉर्डर मोठी आणि भरजरी असते. त्यामुळेच याला महाराणी असंही म्हणण्यात येते. त्याशिवाय या साडीची किंमत सर्व पैठणीपेक्षा महाग असते. ही साडी नेसायलाही बऱ्यापैकी जड असते. पण यामध्ये वेगवेगळे रंग तुम्हाला उपलब्ध आहेत. या साड्यांमध्ये गडद रंग अधिक सापडतात.
पैठणी साडी किंमत – 10000 च्या पुढे
Popxo Recommends – महाराणी पैठणी, इथून खरेदी करा
सेमी पैठणी साडी डिझाईन (Semi Paithani)
सेमीपैठणीमध्ये मागच्या बाजूला जाळी दिसून येते. ज्यांना पैठणी साड्या घेणे परवडत नाही ते सेमी पैठणी साडी घेतात. सेमी पैठणी साडी किंमत ही त्यामानाने कमी असते. साधारण 1500 पासून या साड्या मिळतात. ज्यांना पैठणी घेण्याची आवड आहे मात्र खिशाला परवडत नाही, त्यांच्यासाठी सेमी पैठणी हा चांगला आणि उत्तम पर्याय आहे.
पैठणी साडी किंमत – 1500 च्या पुढे
Popxo Recommends – सैमी पैठणी, इथून खरेदी करा
भरजरी पल्लू पैठणी साडी डिझाईन (Heavy Pallu Paithani)
पैठणीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा भरलेला पदर. भरजरी पल्लू पैठणी साडी तुम्हालाही नक्कीच आवडत असेल. कोणत्याही कार्यक्रमासाठी अथवा लग्नासाठी तुम्ही या साडीची नक्कीच निवड करू शकता. भरजरी पल्लू पैठणी साडी ही नेसायला आणि सांभाळायला जड असते. मात्र याचा लुक आणि याची समोरच्या व्यक्तीवर चांगलीच छाप पडते. असाच हेव्ही पल्लू असणारे डिझाईन्स पैठणीमध्ये आहेत. हे डिझाईन बऱ्याच जणींनी आवडते. या डिझाईन्सना बाजारामध्ये जास्त मागणीही दिसून येते. तुम्हालाही अशी साडी आवडत असेल तर तुमच्या घरातील कार्यासाठी तुम्ही या साडीची निवड करू शकता.
पैठणी साडी किंमत – 3000 च्या पुढे
Popxo Recommends – भरजरी पल्लू पैठणी साडी, इथून खरेदी करा
प्युअर सिल्क पैठणी साडी डिझाईन (Pure Silk Paithani)
कितीही आधुनिकता येऊ दे. पण प्युअर पैठणीची मागणी काही कमी होत नाही. प्रत्येकाला आपल्या वॉर्डरोबमध्ये एक प्युअर पैठणी असायलाच हवी असे नक्कीच वाटत असते. या साडीची किंमत महाग असते. त्याशिवाय याची बॉर्डर आणि त्यावरील कलाकुसर याला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे ही साडी दिसायला जितकी आकर्षक दिसते त्याहीपेक्षा ती नेसल्यावर त्याला अधिक जास्त शोभा येते.
पैठणी साडी किंमत – 7000 च्या पुढे
Popxo Recommends – प्युअर पैठणी सिल्क साडी, इथून खरेदी करा
हातमागावरची पैठणी साडी डिझाईन (Hatmag Paithani)
हातमागावरील पैठणी ही अगदी कलाकुसरीची असते. त्यातही त्याला जरीची बॉर्डर असेल तर ती अधिक आकर्षक दिसते. जरी बॉर्डर पैठणीला जास्त मागणी आहे. येवला पैठणी आणि कापसे पैठणी येथे ही साडी जास्त प्रमाणात मिळते. लग्नासाठी खास ऑर्डर देऊन हे डिझाईन बनवूनही घेतले जाते. हातमागावरची साडी ही खूपच महाग असते. ही सहसा खास डिझाईन करून घेण्यात येते. येवला पैठणी (yeola paithani saree) साडीमध्ये ही जास्त प्रसिद्ध आहे.
पैठणी साडी किंमत – 10000 च्या पुढे
Popxo Recommends – जरी बॉर्डर हातमागावरील पैठणी , इथून खरेदी करा
मल्टीकलर पैठणी साडी डिझाईन (Multicolour Paithani)
हल्ली पैठणीवर वेगवेगळे रंग असण्याचे नवे डिझाईन आले आहे. पारंपरिक आणि आधुनिक असा मेळ घालून मल्टी कलर पल्लू पैठणी आपल्याला बाजारात बघायला मिळते. पैठणी साडी कलर अनेक असतात पण ते असे एकत्र करून अधिक सुंदर दिसतात. पैठणीचा पल्लू अर्थात पदर हा सर्वात महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्यावर जितकी अधिक रंगसंगती तितकी ती साडी अधिक खुलून दिसते. ज्यांना गडद रंग आवडतो आणि साडीवर अधिक डिझाईन्स असलेले अथवा भरलेली साडी आवडते त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.
पैठणी साडी किंमत – 7000 च्या पुढे
Popxo Recommends – मल्टी कलर पल्लू पैठणी, इथून खरेदी करा
मोर पैठणी साडी डिझाईन (Peacock Paithani)
‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ हे गाणं सगळ्यांनाच माहीत आहे. पैठणी आणि त्यावर मोर नसेल तर ती साडी पूर्णच होत नाही असं अनेकांना वाटतं. मोर हे पैठणीच सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आता ट्रेंडनुसार अनेक डिझाईन्स बदलतात. पण आजही पैठणीच्या पदरावर मोर असणे गरजेचे असते. मोर पैठणी साडी डिझाईन्स आपल्या सर्वांनाच आवडतात. यातील रंगसंगती अधिक उठावदार आणि आकर्षक दिसतात. तसंच ही साडी नेसल्यानंतर एक वेगळाच फिल जाणवतो.
पैठणी साडी किंमत – 7000 च्या पुढे
Popxo Recommends – मोर पैठणी साडी, इथून खरेदी करा
चेक्स पैठणी साडी डिझाईन (Checks Paithani)
सध्या चेक्स पैठणीदेखील ट्रेंडमध्ये आहे. चेक्स पैठणीमध्ये वेगवेगळे रंग मिळतात. तुम्हाला ऑफिस अथवा अन्य ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमासाठी पैठणी नेसायची असेल तर तुम्ही चेक्स पैठणीचा पर्याय निवडू शकता. चेक्स पैठणीमध्येही वेगवेगळे प्रकार आहे. लहान चेक्स अथवा मोठे चेक्स तुमच्या आवडीनुसार या पैठणीची निवड तुम्हाला करता येते.
पैठणी साडी किंमत – 2000 च्या पुढे
Popxo Recommends – चेक्स पैठणी साडी, इथून खरेदी करा
प्रश्नोत्तरे (FAQ’s)
1. पैठणीची काही विशिष्ट किंमत असते का?
येवला पैठणी किंमत ही सहसा जास्त असते. जी पैठणी कमी किमतीत मिळत असेल ती खरी पैठणी नक्कीच नाही. विशिष्ट किंमत अशी नसते. पण खरी पैठणी ही महाग मिळते.
2. उत्कृष्ट पैठणी कुठून मिळेल?
येवला, पैठण येथून उत्कृष्ट पैठणी मिळते. कापसे पैठणीदेखील पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. त्याशिवाय येवलाला गेल्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी उत्कृष्ट पैठणी मिळतील.
3. कोणती पैठणी नेसायला अधिक सुंदर आहे?
तशा तर सर्वच पैठणी नेसल्यावर सुंदर आणि आकर्षक दिसतात. पण त्यातही तुम्ही पारंपरिक पैठणी नेसली तर ती नेसायला अधिक सुंदर दिसते.
4. लग्नामध्ये कोणत्या रंगाची पैठणी अधिक शोभून दिसेल?
लग्नसमारंभामध्ये डार्क अर्थात गडद रंगाच्या पैठणी अधिक शोभून दिसतील. यामध्ये लाल, हिरवा, जांभळा, गुलाबी या रंगाचा समावेश आहे. आता वेगवेगळे रंगदेखील यामध्ये येऊ लागले आहेत. पण गडद रंगाच्या पैठणी नक्कीच आकर्षक दिसतात.
5. येवला आणि औरंगाबादमधील पैठणीमध्ये काही फरक आहे का?
येवला आणि औरंगाबादमधील पैठण या दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट पैठणी मिळतात. फरक असलाच तर तो फक्त किमतीत तुम्हाला जाणवेल. अन्यथा त्याच्या दर्जामध्ये तुम्हाला कोणताही फरक जाणवणार नाही. तुम्हाला या दोन्ही ठिकाणी उत्तम दर्जाच्या पैठणीच मिळतील.