ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
गौराईला साडी कशी नेसवावी

गौराईला साडी कशी नेसवावी | How To Drape Gauri Saree

आपल्याकडे गणपती बाप्पाला नेहमीच महत्त्व देण्यात आले आहे. धर्म कोणताही असो बाप्पाची पूजाअर्चा होत नाही अथवा बाप्पापुढे कोणी नतमस्तक होत नाही असं अजिबात नाही. आपल्याकडे तर बाप्पाला इतके पूजतात की, नव्या बाळाचे नावही गणपतीवरून ठेवले जाते. अशाच बाप्पाचा सण आपल्याकडे माघ आणि भाद्रपदमध्ये साजरा करण्यात येतो आणि यावेळी महत्त्व असते ते गौराईचेदेखील. गौराई अर्थात गणपती बाप्पाची आई. यावेळी गौरी पूजण्याचे जितके महत्त्व असते तितकेच गौराईला साडी नेसवण्याचे महत्त्वही असते. गौरीच्या आगमनाची खास तयारी घराघरांमध्ये करण्यात येते आणि त्यासाठी गौराईला साडी कशी नेसवावी (How To Drape Gauri Saree In Marathi) याचेही खास प्रशिक्षण घेण्यात येते. गौरीला साडी नेसवणे ही एक खरं तर कला आहे. ती सर्वांना जमतेच असं नाही. त्यामुळे घरी आलेल्या लक्ष्मीला साडी कशी नेसवावी अथवा गौराईला साडी कशी नेसवावी याची माहिती घ्या जाणून. 

गौराईला साडी कशी नेसवायची | Gaurila Sadi Kashi Nesvaychi

घरी येणाऱ्या गौराई या सगळीकडेच विविध रूपात असतात. काही ठिकाणी आपल्याला खड्यांच्या गौरी पाहायला मिळतात तर काही ठिकाणी गौरी उभ्या असतातय काही जणांच्या घरात मुखवट्याच्या तांदूळ आणि गव्हात बसणाऱ्या गौरी असतात. या गौरी येणार म्हटल्यावर त्यांना नटवण्याचं आणि साडी नेसवण्याचं काम आलं. हे काम अत्यंत बारकाईने करावं लागते आणि त्यासाठी तुमच्या अंगी कलाही लागते. काही जणांना मात्र या उभ्या गौरींना कशी साडी नेसवायची ही पद्धत माहीत नसते.  तीच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. घरात गौरी तीन दिवस असल्या तरीही त्यांच्या येण्याने एक आगळं वेगळं रूपच येतं. शांत सुंदर आणि आखीव रेखीव अशा गौरी खूपच मनमोहक असतात आणि त्यांना साडी नेसवून आणि पूजन करून तर अधिक प्रसन्नता वाटते. गौरीला साडी नेसवून तिला दागिने घालून तयार करणं हे सर्वात आवडतं आणि कलात्मक काम आहे. जाणून घेऊया कशी नेसवायची गौरीला साडी. गौराई सजली की तिचं ते देखणं रूप डोळ्यात भरून घ्यावंसं वाटत राहातं. त्यात सर्व अलंकरारांनी अशी गौराई अर्थात लक्ष्मी अधिक देखणी दिसते. 

लक्ष्मीला साडी कशी नेसवावी (Step by Step)

गौराईला साडी कशी नेसवावी
Instagram

घरात आलेली गौरी अर्थात लक्ष्मीला साडी कशी नेसवावी हे जाणून घेऊया. त्यासाठी सर्वात आधी घरातील गौरींच्या मूर्ती उभ्या करून घ्याव्या लागतात. आधीच्या काळी अर्थात खूप जुन्या पद्धतीनुसार डब्यांवर डबा ठेऊन मग त्यावर एक तांब्या ठेऊन त्यात गौरीचा मुखवटा ठेवण्यात येत असे. आजही काही ठिकाणी ही पद्धत वापरण्यात येते. धान्याच्या कोठ्यांमध्ये अशी गौर बऱ्याच ठिकाणी असते. तर काही ठिकाणी गौरीचे खास सांगाडे  तयार करून घेण्यात येतात. तयार गौरी असतील तर काहीच अडचण येत नाही. मात्र इतर काही प्रकारांनी गौर उभी करायची असेल तर मानेभोवती उलटा हँगर बांधून घ्यावा लागतो. म्हणजेच अडकवायची बाजू मागे ठेवा  आणि खांदे तयार करून घ्या. सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे गौरीला साडी नेसवणं. प्रत्येकाकडे साडी नेसवायची वेगळी पद्धत असते. मात्र बऱ्याच ठिकाणी पाचवारी साडीच नेसवली जाते. आपण पाहूया स्टेप बाय स्टेप गौराईला साडी कशी नेसवावी. 

 • गौरीला ब्लाऊज तुम्ही रंगाने काढला असेल तर ब्लाऊजची गरज भासत नाही. मात्र नसेल तर त्याऐवजी तुम्ही ओढणी अथवा साडीचा वापर ब्लाऊज म्हणून करू शकता
 • गौरीचा मुखवटा बसविण्यासाठी स्टँडचा वापर करा
 • साडीच्या निऱ्या करून तुम्ही अर्ध्यामध्ये दुमडा आणि व्यवस्थित पिनअप करून घ्या
 • निऱ्या आधी काढल्यामुळे गौरीला साडी नेसवणं सोपं जातं
 • निऱ्या काढून झाल्यावर तुम्ही आधी कंबरेखाली नेसून घ्या 
 • त्यानंतर स्टॅँडवर मुखवटा नीट बसवा 
 • त्यानंतर पदर काढून तो खांद्यावर टाका
 • तांब्यामध्ये मुखवटे असतील तर तुम्ही केवळ ब्लाऊज आणि छोट्या ओढणीचा वापर करूनही गौरीला साडीप्रमाणे नेसवण्याचे काम करू शकता. यामध्ये केवळ तुम्हाला लक्षात ठेवावे लागते की, साडी नेसवताना मुखवट्याला कुठेही धक्का लागू देऊ नये. तसंच तांदूळ आणि गहू खाली असल्यामुळे ही साडी नेसवताना अत्यंत काळजी घ्यावी लागते. 
 • बसलेल्या गौरींना साडी नेसवायची असेल तर थोड्या लहान स्टँडचा वापर करून गौरींना बसवा
 • गौरीचे पाय हे लेगिंग्जमध्ये घालून तारेने बांधून घ्या. म्हणजे साडी नेसवणे सोपे होते

टीप 

ADVERTISEMENT
 • गौरींसाठी शक्यतो सहावारी साडी वापरावी. नऊवारी हौशीसाठी वापरायला हरकत नाही. पण बऱ्याचदा ही साडी नेसवताना जास्त थकायला होतं. सहावारी साडी नेसवायला जड नसते आणि सोप्या पद्धतीने नेसवता येते. तसंच यासाठी कोणाची मदतही लागत नाही. तुम्ही एकट्यानेही हे काम करू शकता
 • मांडणी आधीच तयार करून घ्यावी. जेणेकरून गौरीचे मुखवटे बसवणे सोपं होतं
 • मांडणीला व्यवस्थित साडी गुंडाळून घेतल्यास, गौरीच्या मुखवट्यावर साडी नीट चापूनचोपन बसवता येते
 • मांडणी टेबलला खिळ्यांनी ठोकून घ्या म्हणजे धक्का लागून पडण्याचा धोका टळतो. सहसा गौराई अथवा मुखवटे हलण्याचा अथवा धक्का लागण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे याची काळजी घेत तुम्ही साडी नेसवणे अधिक योग्य ठरते   

गौराईसाठी वैशिष्ट्यपूर्ण साड्या

गौराईला साडी कशी नेसवावी
Instagram

गौराईच्या स्वागताची तयारी करताना घरातील महिला आवर्जून तिच्या पेहरावाचीही तयारी करत असतात. यासाठी खास आणि जय्यत तयारी ही आधीपासूनच केली जाते. गौरी येणार म्हटल्यावर तिच्यासाठी सहावारी आणि नऊवारी साड्या बाजारात पाहिल्या जातात. सहसा गौराईला जरीच्या आणि भरजरी साड्याच नेसविण्यात येतात. हल्ली बाजारामध्ये गौराईसाठी खास वैशिष्ट्यपूर्ण साड्यांचे डिझाईन्सदेखील आले आहेत. इतर कोणत्याही कपड्यांऐवजी खास मोराच्या काठांची पैठणी अथवा जरीची पैठणी, खण साडी, हँडवर्क इरकल, बनारसी सिल्क अथवा सिल्कच्या साड्यांना वाढती मागणी आहे. याशिवाय गौरी उभ्या आहेत की बैठ्या आहेत यानुसार बाजारामध्ये अनेक प्रकारच्या साड्या शिऊनही मिळतात. यामध्ये नऊवारी साडी असेल तर अधिक मागणी आहे. गौराईसाठी नऊवारी साडी हवी असेल तर ब्राम्हणी नऊवारी, पेशवाई अथवा मस्तानी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पैठणी नऊवारीदेखील शिऊन मिळतात. तसंच हल्ली खणाच्या कपड्यांची जास्त क्रेझ आहे. त्यामुळे गौरीसाठी खणाच्या साड्याही विविध डिझाईन्समध्ये उपलब्ध असतात. त्या तुम्ही वापरू शकता.  

गौराई साड्यांची किंमत

आपल्याकडे कोणत्याही धार्मिक कार्यासाठी कधीच काटकसर अथवा पैशाच्या मागे हात आखडता घेतला जात नाही. तरीही प्रत्येक घरात साधारण प्रत्येक गोष्टीसाठी किती खर्च करायचा हेदेखील गणित ठरलेले असते. गौराईच्या साड्यांच्या किमतीच्या बाबतीतही असेच आहे. गौराई साड्यांची किंमत साधारण किती आहे याचाही अंदाज आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्ही त्याप्रमाणे गौराईच्या साड्या निवडून विकत घेऊ शकता. 

गौराईसाठी शिऊन घेतलेली नऊवारी साडी – 2000 – 5000 (पैठणी, खण साडी)

नऊवारी साडी – 500 रूपयांपासून (साधी काठापदराची साडी)

ADVERTISEMENT

सहावारी साडी शिऊन घेतलेली – 1500 – 4500 (यामध्ये अधिक महाग साड्यादेखील मिळतात)

सहावारी साडी – 500 रूपयांपासून (तुमच्या आवडीनुसार)  

गौरीसाठी सहसा महिलांकडून साड्या शिऊनच घेतल्या जातात. हल्ली ऑफिस आणि घरातील कामांमध्ये साडी नेसवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे शिऊन घेण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र काही घरांमध्ये आजही अगदी पारंपरिक पद्धतीने गौराईला साडी नेसविण्याची पद्धत तशीच चालू आहे. आजही महाराष्ट्रीयन पद्धतीलाच अधिक प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे बाजारामध्ये सहसा गौरीसाठी साड्या हा महाराष्ट्रीयन पद्धतीच्या आणि प्रत्येकाच्या खिशाला परवडतील अशाच मिळतात. 

फेट्याचा वेगळेपणा 

आजकाल आपल्याला वेगवेगळे ट्रेंडही पाहायला मिळत आहेत. गुढीपाडव्याला ज्याप्रमाणे महिला आपल्यासाठी साडीवर फेटा बांधून शान वाढतात. त्याचप्रमाणे गौराईला साडी नेसवल्यावर पैठणीचा फेटाही बाजारामध्ये पाहायला मिळतो. फेट्याचा वेगळेपणा हल्ली अनेकांना आवडायला लागला आहे. आपल्याही घरातील गौराईंना फेट्यात पाहावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच फेट्याचे वेगळेपण आजमावू शकता. गौरीच्या पारंपरिक लुकसाठी हा अत्यंत चांगला दिसतो. तसंच काही विक्रेत्यांकडून लक्ष्मीसाठी अर्थात गौराईसाठी नऊवारी साडी शिवण्यासह फेटा शिवण्याचेही प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात आले आहे. सहसा या फेट्यांची किंमतही अगदी वाजवी असते. त्यामुळे पारंपरिकता जपून गौराईला साडी नेसविण्यासह हा फेटाही आता हल्ली घालण्यात येतो आणि शान वाढविण्यात येते. 

ADVERTISEMENT

तुमच्याही घरी गौरी येत असेल आणि तुम्हाला काही वेगळेपणा हवा असेल तर नक्की तुम्ही गौरीसाठी वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार पाहा आणि त्यानुसार आपल्या गौरीला सजवा. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 

18 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT