जगभरातील क्रिकेट फॅन्स #CWC2019 च्या रंगात रंगलेले आहेत. ज्याचा थेट परिणाम जाहिरातींवरही दिसून येत आहे. त्यामुळे वेगवेगळे नामवंत ब्रँड्स क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित खास जाहिराती बनवत आहेत. त्यातच भर म्हणजे रविवारी, 16 जूनला होऊ घातलेला भारत विरूद्ध पाकिस्तान हा सामना. याच सामन्याआधी पाकिस्तानने एक आक्षेपार्ह जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. पाकिस्तानी टीव्ही चॅनलच्या या जाहिरातीमध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं डुप्लिकेट कॅरेक्टर दाखवण्यात आलं आहे. 33 सेकंड्सच्या या व्हिडिओमध्ये अभिनंदन यांची नक्कल करण्यात आली आहे.
बिग बी, किंग खानसह संपूर्ण बॉलीवूडने केला ‘विंग कमांडर अभिनंदन’ यांच्या शौर्याला सलाम
या जाहिरातींवर सोशल मीडियावर खूप टीका होत आहे. या जाहिरातीत अभिनंदन यांच्यासारख्या दाढीमिशा असणारा माणूस भारतीय क्रिकेट जर्सीमध्ये दाखवण्यात आला आहे. जो चहा पीत आहे आणि त्याला प्रश्न विचारण्यात येत आहेत. तो वारंवार फक्त एवढंच म्हणत आहे की, मला माफ करा. मला तुम्हाला हे सांगता येणार नाही. तो माणूस यात खूपच खराब साऊथ-इंडियन अक्सेंटमध्ये बोलत आहे. ज्यामुळे भारतीय प्रेक्षकांचा राग नक्कीच वाढेल.
पाहा ही जाहिरात :
Jazz TV advt on #CWC19 takes the Indo-Pak air duel to new level. It uses the air duel over Nowshera and Wing Co Abhinandan Varthaman’s issue as a prop. @IAF_MCC @thetribunechd @SpokespersonMoD @DefenceMinIndia pic.twitter.com/30v4H6MOpU
— Ajay Banerjee (@ajaynewsman) June 11, 2019
या वाईट जाहिरातींमुळे नेटिझन्सच्या टीकेचा सूर वाढला आहे.
1. आम्हालाही अजिबात आवडलेलं नाही.
2. नक्कीच लज्जास्पद
3. दॅट्स द पॉईंट!
4. रेसिस्ट
5. शेर आया, शेर!
खरंतर पाकिस्तानने ही जाहिरात भारताने दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित केलेल्या जाहिरातीला बघून बनवली आहे. ज्याची टॅगलाईन आहे बाप..रे बाप. योगायोगाने रविवारी होणाऱ्या भारत विरूद्ध पाक सामन्याच्या दिवशी फादर्स डे सुद्धा आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. पाहा भारत-पाक सामन्यांसाठी खास बनवण्यात आलेली ही भारतीय जाहिरात –
This #FathersDay, watch an ICC #CWC19 match jo dekh ke bas bol sakte hain, “baap re baap!” 😉
Catch #INDvPAK in the race for the #CricketKaCrown, LIVE on June 16th, only on Star Sports! pic.twitter.com/Apo3R8QrbO
— Star Sports (@StarSportsIndia) June 9, 2019
तुम्हाला काय वाटतं या दोन्ही जाहिरातींबद्दल? आम्हालाही सांगा. तुम्हीही रविवारी होणाऱ्या भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यांसाठी उत्सुक आहात का?
फोटो सौजन्य : Twitter
हेही वाचा –
जाहिरात विश्वात बाजीराव-मस्तानीची जोडी सर्वाधिक लोकप्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली खिलाडी अक्षय कुमारची फिरकी