समाजात स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणूकीवर प्रकाश टाकणारे अनेक चित्रपट आतापर्यंत निर्माण झाले आहेत. या महत्त्वाच्या विषयावर आणखी एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. या विषयावर आधारित ‘झी टॉकीज’ ही मराठी चित्रपट वाहिनी ‘गोल गोल गरा गरा’ हा टॉकीज ओरिजिनल चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या सिनेमातील दादा दांडेकर यांच्या घरी स्त्रियांना प्रवेश नाही. मात्र या दांडेकर कुटुंबातील बाळ नावाच्या तरूणाच्या प्रेमात पडली आहे प्राची. आपलं हे प्रेम मिळवण्याची तिची धडपड आणि संघर्ष या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. ‘गोल गोल गरा गरा’ हा चित्रपट रविवार 15 मार्च रोजी या वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. यात प्राचीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पल्लवी पाटील हिने या चित्रपटातील तिच्या या भूमिकेबाबत काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत.
काय आहे प्राचीचा संघर्ष –
गोल गरा गरा या चित्रपटात ‘पल्लवी पाटील’ ही प्राचीची भूमिका साकारत आहे. तिचं आपल्या प्रियकरावर खूप प्रेम आहे. प्राची मुंबईत लहानाची मोठी झालेली, स्वतःच्या पायावर उभी असलेली ही मुलगी अलिबागच्या एका मुलाच्या प्रेमात पडते. आपल्या बाबांची लाडकी प्राची, खूप भावनिक आणि मोठी स्वप्नं पाहणारी आहे. तिच्या प्रियकराच्या घरी मुली आलेल्या चालत नाहीत, हे तिला कळल्यावर ती काय शक्कल लढवते हे चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या लक्षात येईल.
पल्लवी आणि प्राचीमध्ये काय आहे साम्य –
कुठलीही नवी गोष्ट करत असताना, प्राची स्वतःला त्यात झोकून देते. पल्ल्वी सुद्धा नव्या गोष्टी करताना त्यात पूर्णपणे स्वतःला वाहून घेते. त्यामुळे पल्लवी आणि प्राची यांच्यात साम्य आहे, हे नक्की! स्त्रीला दुय्यम स्थान देणाऱ्या पुरूषांबाबत विचारल्यावर पल्लवी म्हणते, “अशा व्यक्तीला पुरुषच नाही, तर माणूस असण्याचा दर्जा सुद्धा मी देणार नाही. आदर देण्याबद्दल म्हणाल, तर पुरुषांनी स्त्रियांना योग्य आदर द्यायला हवा, असं आपण नेहमी म्हणत असतो. पण, तीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा लागू होते. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला योग्य तो आदर द्यायलाच हवा. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांकडून अशा घटना जास्त प्रमाणात घडतात ही गोष्ट खरी आहे. स्त्रियांना आपण देत असलेली वागणूक चुकीची आहे, ती थांबली पाहिजे हे त्या पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे. जेव्हा ती पुरुषमंडळी ते समजून घेतील, त्यांना ही जाणीव करून देणाऱ्या व्यक्ती सगळ्यांच्या आयुष्यात असतील, त्याचवेळी समाजातील ही परिस्थिती बदलू शकेल.”
चित्रपटातील कलाकारांची टीम –
अतुल काळे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत .गिरीश ओक, सुशांत शेलार, उदय टिकेकर, अभय राणे, प्रतीक देशमुख हे कलाकार यात आहेत. पल्लवी सांगते, “या अभिनेत्यांसह आमचे दिग्दर्शक अतुल काळे यांच्यासह काम करायला सुद्धा खूप मजा आली. सगळ्याच जणांनी मला छान समजून घेतलं. गिरीश सर आणि उदय टिकेकर यांच्यासोबत मी पहिल्यांदाच काम करत होते; त्यांच्यासोबत मजा करत करत काम करायचा अनुभव घेता आला.सगळ्यांनी खूप धमाल करून काम केलेलं असल्याने हा चित्रपट छान जमून आलाय असं मी नक्की म्हणेन. त्यामुळे बऱ्याच गमतीजमती घडलेल्या आहेत. विनोदी भूमिका साकारणं मला खूप आवडतं, पण अशा प्रकारच्या भूमिका करण्याची संधी अजून फारशी मिळालेली नाही. ‘गोल गोल गरा गरा’च्या निमित्ताने ही संधी मला मिळाली.माझा सहकलाकार ज्यावेळी खूप उत्तमरित्या काम करत असेल, त्यावेळी मी प्रेक्षक बनून जाते. कलाकार म्हणून उभी असूनही, मी प्रेक्षकांप्रमाणे त्यांचा अभिनय अनुभवत असते. या चित्रपटातील सगळेच कलाकार उत्तम आहेत. त्यामुळे असं बऱ्याचदा घडलं, की मी माझं हसणं आवरू शकले नाही. एखादा सीन शूट करत असताना मला मधेच हसायला आल्यामुळे, बऱ्याचदा तो प्रसंग पुन्हा चित्रित करावा लागलेला आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –
प्रेमात असूनही लग्न करु शकल्या नाहीत या सेलिब्रिटी जोड्या
प्रसिद्धीसाठीच केले आरोप – सना खानची ऑडिओ क्लीप झाली लीक
या बॉलीवूड कलाकारांनी चित्रपटातील भूमिकेसाठी स्वतःच्या वजनात केले असे बदल