ADVERTISEMENT
home / पालकत्व
dealing with disrespectful children

लहान मुले होत आहेत दिवसेंदिवस उद्धट, पण त्यामागे ही कारणे आहेत 

तुमचे मूल तुमच्याशी आदराने वागत नाही का? ते तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उलट उत्तर देतात का? जर तुमचे उत्तर हो असेल तर ही चिंतेची बाब आहे.मुलांच्या अशा वागण्यामागे पालक आणि त्यांची संगोपनाची पद्धत जबाबदार असू शकते. कारण आपण आपल्या मुलांना अशा प्रकारे वाढवतो की ते मोठे झाल्यावर आक्रमक आणि निर्भय बनतात. अशा परिस्थितीत ते आपल्या पालकांचे ऐकत नाहीत आणि नंतर त्यांचा आदरही कमी करतात. म्हणूनच लहानपणापासूनच मुलाला वाढवताना प्रत्येक पालकाने काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 

मुले खरंच उद्धट झाली आहेत की स्पष्टवक्ती

हल्ली सगळीकडे हीच ओरड ऐकायला मिळतेय की आजकालच्या मुलांना बोलण्याची पद्धत राहिली नाही. हल्लीची मुले उद्धट होत चालली आहेत. प्रत्येक गोष्टीत मोठ्यांना उलट उत्तरे देतात, प्रत्येक गोष्टीत वाद घालतात. मोठ्यांचे ऐकत नाहीत. पण ही काही आजची समस्या नाही. प्रत्येक पिढीला असे वाटते की पुढची पिढी ही आपले ऐकत नाही. आपल्याच मर्जीने वागते. आमच्या वेळेला हे असं नव्हतं. नवी पिढी बिघडली आहे हे प्रत्येक नव्या पिढीने जुन्या पिढीकडून ऐकले असते. पण खरंच हल्लीची मुले बिघडली आहेत का? हल्लीची पिढी बिघडली आहे म्हणजे नेमके काय झालेय? 

Dealing With Disrespectful Children
Dealing With Disrespectful Children

मुले त्यांचं म्हणणं भीडभाड न ठेवता स्पष्ट सांगतात म्हणजे ती उद्धट झाली आहेत असे नव्हे! किंवा ती सगळ्या गोष्टीत लॉजिक शोधतात आणि प्रश्न विचारतात म्हणजे ती तुमच्या मताचा अनादर करतात असेही नाही. हा! खरच विचित्र वागून अपमान करणे, वाईट बोलून अनादर करणे हे कुठल्याही काळात चूकच आहे. पण “मी सांगतोय म्हणून कर!” हे लॉजिक जुन्या पिढ्यांनी समजून घेतले, किंबहुना मोठ्यांच्या भीतीने प्रश्न विचारले नाहीत की त्यात लॉजिक शोधले नाही, पण नव्या पिढीला तुम्ही “मी सांगतोय म्हणून एखादी गोष्ट कर” हे लॉजिक पटत नाही. पण तरीही तुमची मुले तुमच्याशी विनाकारण वितडवाद घालत असतील, उद्धटपणा करत असतील तर त्यासाठी तुम्हीही काही गोष्टी पाळायला हव्यात. मुलांशी पुढील पद्धतीने बोलणे टाळावे. 

रडणे थांबव, जास्त नाटके करू नकोस 

बहुतेक पालक आपल्या मुलांना असे बोलतात, ज्याचा मुलांवर खूप वाईट परिणाम होतो. असे बोलल्याने मुलांच्या भावना दुखावतात. त्यांना असे वाटते की त्यांच्या पालकांना त्यांच्या भावना समजत नाहीत आणि त्यांचा मुद्दा स्पष्टपणे किंवा मोकळेपणानेमांडल्यावर पालक त्यांना रागावतात. पालकांना हे समजले पाहिजे की मुले काही कारणास्तव रडत आहेत कारण ती अस्वस्थ आहेत. तुम्ही अशा पद्धतीने मुलांच्या भावनांना नाटके समजलात तर त्यांच्यात नकारात्मक भावना येऊ लागतात, आणि पुढे त्यांना काही अडचण आली तर ते तुम्हाला काही सांगत नाहीत आणि त्यांच्या मनात तुमच्याविषयी असणारा आदर कमी होतो. म्हणूनच मुलांच्या कोवळ्या भावना समजून घ्या. 

ADVERTISEMENT
Dealing With Disrespectful Children
Dealing With Disrespectful Children

तू मूर्ख / गाढव आहेस 

नकारात्मक किंवा आक्रमक वागण्याने मुलांच्या कोवळ्या मनावर खूप वाईट परिणाम होतो. आणि म्हणूनच, जेव्हा ते मोठे होऊ लागतात तेव्हा यामुळे ते रागीट आणि बंडखोर होतात आणि त्यांच्या मनात तुमच्याविषयी आदर उरत नाही. तुमच्या आक्रमक वागण्यामुळे मुलांना स्वतःमध्ये कमतरता जाणवू लागते, त्यांना वाटते की ते तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. यामुळे त्यांच्यात नैराश्याची भावना वाढते आणि त्यांना वाटते की त्यांनी काहीही चांगले केले तरी तुम्ही त्यांना मूर्खच समजाल.

तुलना करणे 

तुलना सर्वच वयोगटातील लोकांसाठी घातक ठरू शकते, मग लहान निरागस मुलांचे काय, त्यांची तुम्ही इतर मुलांशी तुलना करता तेव्हा त्यांच्या मनावर परिणाम होतो. त्यामुळे पालकांप्रती त्यांच्या मनात चुकीची प्रतिमा निर्माण होते आणि त्यांच्या नजरेत तुम्हाला महत्त्व उरत नाही. म्हणूनच आपण आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी किंवा त्यांच्या भावंडांशी कधीही करू नये. प्रत्येक मूल खास आहे हे लक्षात घ्या.

तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही पाळल्या तर तुमचे मूल तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही आणि तुम्हाला पूर्ण आदर देईल.

फोटो क्रेडिट – istockphoto

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

27 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT