ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
parents-quotes-in-marathi

आई – वडिलांवरील खास पेरेंट्स कोट्स | Parents Quotes In Marathi

आई – वडील अर्थात पालक हे आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असतात. आई – वडील नसलेल्या मुलांनाही अनेक जण सांभाळतात आणि असे पालक आई – वडिलांपेक्षाही अधिक मोठे समजण्यात येतात. आपल्या पालकांसाठी असेच काही कोट्स (Quotes On Parents In Marathi) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पालक हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पालक नसेल तर कोणतेही पाल्य आयुष्याला योग्य दिशा मिळवू शकणार नाही. आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या अशा पालकांसाठी काही खास कोट्स मराठीतून (Quotes On Parents In Marathi).

आई-बाबांसाठी पालक म्हणून कोट्स – Parents Quotes In Marathi

आई - बाबांसाठी पालक म्हणून स्टेटस - Parents Quotes in Marathi
Parents Quotes In Marathi

आई – वडिलांचे प्रेम हे असते असते जे आपल्या जन्मापासून कधीही बदलत नाही. वेळोवेळी कठोर वागणारे आई-वडील हे आपल्या आयुष्याचे सार्थक व्हावे आणि आयुष्यात आपल्याला येणाऱ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी बळकट व्हावे यासाठीच तसे वागतात. अति लाडावून ठेवणं हे कोणत्याच आई – वडिलांना आवडत नाही. पण आपल्या बाळासाठी कायम प्रेम आणि जिव्हाळा हे त्यांच्या मनात आणि वागणुकीतून दिसून येत असते. अशाच आपल्या पालकांसाठी काही स्टेटस 

1. मनातलं ओळखणारी आई आणि भविष्य घडविणारा बाप हे पाल्याचे एकमेव ज्योतिषी असतात. पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

2. देवा त्या पायांना नेहमी सुरक्षित ठेव ज्यांच्यामुळे मी आज माझ्या पायावर उभी आहे – माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

3. स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला ‘आई’ म्हणतात, पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला ‘बाप’ म्हणतात. पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

4. आईच्या ममतेचा आणि बाबांच्या क्षमतेचा अंदाज लावणं हे नक्कीच कठीण आहे अशा माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

5. ज्याला आई – बापाच्या कष्टाची जाणीव आहे तो कधीच वाईट मार्गाला लागत नाही, हेच आयुष्याचं सत्य आहे 

6. आई – वडील अर्थात आपले पालक सोडल्यास जगात आपली कदर कोणालाच नसते हे नेहमी लक्षात ठेवा 

ADVERTISEMENT

7. आपल्यातले सगळ्यात सुप्त गुण ओळखणारे हे आपले पालकच पहिले असतात. अशा माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

8. आयुष्यात साथ देणारे एकच नाते ते म्हणजे आई – वडिलांचे. आज पालक दिनाच्या दिवशी अशा माझ्या अनमोल आई – वडिलांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

9. सात जन्मासाठी इतर काही मागण्यापेक्षा मला हेच आई – वडील दे हीच इच्छा आज पालक दिनाच्या दिवशी मी व्यक्त करेन

10. आई वडिलांचं प्रेम हे समुद्राप्रमाणे असतं, त्याची सुरूवात तुम्हाला पाहता येते मात्र त्याचा शेवट कधीही दिसत नाही

ADVERTISEMENT

11. अथांग समुद्राप्रमाणे या आयुष्यात जर काही असेल तर ते म्हणजे आपल्या पालकांचे आपल्यावर असणारे प्रेम – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

12. या जगात असे एकच न्यायालय आहे, जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आई – वडिलांचे मन

13. आईशिवाय असतं घर अपुरं आणि बापाशिवाय असतं आयुष्य अधुरं – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

14. आई असते घराचे मांगल्य आणि बाप असतो घराचं अस्तित्व, पालक दिनाच्या दिवशी अशा आपल्या आधाराला द्या आदर!

ADVERTISEMENT

15. आई – वडील कितीही अशिक्षित असो पण आयुष्यातील सर्वात जास्त अनुभवाचा खजिना असतो तो म्हणजे आपले पालक 

16. आईच्या चरणामध्ये स्वर्ग असेल तर या स्वर्गाचे दार म्हणजे वडील – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

17. आयुष्यात काहीही नसेल तरीही चालेल पण आई – वडिलांचा आशीर्वाद आणि डोक्यावर हात हा महत्त्वाचा आहे – Happy Parents Day!

18. जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं हे वडिलांच्या कर्तव्यासाठी – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

19. कोण म्हणतं बालपण परत येत नाही. एकदा वेळ काढून आपल्या पालकांजवळ बसून तर पाहा!

20. आई – वडिलांच्या कष्टाची जाणीव असणाऱ्या व्यक्तीचं कधीच वाईट होत नाही हे कायम लक्षात ठेवा

21. निःस्वार्थी प्रेम कोणी करत असेल तर ते म्हणजे आपले पालक – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

22. देवाची पूजा करून आई – बाबा मिळवता येत नाहीत. पण आई – बाबांची पूजा करून देवाची कृपा नक्कीच मिळवता येते

ADVERTISEMENT

23. व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व आणि पितृत्व 

24. शब्द नाही तर भावना महत्त्वाच्या असतात, हे केवळ आपल्या पालकांमुळेच कळतं – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

25. वेळ निघून गेल्यावर कळतं की आई – वडिलांनी दिलेली शिकवण नेहमी योग्य असते 

पालकांसाठी भावनिक कोट्स मराठीतून – Emotional Quotes On Parents In Marathi

पालकांसाठी भावनिक कोट्स मराठीतून - Emotional Quotes On Parents In Marathi
Emotional Quotes On Parents In Marathi

आपले आई – वडील अर्थात आपले पालक हे प्रत्येकाला प्रिय असतात. आयुष्यात अशी एक वेळ असते की, प्रत्येकाचेच आपल्या आई – वडिलांसह पटत नाही. कारण आपले आईवडील हे आपल्याला खूप बोलतात अथवा आपल्याला उपदेश देतात असं वाटत असतं. पण आयुष्यात खंबीरपणे उभं राहायचं असेल तर आपल्या पालकांचे हेच उपदेश आयुष्यात कामी येतात. पालकांसाठी असेच काही कोट्स मराठीतून (Quotes On Parents In Marathi).

ADVERTISEMENT

1. वेळ बदलते,काळ बदलतो परिस्थिती बदलते, माणसं बदलतात

पण आईवडिलांच प्रेम कधीच बदलत नाही कारण ते प्रेम निस्वार्थ असतं

जगातील सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

2. आपल्या पाल्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या आणि पाल्याचे भविष्य चांगले घडविण्यासाठी अविरत झटणाऱ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

3. मातृ देवो भव..पितृ देवो भव…पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

4. आईची प्रेमळ माया आणि बाबांची वटवृक्षाची छाया…जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

5.  आई वडिलांची कोणतीही गोष्ट सोडा पण कधीही कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका…पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

6. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे आपल्या पालकांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे येणारा आनंद आणि समाधान!

ADVERTISEMENT

7. आई – वडिलांचे अर्थात आपल्या पालकांचे मन जिंकले नाही तर संपूर्ण जग जिंकूनही काही फायदा नाही हे कायम लक्षात ठेवा 

8. स्वतःआधी जे तुमचा विचार करतात ते म्हणजे तुमचे आई – बाबा. अशा तुमच्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

9. मार दिल्यानंतरही स्वतःला त्रास करून घेतात ते असतात आई – बाबा – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

10. जगात सगळ्यांचे ऋण फेडता येतात, पण आई – वडिलांचे ऋण फेडणं कधीही शक्य होत नाही. आपल्या पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

11. आई – वडीलच असे गुरू आहेत, जे आपल्या आनंदाशिवाय कधीच काही मागत नाहीत 

12. पालकांचा हात पाठिशी असेल आणि डोक्यावर आशीर्वाद असेल तर काहीच कठीण नाही  

13. आई – वडील हे वयाने नाही तर काळजीने लवकर म्हातारे होतात, हेच जगातील कटू सत्य आहे. अशा आपल्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

14. बाळ रडल्यावर संपूर्ण जगाला कळतं पण आई – वडिलांना झालेल्या यातनेचा पत्ता कोणालाही नसतो – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

15. पालकांवर विश्वास ठेवला तर जगात कधीच धोका या शब्दाचा तुम्हाला प्रत्यय येणार नाही  

16. हजारो माणसे भेटतील आयुष्यात पण आपल्या चुका पदरात घालणारे पालक कधीच परत भेटणार नाहीत – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

17. आई – बाबांचे थोर आहेत उपकार, त्यांनीच केला माझ्या आयुष्याचा उद्धार – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

18. कसं जगायचं आणि कसं वागायचं हे शिकवतात ते म्हणजे तुमचे पालक – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

19. तुमच्या आयुष्यात न संपणारे आनंदाचे क्षण कायम येत राहोत. अशा माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

20. नमस्कार न करताही आपल्याला कायम आशीर्वाद देणाऱ्या व्यक्ती म्हणजे आपले पालक 

21. जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पण आईची माया आणि बापाचे प्रेम कितीही पैसे खर्च करून मिळणार नाही – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

22. मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते. पालकांचे नातेही असेच असते. पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

23. आईविना घर वाटतं रिकामं आणि बापाविना आयुष्य, म्हणूनच तुमच्या आयुष्यातील या दोन व्यक्तींना कायम जपा! – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

24. जगातील अनमोल गोष्ट काहीही असेल तर ती म्हणजे आपले पालक कारण त्यांच्यासारखे प्रेम आपल्यावर कोणीही करू शकत नाही – पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

25. माझे पाय मी भक्कम रोवून उभी आहे कारण मला माझ्या पालकांचा आधार आहे. अशा माझ्या आधारस्तंभाला पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पालक अर्थात आई – वडील म्हणजे आपल्या जीवनाचा आधारस्तंभ असतो. अशा आपल्या आईवडिलांसाठी अर्थात पालकांसाठी हे खास कोट्स (Quotes On Parents In Marathi)

ADVERTISEMENT
18 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT