ADVERTISEMENT
home / Fitness
कोरोनाचा लहान मुलांमधील वाढता संसर्ग टाळण्याचा बालरोगतज्ज्ञांचा इशारा

कोरोनाचा लहान मुलांमधील वाढता संसर्ग टाळण्याचा बालरोगतज्ज्ञांचा इशारा

कोव्हिड संसर्गाच्या घटनांची शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येणारी तिसरी लाट लहान मुलांकरिता अधिक धोकादायक ठरणार असल्याची प्रतिक्रिया बालरोगतज्ज्ञांनी दिली आहे. खराडी पुणे येथील मदरहुड हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. तुषार पारेख यांच्याकडून आम्ही अधिक जाणून घेतले आहे. बहुतेक मुलांमध्ये सौम्य तसेच गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसून आली असून अशा मुलांवर देखील यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आहेत.दुस-या लाटेपेक्षा तिस-या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असण्यामागचे एक कारण असे देखील आहे. प्रौढांमध्ये लसीकरण झालेले असून लहान मुलांमध्ये लस देण्याबाबत अजूनही संभ्रम आहे. लसीकरणामुळे प्रौढांमध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी होऊ शकते तर लहानांमध्ये हे प्रमाण वाढू देखील शकते असे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

एक वर्षापर्यंत लहान मुलाला नक्की काय द्यायचे खायला, अन्यथा होतील वाईट परिणाम

मागील वर्षाशी तुलना

मागील वर्षाशी तुलना

Freepik

ADVERTISEMENT

जर आपण या वर्षाची तुलना मागील वर्षाशी केली तर यावर्षी अधिक मुलांना त्रास होतो. कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुस-या लाटेत  ताप, अतिसार, सर्दी आणि खोकला यांसारखी लक्षणे दिसून आली. घरातल्या प्रौढ व्यक्तींमध्ये तीव्र लक्षणे असल्याने, मुलांना देखील त्याचा संसर्ग होऊ शकतो. जरी लहान मुलांना जास्त त्रास होत नसला तरीदेखील ते संसर्गाचे वाहक ठरू शकतात. बालरोगतज्ञांच्या म्हणण्यानुसार 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी तिसरी लाट अधिक गंभीर असू शकते. 12 ते 18 वयोगटातील मुलांना देखील लस मिळावी याकरिता असलेल्या प्रस्तावाला अजून मान्यता मिळालेली नाही. रोग बरा करण्यापेक्षा प्रतिबंधांत्मक उपायांचा अवलंब करूने अधिक उत्तम ठरते त्याकरिता खाली दिलेस्या टिप्सचा नक्की अवलंब करा.

लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तज्ञ्जांचा सल्ला

खालील दिलेल्या टिप्सचा नक्की अवलंब करा

  • सॅनिटाझर्सचा वापर करणे किंवा साबणाने स्व्छ हात धुणे अधिक गरजेचे आहे. ज्यामुळे अस्वच्छ हातांमधून पसरणा-या विषाणूचा नाश करणे शक्य होते.
  • खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर रुमाल अथवा टिश्यु पेपर धरावा. पुन्हा पुन्हा तोच टिश्यु पेपर न वापरता एकदा वापर झाल्यानंतर त्वरीत तो कचराकुंडीत टाकून द्यावा.
  • समोरच्या व्यक्तीशी बोलताना कमीतकमी ६ फूट अंतर राखावे. विशेषत: आजारी असलेल्यांनी इतर व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळावे असे केल्याने मुलांना संसर्ग होण्यापासून रोखता येईल.
  • अस्वच्छ हातांनी आपले डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नका, जर आपण वारंवार स्पर्श केला तर विषाणु संसर्गाचा धोका अधिक वाढतो.
  • जर तुमच्या मुलांना ताप, खोकला तसेच श्वास घेण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांशी सल्लामसलत करुन त्यातील लक्षणांविषयी माहिती द्या. वेळीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या व उपचारास विलंब करू नका.
  • आपल्या मुलांच्या लसीकरणाचे वेळापत्रक चूकवू नका. जर एखादा डोस घण्यात विलंब होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रलंबित डोस लवकरात लवकर घेण्यात यावा.
  • निरोगी आतडे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. दही सारख्या पदार्थात प्रोबायोटिक्स भरपूर असतात जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. मुलांना सतत एकाच जागी बसवून न ठेवता त्यांच्या शारीरीक हालचाली वाढवून त्यांना सक्रिय राहण्यासाठी प्रोत्साहित करा आणि वैयक्तिक स्वच्छता राखण्याविषयी मुलांना सूचना द्या.
  • कच्चे अथवा अर्धवट शिजविलेल्या मांसाचे सेवन करणे टाळा.
  • स्वत: च्या मर्जीने औषधे घेण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या

कोरोना काळात महिलांचे आरोग्य, स्वास्थ्य जपण्यासाठी काही सोप्या टिप्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

10 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT