एक वर्षापर्यंत लहान मुलाला नक्की काय द्यायचे खायला, अन्यथा होतील वाईट परिणाम

एक वर्षापर्यंत लहान मुलाला नक्की काय द्यायचे खायला,  अन्यथा होतील वाईट परिणाम

जेव्हा लहान बाळाचा जन्म होतो तेव्हा त्या बाळाच्या आरोग्याची काळजी खूप घ्यावी लागते. लहान मुलांची काळजी घेणं हे काही खायचं काम नाही. जोपर्यंत बाळ बोलत नाही तोपर्यंत त्याच्या खाण्याची खूप काळजी घ्यावी लागते.  कारण त्याला भूक लागली हे सांगता येत नसते. त्यासाठी बाळाला समजून घेणं हे खूपच मेहनतीचं काम आहे. 1-3 वर्षाच्या मुलांना नक्की काय खायला द्यायचं याचं त्यांच्या पालकांना टेन्शनही असतं. कारण अनेक लोकांचे सल्ले असतात पण आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी नक्की काय योग्य आहे याचा अनुभव आपण त्याला भरवायला लागल्यानंतरच येतो. एक वर्षापर्यंत लहान मुलाला नक्की काय द्यायचे आणि त्याची खाण्याची काळजी कशी घ्यायची हे  एखाद्या टास्कपेक्षा कमी नाही. लहान मुलांना असे पदार्थ भरवावे लागतात ज्याने त्यांना कोणतेही नुकसान पोहचणार नाही. लहान मुलांना बऱ्याचदा पोटाच्या समस्या उद्भवतात. बाळ साधारण सहा महिन्याचे झाले की आपण साधारण त्याला वेगवेगळे पदार्थ अर्थात सूप, खिमटी भरवायला सुरूवात करतो. पण काही पदार्थ असे असतात की, मुलांना ते पचत नााहीत. मग अशावेळी नक्की कोणते पदार्थ द्यायला हवेत असा प्रश्न पडतो. कोणते पदार्थ देऊन आपण आपल्या मुलांना निरोगी ठेवू शकतो याच्या काही टिप्स (Tips) आम्ही तुम्हाला इथे देत आहोत.  

नवजात बाळाच्या आईला माहीत हव्या 'या' 4 कंफर्टेबल ब्रेस्टफिडींग पोझिशन्स

लहान मुलांना द्या हे पदार्थ!

Shutterstock

1. एक वर्षाच्या मुलापर्यंत आईचं दूध हे पूर्णान्न असतं. पण त्याचबरोबर डाळीचे पाणी, सूप, खिमट, रव्याचा शिरा, खिचडी, पिकलेली फळं अथवा त्यांचा रस हे पदार्थ देऊ शकता. त्याचबरोबर बाळाला जास्तीत जास्त पाणी प्यायला द्यायला हवं. 

2. तुम्ही एक वर्षाच्या मुलाला जर रिफाईंड शुगर खायला देत असाल तर हे तुमच्या बाळासाठी नुकसानकारक ठरू शकते. लहान बाळाला अजिबातच रिफाईंड शुगर देऊ नये.  रिफाईंड शुगर सेवन केल्याने लहान बाळाचं शरीर हे कमकुवत बनते. बाळाला निरोगी आरोग्य द्यायचं असेल तर त्याच्या खाण्याकडे योग्य लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. 

आईच्या दुधामुळे नवजात बालकांना मिळते परिपूर्ण सुदृढ सुरुवात

3. एक वर्ष,च्या बाळाला तुम्ही नेहमी मध द्यायला हवा. पण त्याचं प्रमाणही तुम्हाला माहीत असायला हवं. लहान मुलांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास खूप होत असतो. त्यामुळे मध नेहमी द्यायला हवं. मधाने लहान मुलांंचा खोकला लवकर जातो. तसंच मधाने बॅक्टेरियापासून लढण्याची ताकद बाळांना मिळते. त्याचप्रमाणे लहान मुलांना पचनक्रियेचीही समस्या असते. त्यामुळे मुलांना मध द्यायला हवा. 

4. एक वर्षाच्या मुलांसाठी सर्वात चांगलं आईचं दूध असतं. पण जर दूध देणं बंद केलं असेल तर मुलांना गायीचेच दूध द्यावे. गायीचं दूध मुलांसाठी फायदेशीर असतं.  पण पहिले सहा महिने केवळ आईचेच दूध द्यावे. पहिले पाच वर्ष म्हशीचे दूध अजिबात देऊ नये. कारण म्हशीचे दूध हे पचायला जड असते. तर गायीचे दूध हे पचायला सोपे असते. त्याशिवाय गायीचे दूध हे बाळाच्या स्मरणशक्तीसाठीही चांगले असते. 

नवजात बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स

5. तुमचे बाळ जर 6 महिन्याचे असेल तर त्याला मीठ अजिबात देऊ नका. तर आईने बाळाला दूधातून सोडियमची मात्रा जास्त मिळेल असे पदार्थ जास्त खायला हवेत. बाळाला खिमटी आणि मूगडाळीचे पाणी अथवा मूगडाळ मऊ करून साधारण सात महिन्यानंतर खायला द्यावे. याामुळे बाळाची हाडं मजबूत व्हायला लागतात. मांसाहारी खाणं साधारण एक वर्षानंतरच द्या.  कारण बाळाला असे पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे पोटात दुखणे सुरू होते. त्यामुळे या गोष्टीची काळजी तुम्ही घ्यायलाच हवी. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.