ADVERTISEMENT
home / आरोग्य
लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तज्ञ्जांचा सल्ला

लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तज्ञ्जांचा सल्ला

आजकाल लहान मुलांची प्रतिकार शक्ती कशी वाढवावी हा पालकांसमोर असलेला एक मोठा प्रश्न आहे. कारण मुलांना, विशेषत: तान्‍ह्या मुलांना वर्षभरात विविध आजार व संसर्ग होण्‍याची दाट शक्‍यता आहे. बाहेरचे वातावरण दिवसेंदिवस खराब होत असून कोरोना महामारीने ही चिंता अधिकच वाढत आहे. म्‍हणून पालकांनी तज्ञ्जांकडून याबाबत योग्य मार्गदर्शन घेणं गरजेंच आहे. वास्तविक शारीरिक पेशींचे संरक्षण करणा-या अॅण्‍टीबॉडीज प्रसूती काळादरम्‍यान नाळेच्‍या माध्‍यमातून मातेकडून बाळाकडे हस्‍तांरित होत असतात. यामुळे बाळाचे जन्‍मानंतरच्‍या सुरूवातीच्‍या काही दिवसांदरम्‍यान त्याचं संरक्षण होण्‍यास मदत होते. मात्र वाढत्या वयात बाळाची काळजी कशी घ्यावी आणि त्याची रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी काय करावं याबाबत अॅड्रॉइट बायोमेड लि. येथील स्‍ट्रॅटेजिक मेडिकल अफेअर्स प्रमुख डॉ. अनिश देसाई (एमडी, एफसीपी, पीजीडीएचईपी) आणि मेडिकल अफेअर्स एक्झिक्‍युटिव्‍ह डॉ. सुनैना आनंद (फार्मा डी) यांचा हा सल्ला तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरेल.

मुलाची रोगप्रतिकारशक्‍ती कशी वाढवावी –

लहान मुलांना दीर्घकाळ आरोग्‍यदायी ठेवण्‍यासाठी पालकांनी सतत त्‍यांच्‍या रोगप्रतिकारशक्‍तीची तपासणी करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. या काही टिप्स यासाठी तुमच्या फायद्याच्या ठरू शकतात. 

स्‍तनपान: स्‍तनपान हा वाढीदरम्‍यान बाळाची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍याला मदत करण्‍याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मातेच्‍या दूधामध्‍ये बाळाची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी महत्त्वपूर्ण घटक असतात, जसे प्रथिने, मेद, शर्करा, अॅण्‍टीबॉडीज व प्रोबायोटिक्‍स. मातेमधील अॅण्‍टीबॉडीज स्‍तनपानादरम्यान दूधामधून बाळामध्‍ये हस्‍तांतरित होतात.

लसीकरण: प्रमाणित मार्गदर्शकतत्त्वांनुसार लसीकरण उपक्रमामध्‍ये बाळाची नोंदणी करणे हा त्‍याचा गंभीर आजारांपासून संरक्षण करण्‍याचा प्रभावी व सुरक्षित उपाय आहे. 

ADVERTISEMENT

योग्‍य स्‍वच्‍छता: सध्याचे वातावरण पाहता तुमच्‍या मुलांना जमिनीवरील बाह्य वस्‍तूंना स्‍पर्श करण्‍यापासून नियंत्रित करा, कारण त्‍यामुळे घातक संसर्ग संक्रमित होऊ शकतात. यासोबतच त्यांना वारंवार, विशेषत: जेवणापूर्वी व जेवणानंतर हात स्‍वच्‍छ धुण्‍याची सवय लावा.  

पुरेशी झोप: योग्‍य झोप मिळाल्‍याने तुमच्‍या मुलाची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यामध्‍ये मदत होते. अपु-या झोपेमुळे संसर्गाचा सामना करण्‍यामध्‍ये मदत करणारे आणि दाह कमी करणारी सायटोकाइन्‍स नावाची प्रथिने निर्माण करण्‍याची शरीराची क्षमता कमी होते. यासाठीच तुमच्या मुलांना दिवसातून कमीत कमी ८ ते १० तास झोप शांत झोप मिळणं गरजेचं आहे. 

लहान मुलाची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवणारे पौष्टिक घटक –

लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये त्यांच्या आहाराचा खूप मोठा सहभाग असतो. यासाठी मुलांच्या आहारात या गोष्टी असायालाच हव्या.

जीवनसत्त्व क – एस्‍कॉर्बिक अॅसिड म्‍हणून ओळखले जाणारे व्हिटॅमिन सी लिंबूवर्गीय फळे, बेरी, बटाटे व मिरपूडमध्‍ये आढळून येते. तसेच जीवनसत्त्व क टोमॅटो, मिरपूड व ब्रोकोली अशा वनस्‍पती स्रोतांमधून देखील आढळून येते. जीवनसत्त्व क अॅण्‍टीबॉडीज तयार होण्‍याला चालना देत रोगप्रतिकारशक्‍तीला साह्य करते. 

ADVERTISEMENT

जीवनसत्त्व ई – शरीरात व्हिटॅमिन ई अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट म्‍हणून कार्य करते आणि रोगप्रतिकारशक्‍तीला साह्य करू शकते. तसेच फोर्टिफाईड सेरेअल्‍स, सुर्यफूल बिया, बदाम, तेल (जसे सनफ्लॉवर किंवा सॅफ्लॉवर तेल), हेझल नट्स व पीनट बटरसह मुलाच्‍या आहारामध्‍ये जीवनसत्त्व ई ची भर केल्‍यास रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्‍याला मदत होईल. 

झिंक –  झिंक रोगप्रतिकारशक्‍तीला कार्यक्षमपणे मदत करते आणि जखमांवरील उपचारामध्‍ये मदत करू शकते. तुमच्‍या मुलासाठी झिंकचे उत्तम स्रोत आहेत मांस, चिकन, सीफूड, दूध, कडधान्‍ये, सोयाबीन, बियाणे व नट्स. हे पदार्थ त्यांच्या आहारात असायालाच हवे.

प्रथिने – प्रथिनं ही तुमच्‍या मुलाच्‍या रोगप्रतिकारशक्‍तीचे, विशेषत: उपचार व आजारातून लवकर बरे होण्‍याचे आधारस्‍तंभ आहेत. सीफूड, मांस, चिकन, अंडी, सोयाबीन व वाटाणे, सोया उत्‍पादने आणि अनसॉल्‍टेड नट्स व बियाणे सारख्‍या प्रथिने संपन्‍न खाद्यपदार्थांमुळे रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍याला मदत होईल. 

प्रोबायोटिक्‍स – प्रोबायोटिक्स हे जीवित सूक्ष्‍मजीव असतात, जे नैसर्गिकरित्‍या दही, क्रिम, सॉकरक्रॉट, मिसो आणि केफिर यांसारख्‍या पदार्थांमध्‍ये आढळून येतात. हे सूक्ष्‍मजीव ‘उत्तम’ किंवा ‘अनुकूल’ जीवाणू म्‍हणून ओळखले जातात. ते घातक जीवाणूंना दूर करतात आणि आतड्यांना निरोगी ठेवतात. यासाठीच मुलांच्या आहारात प्रोबायोटिक्स असायलाच हवे.

ADVERTISEMENT

त्याचप्रमाणे इतर पौष्टिक घटक जसे की जीवनसत्त्व अ, ड, ब६, ब१२, कॉपर, फोलेट, सेलेनियम व लोह देखील तुमच्‍या मुलाची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍याला मदत करतात. यासाठी या घटकांचा मुलांच्या आहारात समावेश करा आणि त्यांना आजारपणापासून दूर ठेवा. 

फोटोसौजन्य –

अधिक वाचा –

लहान मुलांचे केस गळण्यामागची कारणं

ADVERTISEMENT

लहान मुलांना हेल्दी खाण्याची सवय कशी लावाल

लहान मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सोप्या टिप्स

06 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT