ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक माणसाच्या जन्माची एक वेळ, महिना आणि वर्ष असतं. दर महिन्यात आणि दिवशी जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाची एक वेगळी खासियत असते. त्याच आधारावर त्या माणासाचा स्वभाव, आवड, निवड, चांगुलपणा, वाईटपणा हे सर्व ठरत असतं. फेब्रुवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती नक्की कशा असतात? तर बऱ्याचदा फेब्रुवारी महिन्यात जन्म झालेल्या लोकांचं व्यक्तिमत्व हे अॅक्टिव्ह असतं. तसं बघायला गेलं तर या महिन्यातील जन्म झालेल्या व्यक्ती या स्वभावाने शांत आणि वैचारिक असतात. यांच्या राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. तुमचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा जन्म फेब्रुवारी महिन्यात झाला असेल तर, तुम्ही जाणून घेऊ शकता या कुंभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो. या व्यक्तींना हॅपी बर्थडे विश करण्याआधी जाणून घेऊया फेब्रुवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींविषयी –
1- फेब्रुवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी असतात. या व्यक्तींसारखा सेल्फ कंट्रोल कोणत्याही इतर राशीच्या व्यक्तींकडे असणं तसं कठीणच आहे. परिस्थिती कोणतीही असो त्यांना ती व्यवस्थित हाताळता येते.
2- लाजाळू पण तरीही रोमँटिक…या व्यक्तींवा प्रेम या शब्दावर प्रचंड प्रेम असतं. आपला हळवेपणा आणि काळजीवाहू स्वभावामुळे नेहमीच या राशीच्या व्यक्ती एक रिलायबल लव्हरची भूमिका अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडतात. पण याच त्यांच्या स्वभावामुळे फसवणुकीचा धोकाही जास्त असतो.
3- या महिन्यात जन्म झालेल्या बहुतांश व्यक्ती या बुद्धीवान असतात. त्यामुळेच लेखन, परीक्षण आणि तांत्रिकी क्षेत्रामध्ये या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती करिअर सहजपणाने बनवू शकतात. यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकराची चमक असते पण त्यांना स्वतःलाच या गोष्टीची कल्पना नसते.
4- हे लोक आपलं लक्ष्य पहिल्यापासूनच निर्धारित करून घेतात आणि त्यानुसारच आपलं आयुष्य जगत त्या लक्ष्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात. तसंच ज्या क्षेत्रात या व्यक्ती काम करत असतात त्या क्षेत्रामध्ये एक चांगली पोस्ट नक्कीच या व्यक्ती मिळवतात.
5- व्हॅलेंटाईन डे च्या महिन्यामध्येच जन्म झालेला असल्यामुळे तर रोमान्स यांच्या रोमारोमात भरलेला असतो. आपल्या जोडीदाराची निवड या व्यक्ती खूप विचार करून करतात. समंजस, साधा आणि मनाने चांगल्या असलेल्या व्यक्ती यांना जास्त आवडतात. पण यांचं प्रेम बऱ्याचदा टिकत नाही आणि यासाठी त्यांना खूप वेळा दुःखाला सामोरं जावं लागतं. तर यांचं प्रेम जास्त वेळ टिकलं तर, त्यांच्या जोडीदारासाठी ही गोष्ट खूपच लाभदायक असते.
6- या व्यक्ती जोडीदाराला आपलं प्रेम तर नक्कीच दर्शवतात, पण त्यात कोणताही रोमँटिकपणा नसतो. आपल्या जोडीदाराबरोबर एकत्र वेळ घालवणं या व्यक्तींना खूप आवडतं. त्यांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असते, आपल्या जोडीदारावर आपण खूप प्रेम करतो आणि त्या व्यक्तीला ही गोष्ट माहीत आहे, तर प्रत्येकवेळा ही गोष्ट सांगण्याची काही गरज नाही.
7- या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या खूप दिलदार स्वभावाच्या असतात. यांना बचत करणं अथवा कंजूसी करणं हा प्रकारच जमत नाही. या व्यक्ती दोन्ही हाताने पैसा लुटण्यासाठीच जन्माला आलेल्या असतात.
8- तसं तर फेब्रुवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या खूप बुद्धीवान असतात पण दुनियादारीमध्ये यांचं अभ्यासाकडे अजिबात लक्ष लागत नाही. लोक यांच्या चांगुलपणाचा फायदा उचलण्याची एकही संधी सोडत नाहीत. खरं तर लोकांच्या वाईटपणाची शिकार या व्यक्ती स्वतःच होतात. प्रत्येकावर विश्वास ठेवण्याचा यांचा स्वभाव अतिशय वाईट आहे.
9- या व्यक्ती भाग्यापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. कोणत्याही छळ आणि कपटापासून या व्यक्ती दूरच राहतात. कोणालाही धोका देण्याचा वा विश्वास तोडण्याचा या व्यक्ती विचारच करू शकत नाहीत. भावनेच्या आहारी जाणं ही या व्यक्तींची कमजोरी आहे पण नक्की कोणासमोर भावूक व्हायचं याची त्यांना पूर्ण कल्पना असते.
10- पाहायला गेलं तर या व्यक्ती खूपच मस्तीखोर आणि मजेशीर असतात. पण प्रत्येक व्यक्तीसमोर नाही. ज्यांना आपलं मानतात किंवा त्यांना ज्या व्यक्ती आवडतात त्यांच्याशीच ते मनमोकळे राहतात. प्रत्येकाशी नातं जोडणं आणि बोलत राहणं या व्यक्तींना आवडत नाही. पण यांना समजून घेणं तसं कठीण आहे. आपल्या अवतीभोवती असं एक वलय निर्माण करतात की, तुम्ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे नक्कीच गोंधळून जाता.
भाग्यशाली नंबर – 4,8,12, 22 आणि 28
भाग्यशाली रंग – काळा, नीळा, जांभळा आणि हिरवा
भाग्यशाली दिवस – मंगळवार आणि शनिवार
भाग्यशाली खडा – नीलम आणि पाचू
फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती
शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, मधुबाला, जयललिता, स्टीव्ह जॉब्स, जगजीत सिंह, पूजा भट्ट, उर्मिला मातोंडकर, कुमार विश्वास इत्यादी
हेदेखील वाचा
वार्षिक भविष्य मेष (Aries) राशी : थोडी सावधानता बाळगल्यास वर्ष तुमचंच आहे
2019 वार्षिक भविष्य कुंभ (Aquarius) राशी : जे पेरलंय त्याचं फळ मिळणार या वर्षात
वार्षिक भविष्य 2019 सिंह (Leo) राशी : नवीन वर्षात कभी खुशी कभी गम