निरोगी आरोग्यासाठी आहार हा फारच महत्वाचा आहे. जर आहार योग्य असेल तर तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत तु्म्ही काय काय खाता हे जाणून घेणे खूप गरजेचे असते. दिवसभर तुम्ही कितीही खाल्ले असेल पण रात्री तुमच्या आहारात काय असायला हवे याचे योग्य मेनू कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमचे शरीर अधिक सुदृढ राहण्यास मदत मिळते. रात्री जेवताना तुम्ही कोणते पदार्थ खायला हवेत. चला जाणून घेऊयात या पदार्थांची यादी
डोशासह बनवा स्वादिष्ट शेंगदाणा आणि दही चटणी, लागेल अधिक चविष्ट
डाळी
डाळी या कोणत्याही वेळी पिणे हे नेहमीच चांगले असते. दिवसभर तुम्हाला हेल्दी किंवा डाएट फॉलो करणे शक्य नसेल अशांनी रात्रीचे रुटीन हे एकदम चांगले ठेवायला हवे. आयुर्वेदशास्त्रानुसार रात्री जेवण हे हलके असणे गरजेचे असते. कारण त्यावेळी पचनाच्या क्रिया या मंदावलेल्या असतात. त्यामुळे जितका पचनाला सोपा पदार्थ निवडाल तितके चांगले. खूप जणांकडे डाळीचे वेगवेगळे प्रकार केले जातात. अशावेळी तुम्ही एक वाटीभरुन कोणतीही डाळ प्यायली तरी देखील ते पुरेसे असते. डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. जे शरीराला उर्जा पुरवण्याचे काम करतात. डाळीमुळे पोट भरते त्यामुळे अरबट चरबट खाण्याची इच्छाही नष्ट होते. त्यामुळे डाळींचा समावेश रात्रीच्या जेवणात करावा.
भाज्या
भाज्या या आरोग्यासाठी चांगल्या असतात.रात्रीच्या वेळात जर लाईट आणि पोटभरीचे खायचे असेल तर तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा होत नाही. भाजीमध्ये मोठ्याप्रमाणात फायबर्स असतात. ज्यांना सकाळी सकाळी पोट साफ होण्यास अडथळा येत असेल अशांनी भाज्या या खायलाच हव्यात. विशेषत: पालेभाज्या या रात्री असतील तर त्या पटापट खाता येतात.त्या पचण्यास मदत करतात. त्यामुळे मुळा, मेथी,चाकवत, चंदन बटवा अशा काही भाज्या तुम्ही रात्री खायला हव्यात.
कडधान्य
जास्तीत जास्त फायबर शरीराला आवश्यक असतात. जर तुम्हाला रात्री काही चांगले खायचे असेल तर तुम्ही कडधान्यांचे सेवन करायला हवे. कडधान्यांचे सेवन हे आरोग्यासाठी चांगले असते. कडधान्य भिजवून ते छान शिजवून तुम्ही फोडणी देऊन अथवा उकडून तुम्ही खाऊ शकता. पोळी किंवा भाकरीसोबतही ते खाऊ शकता. कारण ते चवीला खूपच उत्तम लागते. शिवाय शरीरालाही प्रोटीन्स पुरवते.
चपाती किंवा भाकरी
तुम्हाला रात्री पूर्ण जेवणाची सवय असेल तर तुम्ही भाकरी किंवा चपाती याचा समावेश करावा. पोळी किंवा भाकरी तुम्हाला वरील कोणत्याही पर्यायासोबत खाता येते. त्यामुळे तुमचे जेवण पूर्ण होते. भाताला पर्याय म्हणून अनेक जण भाकरी आणि चपाती खाणे पसंत करतात. त्यामुळे तुम्हाला जर पूर्ण काहीतरी खायचे असेल तर चपाती किंवा भाकरी खा. नाचणी, बाजरी, तांदूळ अशी कोणत्याही धान्याची भाकरी ही तुमच्यासाठी नक्कीच चांगली आहे.
आता तुमच्या रात्रीच्या जेवणात नक्कीच तुम्ही हे पदार्थ समाविष्ट करा तुम्हाला याचा फायदा होईल.