ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
गरोदरपणात नोकरी करताना महिलांनी अशी घ्यावी काळजी

गरोदरपणात नोकरी करताना महिलांनी अशी घ्यावी काळजी

आई होण्याचा आनंद अगदी अवर्णनिय असतो. गुडन्यूज समजल्यावर कुटुंब आणि मित्रमंडळी तुमची अगदी फुलाप्रमाणे काळजी घेतात. गरोदरपणात काय खाव, कसं बसावं, कसं झोपावं याचप्रमाणे प्रवास करावा की नाही हा मोठा गहन प्रश्न असतो. नोकरी करणाऱ्या महिलांना या काळातही प्रवास करावाच लागतो. कामाचं टार्गेट, ऑफिसच्या डेडलाईन्ससोबत आता स्वतःची आणि बाळाची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. आजकालची जीवनशैली आणि पूर्वीचा काळ यात खूप फरक आहे. अशावेळी मागच्या पिढीचे अनुभव तुमच्या कामी येतीलच असं नाही. कारण आजकाल प्रत्येकालाच काम करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं. यासाठीच नोकरी करणाऱ्या महिलांनी गरोदरपणात स्वतःची कशी काळजी घ्यावी हे तुम्हाला माहीत असायलाच हवं.

Shutterstock

ऑफिसमध्ये असताना कशी घ्याल स्वतःची काळजी

नेहमीपेक्षा आता तुम्हाला स्वतःची जास्त काळजी घ्यावी लागणार हे मनाशी पक्कं ठरवा. कारण आता तुम्ही एकट्या नसून दोन जीवांच्या झाल्या आहात. तेव्हा तुमच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाची काळजी घेणं हे तुमचं सर्वात पहिलं कर्तव्य आहे.  तुम्ही काय खाता, काय पिता, तुमची जीवनशैली कशी आहे याचा तुमच्या बाळाच्या वाढ आणि विकासावर परिणाम होत असतो. एवढंच नाही तर तुम्ही जसे विचार करता तसेच संस्कार तुमच्या बाळावर होणार आहेत. आजकाल सर्वच ऑफिसमध्ये मॅर्टिनिटी सुट्टी, गरोदर महिलांची काळजी याची विशेष काळजी  घेतली जाते. तेव्हा तुम्ही गरोदरपणात जितके दिवस ऑफिसमध्ये जाणार आहात तितके दिवस तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 

ADVERTISEMENT

आहाराबाबत काय काळजी घ्याल –

ऑफिससाठी घराबाहेर पडण्यामुळे तुम्हाला तुमच्या आहाराबाबत सर्व गोष्टींची काळजी घेणं नक्कीच शक्य नाही. मात्र काही गोष्टी जरी तुम्ही नीट लक्षात ठेवल्या तरी तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी नास्ता करण्यास मुळीच विसरू नका. सकाळी काय नास्ता करायचा आहे, डब्यातून काय खायला न्यायचे आहे याची रात्रीच व्यवस्था करा. ज्यामुळे तुमची सकाळी दगदग होणार नाही. सकाळी पौष्टिक नास्ता केल्यामुळे तुमचा दिवस उत्साहित जाईल. शिवाय दोन दोन तासांनी ऑफिसमध्ये काहीतरी पौष्टिक खाद्यपदार्थ खाण्यासाठी छोटे छोटे डबे घेऊन जा.

एकाच ठिकाणी बसून राहू नका –

जर तुमचे काम एकाच ठिकाणी बसून अथवा डेस्कवरील असेल तर तुम्हाला थोडी काळजी घेण्याची गरज आहे. आता तुम्हाला आठ ते नऊ तास एकाच ठिकाणी बसून राहणं कठीण जाईल. तेव्हा अधून मधून उठून ऑफिसमध्ये एखादी फेरी मागा. मात्र चालताना अथवा पायऱ्या उतराना  सावधपणे आणि संथपणे चाला. उगाचच दगदग करणं आता तुमच्यासाठी चांगलं नाही. 

Shutterstock

ADVERTISEMENT

पाणी नियमित पिण्याची सवय लावा –

गरोदरपणात तुमच्या शरीरात अनेक बदल होत असतात. शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी दर पंधरा ते वीस मिनीटांनी थोडं थोडं पाणी प्या. ज्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहील. शरीरातील टॉक्सिन्स वेळीच बाहेर टाकले गेल्यामुळे  बाळाची वाढ आणि विकास चांगला होईल. जर तुम्हाला सतत पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर डिटॉक्स वॉटर, नारळपाणी, गाजराचा रस, फळांचा रस तुम्ही घेऊ शकता. मात्र लक्षात ठेवा या काळात मद्यपान मुळीच करू नका. 

जंक फूडला करा बाय बाय –

तुम्हाला चायनीज, मॅगी, वडापाव, बर्गर, पास्ता, पिझ्झा आणि  चिप्स कितीही आवडत असले तरी काही काळ या पदार्थांपासून दूर राहा. बऱ्याचदा ऑफिसमध्ये काम करता करता असे पदार्थ ऑर्डर करून खाण्याची तुम्हाला सवय असू शकते. मात्र हे पदार्थ तुम्ही गरोदर असताना खाणं योग्य नाही. याऐवजी घरी तयार केलेले पौष्टिक पदार्थ दररोज कॅरी करा. आवडत नसले तरी पौष्टिक पदार्थ कटाक्षाने खाण्याचा प्रयत्न करा. 

 

 

ADVERTISEMENT

रेडिएशनपासून स्वतःचा बचाव करा –

ऑफिसमध्ये काम करताना मोबाईल, लॅपटॉप अशा गोष्टींचा वापर तुम्हाला करावाच लागतो. मात्र कमीतकमी घरी गेल्यावर या गोष्टींपासून दूर राहा. मायक्रोव्हेवमध्ये गरम केलेले पदार्थ कमी खा. एक्स-रे, रेडिएशनचा वापर करण्यात आलेल्या मशिनपासून दूर राहा. 

डेस्कवर बसताना विशेष काळजी घ्या –

खुर्ची आणि डेक्सवर बसताना पाय जमिनीवर टेकले जातील याची काळजी घ्या. जर खुर्चीत बसल्यावर तुमचे पाय जमिनीपर्यंत पोहचत नसतील तर पायाखाली छोटा स्टूल अथवा टेबल ठेवा. ज्यामुळे तुमच्या पायांवर सूज येणार नाही. शिवाय याबाबत वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विसरू नका. 

ताणतणावापासून दूर राहा –

ऑफिस आणि कामाचा ताण या  गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करता येत नाहीत. म्हणजेच काम करताना तुम्हाला थोडंफार ताणतणावाला सामोरं जावंच लागणार. मात्र शक्य तितकं या ताणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. काम करताना ते आनंदाने आणि मनापासून करा. म्हणजे कामाचा ताण कमी होईल. शिवाय ऑफिसमधील सहकाऱ्यांना तुमच्या गरोदरपणाबाबत आधीच माहिती द्या. ज्यामुळे ते तुम्हाला काम करताना सहाकार्य नक्कीच करतील. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा –

‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा

ADVERTISEMENT

गरोदरपणात का गळतात केस, जाणून घ्या कारणं

गरोदरपणात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

26 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT