गरोदरपणाचा काळ हा प्रत्येक स्त्रीसाठी खास असतो. अगदी तुमची पाळी चुकल्यापासून ते बाळाचा जन्म होईपर्यंतचा काळ एखाद्या सुंदर स्वप्नाप्रमाणे रमणीय असू शकतो. या काळात घरातील मंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी तुमचे फार लाड करतात. माहेरची आणि सासरची मंडळी तुमची डोळ्यात तेल घालून काळजी घेतात. कुणी तुमचे डोहाळे पुरवण्यासाठी झटतं तर कुणी तुम्हाला कसं आनंदी ठेवता येईल याची काळजी घेतं. मात्र या सर्वांमध्ये तुम्हीही तुमची विशेष काळजी घ्यायला हवी. पहिल्या गरोदरपणात तुम्हाला कदाचित काही गोष्टी माहीत नसतात. या काळात नेमके कोणते पदार्थ खावे आणि काय खाऊ नये याबाबत अनेक सल्ले तुम्हाला दिले जाऊ शकतात. यासाठीच जाणून घ्या गरोदरपणात कोणते पदार्थ खाणे टाळावे.
पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की, गरोदर महिलेला ज्या गोष्टीचे डोहाळे लागतील ती गोष्ट तिला द्यावी. नाहीतर बाळाच्या तोंडातून लाळ येते. मात्र जर असं असेल तर जर गरोदरपणात तिला नको ते पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर काय करावं.
वास्तविक जेव्हा गर्भवती महिलेला कितीही डोहाळे लागले तरी गरोदरपणात काही पदार्थ मुळीच खाण्यास देऊ नयेत. कारण या पदार्थांचा तिच्या आणि बाळाच्या आरोग्यावर थेट परिणाम होऊ शकतो. गरोदरपणातील पहिली तिमाही म्हणजेच पहिले तीन महिने आणि तिसरी तिमाही म्हणजेच शेवटचे तीन महिने फार काळजी घ्यावी लागते. या काळात बाळाच्या शरीराची महत्त्वाची वाढ आणि विकास होत असते. म्हणूनच हे पदार्थ खाणे त्याच्या आरोग्यासाठी हितकारक नाही.
गरोदरपणात महिलांना नेहमीच काहीतरी चटपटे पदार्थ खाण्याची इच्छा होते. चायनीज, मोमोज आणि असेच काही चटकदार पदार्थ त्यांना या काळात खावेसे वाटतात. अशा पदार्थांमध्ये सोडीयम ग्लूटामेट असतं ज्यामुळे बाळ अशक्त आणि कमजोर होऊ शकतं. चायनीज फूडमध्ये सोयासॉसचे प्रमाण अधिक असते. सोयासॉस मध्ये मीठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तुम्हाला रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. चायनीज पदार्थांमधील अजीनोमाटोदेखील तुमच्या गर्भासाठी हानिकारक ठरू शकतं.
कधी कधी गरोदरपणात एखादा कमी शिजवलेला अथवा कच्चा पदार्थ खाण्याची इच्छा तुम्हाला होऊ शकते. मांस, अंडी. मासे असे पदार्थ कच्चे अथवा कमी शिजलेले असतील तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या गर्भावर होण्याची शक्यता आहे. यासाठी जर तुम्हाला असे पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर ते पूर्ण शिजवूनच खा. शिवाय जर तुम्हाला हे पदार्थ कच्चे खाण्यामुळे उलटी अथवा मळमळीचा त्रास नक्कीच होऊ शकतो.
गरोदरपणात कॅफेनयुक्त पदार्थदेखील कमी प्रमाणातच खावेत. कारण कॉफी, चॉकलेट, उत्तेजक पेयं पिण्यामुळे अथवा खाण्यामुळे तुमच्या गर्भावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. यासाठीच डॉक्टर या काळात तुम्हाला असे पदार्थ कमी करण्याचा सल्ला देतात. या पदार्थांमुळे तुमच्या बाळाची वाढ कमी होते. वास्तविक आजकालच्या जीवनशैलीत हे पदार्थ सवयीचे झाले आहेत. मात्र जर तुम्हाला सुखरूप गरोदरपण हवं असेल तर हे पदार्थ पिणे जरूर टाळा.
मद्यपान आणि धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहेत हे माहीत असूनही काही जणी त्याच्या आहारी गेलेल्या असतात. मात्र जर तुम्ही गरोदर असाल अथवा बाळासाठू प्रयत्न करत असाल तर आता तुम्हाला या पदार्थांपासून शक्य तितकं दूर राहता यायला हवं. कारण यामुळे तुमच्या बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या सवयी वेळीच सोडून द्या.
जरी तुम्हाला या काळात जंक फूड खाण्याची तीव्र इच्छा झाली तरी आता याबाबत लगेच सावध व्हा. कारण जंकफूड खाण्यामुळे तुमच्या बाळाचे मुळीच पोषण होऊ शकत नाही. बर्गर, पिझ्झा, फ्राईज, आईस्क्रीम, केक, डोनट असे पदार्थ खाऊन तुम्हाला कोणतेच पोषकतत्त्व मिळत नाहीत. गरोदरपणात तुम्हाला आणि तुमच्या बाळाला अधिक पोषणाची गरज असते. जास्त गोड पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला गरोदरपणातील मधुमेह होऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला गरोदरपणात अधिक औषधोपचार आणि बेडरेस्ट करावी लागू शकते. यासाठीच हे पदार्थ खाणे वेळीच टाळा आणि सुखरूप गरोदरपणाचा आनंद घ्या.
जर तुम्ही गरोदर असाल तर तुमच्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घ्या आणि त्यानूसार तुमच्या आहार विहारात बदल करा.
फोटोसौजन्य - शटरस्टॉक
हे ही वाचा -
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा -
नोकरी करणाऱ्या महिलांनी गरोदरपणी अशी घ्यावी स्वतःची काळजी
‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा
गरोदरपणात म्हणून वापरायला हवेत ‘प्रेग्नंसी गाऊन’