ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
प्रिती झिंटा झाली आई, सोशल मीडियावर शेअर केली जुळ्या मुलांची नावे

प्रिती झिंटा झाली आई, सोशल मीडियावर शेअर केली जुळ्या मुलांची नावे

बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटाच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण नुकतंच तिच्या घरात दोन चिमुकल्यांचे आगमन झाले आहे. प्रिती आणि तिचा नवरा जीन गुडइनफ आता जुळ्या मुलांचे आई-बाबा झाले आहेत. प्रितीने ही आनंदवार्ता तिच्या सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. एवढंच नाही तर यासाठी तिने सर्वांचे आभार मानले असून तिच्या दोन्ही चिमुकल्यांची नावेदेखील चाहत्यांसोबत शेअर केली आहेत.

या कारणासाठी हनिमूनला नाही जाणार राजकुमार राव आणि पत्रलेखा

काय आहेत प्रिती झिंटाच्या मुलांची नावे

प्रिती झिंटा आणि जीन गुडइनफने 2016 मध्ये लॉस एंजलेसमध्ये लग्न केलं होतं. ज्यानंतर प्रिती परदेशात वास्तव्य करू लागली.  आता सरोगसीच्या मदतीने प्रिती आणि जीन आईबाबा झाले आहेत. प्रितीने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये ती आणि तिचा नवरा जीन खूपच आनंदी दिसत आहेत. प्रितीने शेअर केलं आहे की, आज मी तुमच्यासोबत एक आनंदाची गोष्ट शेअर करू इच्छित आहे. मी आणि जीन या गोष्टीमुळे खूपच आनंदी झालो आहोत. आमच्या ह्रदयात खूप प्रेम आणि कृतज्ञता निर्माण झाली आहे कारण आता आमच्या घरी आमची जुळी मुले जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडइनफचे आगमन झाले आहे. आमच्या या आश्चर्यकारक प्रवासात सहभागी झालेल्या सर्व डॉक्टर्स, नर्स आणि आमच्या सरोगेट मातेचे आम्ही आभार व्यक्त करतो. सर्वांना खूप खूप प्रेम आणि धन्यवाद.

एकता कपूरने केली ‘नागिन 6’ ची घोषणा, ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

ADVERTISEMENT

प्रिती आणि जीनवर शुभेच्छांचा वर्षाव

प्रिती आणि जीन आईबाबा झाल्याबद्दल जगभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे.प्रिती सरोगसीच्या मदतीने वयाच्या 46 व्या वर्षी आई झाली आहे. आजवर बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटीजने आईबाबा होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरोगसीची मदत घेतलेली आहे. प्रिती झिंटा बॉलीवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री… एके काळी तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट बॉलीवूडला दिलेले आहेत. मणिरत्नमच्या दिल से चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होतं. मात्र मागील काही वर्षांपासून ती बॉलीवूडपासून काहिशी दुरावली आहे. आता ती तिच्या पतीसह लॉस एंजलेसमध्ये सेटल झाली आहे. असं असलं तरी आयपीएलच्या सीझनसाठी ती बऱ्याचदा भारतात येत असते. 

‘टिप टिप पानी बरसा’ गाण्यातून गोविंदाचा कमबॅक, चाहत्यांनी दिल्या या प्रतिक्रिया

19 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT