यावर्षी सेलिब्रिटींच्या लग्नाचा एक धुमधडाकाच चालू असल्याचं दिसतंय. नुकतंच दीपवीर अर्थात दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे फोटो बघून त्यांचे चाहते खूष होत आहेत. तर आता तयारी सुरु झाली आहे ती प्रियांका चोप्रा आणि निकच्या लग्नाची. अनुष्का – विराट अथवा दीपिका – रणवीरप्रमाणे प्रियांका – निक बाहरेच्या देशात जाऊन लग्न न करता भारतातील जोधपूरमध्येच अगदी भारतीय पद्धतीने लग्न करणार असल्यामुळे त्यांचे चाहते अजून खूष झाले आहेत. पण प्रियांका आणि निकची भेट कशी झाले? इतक्या कमी वेळामध्ये त्यांनी लग्नाचा निर्णय कसा घेतला? हे तुम्हाला माहीत आहे का? आम्ही ही सगळी माहिती खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
कॉमन फ्रेंडमुळे भेटले प्रियांका आणि निक (Priyanka Chopra and Nick Jonas)
एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून निक आणि प्रियांकाची पहिली भेट झाली. या भेटीनंतर दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झाले. त्यावेळी दोघांच्याही मनामध्ये लग्न अथवा प्रेम अशी कोणतीही भावना नव्हती. मात्र जसजसं दोघांची एकमेकांशी ओळख वाढली तसं ते एकमेकांमध्ये गुंतत गेले. पहिल्या भेटीनंतर सहा महिन्यांनी दोघांनी पुन्हा एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला. या भेटीमध्ये त्यांच्यात खूपच साधी चर्चा झाली. त्यानंतर २०१७ च्या मे महिन्यात आम्ही मेट गालाच्या रेड कार्पेटवर एकत्र भेटलो तेव्हाही त्यांच्यामध्ये केवळ मैत्री होती. मात्र मेट गालानंतर अशा अनेक गोष्टी घडत गेल्या आणि ते दोघेही एकमेकांना भेटत राहिले. एकमेकांपासून दूर जाऊनही सतत काहीना काहीतरी असे घडत गेले की, दोघं एकमेकांना भेटत गेले आणि नंतर दोघांनाही आपण प्रेमात असल्याची जाणीव झाली आणि साखरपुडा करण्याचा दोघांनी निर्णय घेतला. हे सर्व निकने स्वतः ‘द टुनाईट’ या शो मध्ये अँकरने विचारल्यानंतर सांगितलं आहे. निकच्या म्हणण्यानुसार नियतीनेच त्या दोघांना एकत्र आणलं आहे.
एका टेक्स्ट मेसेजमुळे आले जवळ
प्रियांका आणि निक एकमेकांना पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदा भेटले हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र त्यांच्या लव्हस्टोरीची खरी सुरुवात झाली होती ती एका ‘टेक्स्ट मेसेज’मुळे. मैत्रीच्या नात्याला आणखी खास बनवण्यासाठी प्रियांकाने नाही तर निकने पुढाकार घेतला होता. निकने बऱ्याचदा आपल्या मनातील भावना प्रियांकाला बोलून दाखवल्या होत्या. बरेच दिवस भेटत राहिल्यानंतर निकने प्रियांकाला एक मेसेज केला, ‘आय थिंक व्ही शुड कनेक्ट’ (मला वाटतं आपण एकमेकांना अधिक वेळ देऊन एकत्र यायला हवं). या टेक्स्ट मेसेजनंतर दोघांमधील जवळीक वाढली आणि त्यानंतर बऱ्याचदा दोघंही एकत्र दिसले. दोघांनीही भारतात साखरपुडा करून आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली.
प्रियांकापेक्षा ११ वर्षांनी लहान निक
निक जोनस एक अमेरिकन गायक आणि अभिनेता आहे. निक लहानपणापासूनच नाटकांमध्ये काम करत असून प्रसिद्ध नाटकांमध्ये त्यानं काम केलं आहे. ‘ब्युटी अँड बीस्ट’ नाटकात काम करत असतानाच त्याने ख्रिसमस प्रेअर हे गाणं लिहिलं आणि गायलं आणि त्यानंतर त्याचा गायक म्हणून प्रवास सुरु झाला. निक जोनस प्रियांका चोप्रापेक्षा वयाने ११ वर्ष लहान असल्यामुळे या दोघांची लव्हस्टोरी खूपच चर्चेत आहे. मात्र असं असलं तरीही प्रियांकापेक्षा तो एका गोष्टी पुढे आहे आणि ते म्हणजे निक प्रियांकापेक्षा जास्त पैसे कमावतो. पैसे कमावण्याच्या बाबतीत प्रियांकाच्या चार पावलं पुढेच आहे. २०१७ च्या नोव्हेंबरमध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार प्रियांकाची वर्षाची कमाई ही १० मिलियन अर्थात ६४ कोटी असून निक जोनसची वर्षाची कमाई ही २५ मिलियन अर्थात १७१ कोटी इतकी आहे. वयातील अंतर कितीही असलं तरीही निकची कमाई प्रियांकच्या अधिक वरचढ आहे. हे सगळं जरी असलं तरीही त्या दोघांच्याही प्रेमामध्ये वयाचा कोणताही फरक दिसून येत नाही. दोघांच्याही बऱ्याच व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये नेहमी दोघंही प्रेमामध्ये आकंठ बुडाल्याचं दिसून येत आहे. अगदी त्यांच्या साखरपुड्यापासून ते लग्नासाठी निकचं प्रियांकाने केलेल्या स्वागतासाठी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्येही प्रियांकाच्या चेहऱ्यावरील निकबद्दलचे भाव लपत नाहीत.
इमेज सोर्स – इन्स्टाग्राम