प्रियांका चोप्रा आणि निक जोनस ही जागतिक स्तरावरील सर्वांची आवडती जोडी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या दोघांच्या लग्नाला लवकरच एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे आता दोघांचीही सेलिब्रेशनची तयारीदेखील सुरू झाली आहे. दरम्यान याच आनंदात प्रियांकाने निकला एक सरप्राईज देत गोड बातमी दिली आहे. ओहो! कोणताही अंदाज लावण्यापूर्वी पूर्ण गोष्ट नक्की जाणून घ्या. प्रियांका आणि निक या दोघांनाही कुत्रे खूपच आवडतात. त्यांच्या घरात आधीच तीन कुत्रे आहेत. पण आता निकला सरप्राईज करत प्रियांकाने अजून एक नवा कुत्रा घरात आणला आहे. निक झोपेत असतानाच तिने त्याला ही गोड बातमी देत आश्चर्याचा धक्का दिला आहे. निकचे हावभावदेखील तिने एक व्हिडिओद्वारे शेअर केले आहेत.
घटस्फोटाची बातमी दिल्याबद्दल प्रियांका आणि निक करणार मासिकाविरूद्ध कारवाई
प्रियांकाने दिले निकला सरप्राईज
निक झोपेत असतानाच सकाळीच प्रियांकाने निकला एक गोड सरप्राईज दिले असून त्याचा व्हिडिओदेखील तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यानंतर झोपेत असलेल्या निकला बसलेला सुखद धक्का हा बघण्यासारखा आहे. प्रियांकाच्या घरात एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं असून त्याचं नाव आहे ‘गिनो’ आहे. जर्मन शेफर्ड असलेला हा कुत्रा प्रियांकाने निक आणि तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आणला आहे. त्याशिवाय तिने निक आणि गिनोचा फोटोदेखील शेअर केला आहे. या व्हिडिओ आणि फोटो या दोन्हीमध्ये निक खूपच आनंदी दिसत आहे. असं असतानाही तिने फोटो शेअर करताना प्रियांकाने आपली सर्वात जवळची डायना (तिच्या पहिल्या कुत्रीचं नाव) असल्याचं सांगितलं आहे.
प्रियांका चोप्रा जगभरात गुगल सर्चवर सर्वात पुढे
प्रियांका नुकतीच भारतात येऊन गेली
प्रियांका चोप्राचा मागच्याच महिन्यात ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये झायरा वसिम, फरहान अख्तर आणि रोहित सराफ यांच्यादेखील प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला समीक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसंच प्रियांका चोप्राच्या कामाचीही प्रशंसा झाली होती. प्रियांका नुकतीच पुन्हा एकदा भारतात येऊन गेली आहे. तिचे काही दिवसांपासून फोटोही व्हायरल होते. त्याशिवाय प्रियांका आणि निक कधीही एकत्र गाणार नाहीत अशीही बातमी होती. निक आणि प्रियांका यांनी एकत्र गाणं म्हणावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. पण अजूनही अशी संधी दोघांनाही मिळालेली नाही. पण तरीही या दोघांनी एकत्र गाणं म्हणावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.
अभिनेता सुबोध भावे लवकरच येत आहे एका नव्या भूमिकेत
मुलाला द्यायचा आहे जन्म
प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी सांगितलं की, मुलाला जन्म तर द्यायचा आहे पण त्यासाठी अजून तिची आणि निकची मानसिक तयारी झालेली नाही. आता त्यांच्या लग्नालाही एक वर्ष पूर्ण होत आहे. शिवाय तिच्या आणि निकमध्ये बरंच अंतर असल्याने या दोघांनी लवकरही ही गोड बातमी द्यावी असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. निकला लहान मुलं खूप आवडतात हे त्याच्या अनेक पोस्टवरून दिसून येतं. त्यामुळे हे दोघंही आता लवकरच ही गोड बातमी देणार का याची उत्सुकता त्यांच्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. दरम्यान प्रियांका आणि निक दोघेही त्यांच्या कामात व्यग्र आहेत. प्रियांकाचे सध्या काही बॉलीवूड आणि हॉलीवूड असे दोन्ही प्रोजेक्ट चालू असून निकचे अनेक ठिकाणी शो चालू असतात.
You Might Like These: