जगभरात सध्या कोरोनाच्या संकटाची काळी सावली पसरली आहे. ज्यामुळे बॉलीवूड असो वा हॉलीवूड सर्वच सेलिब्रेटीजनां होम क्वारंटाईन व्हावं लागलं आहे. बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकेत पती निक जोनससोबत घरातच आहे. निक आणि प्रियांका त्यांचा क्वालिटी टाईम मस्त एन्जॉय करत आहेत. प्रियांका देखील सोशल मीडियावरून सतत तिच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. काही दिवसांपूर्वीच तिने कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हात स्वच्छ कसे धुवावे याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. आता प्रियांकाने घरात राहून स्वतःच्या केसांची काळजी कशी घ्यायची याच्या टिप्स दिल्या आहेत.
प्रियांकाने शेअर केल्या हेअर केअर टिप्स
लॉकडाऊनमुळे सध्या कुणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. ज्यामुळे ब्युटी पार्लर अथवा सलॉनमध्ये जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मात्र त्यामुळे प्रत्येकासमोर आपल्या त्वचा आणि केसांची निगा कशी राखायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सेलिब्रेटीजनां सतत प्रेक्षकांच्या समोर यावं लागत असल्यामुळे स्वतःच्या सौंदर्याची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र आता लॉकडाऊनमुळे त्यांनाही घरातच राहून यासाठी काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठीच अभिनेत्री प्रियांका चोप्राने घरात केसांची निगा कशी राखायची याबाबत हा व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे भारतात लहानाची मोठी झालेली असल्यामुळे प्रियांकाला असे घरगुती उपाय माहीत आहेत.
जाणून घ्या प्रियांका कशी राखते स्वतःच्या केसांनी निगा
प्रियांकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं आहे की हा घरगुती उपाय तिला तिच्या आईने सांगितला होता. एवढंच तिच्या आईला तिच्या आईने म्हणजेच प्रियांकाच्या आजीने हे शिकवलं होतं. लहानपणी घरी करत असलेला हा उपाय आता क्वारंटाईनमध्ये अमेरिकेत करण्याची वेळ तिच्यावर आली आहे. प्रियांकाने शेअर केलं आहे की, “केसांची काळजी घेण्यासाठी एका भांडयामध्ये थोडं योगर्ट अथवा घट्ट दही घ्या. त्यामध्ये काही थेंब मध मिसळा आणि त्यात एक अंड टाकून मिश्रण एकजीव करा. जवळजवळ तीस मिनीटे केसांवर हे मिश्रण लावून ठेवा आणि कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा.” या व्हिडिओसोबत तिने एक सूचनादेखील शेअर केली आहे की, “हे मिश्रण केसांसाठी अतिशय जबरदस्त आहे मात्र त्याचा वास मात्र तुम्हाला सहन होईलच असं नाही. ज्यामुळे हा वास घालवण्यासाठी कमीत कमी दोनदा केस शॅंपू करा. शॅंपू झाल्यावर केसांना कंडिश्नर लावण्यास मुळीच विसरू नका”
प्रियांकाने भारतालाही केली मदत
प्रियांका सध्या अमेरिकेत राहत असली तरी तिचे भारतावरील प्रेम आजही कायम आहे. म्हणूनच तिने कोरोनाच्या या लढ्यात आंतरराष्ट्रीय संस्थासोबतच भारतातील पीएम केअर फंडसाठीही देणगी दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी प्रियांकाचे विशेष आभारदेखील व्यक्त केले होते. यावर प्रतिक्रिया देताना देसी गर्लने शेअर केलं होतं की, “धन्यवाद श्री नरेंद्र मोदी.आपण सर्व एकत्र राहून मजबूत होऊया. ज्या ज्या लोकांनी या कार्यासाठी सहकार्य केलं आहे त्या सर्वांचे देखील आभार.” प्रियांका प्रमाणेच बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी पंतप्रधान मदत निधीला सहकार्य केलं आहे. ज्यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेला देशावरचा आर्थिक भार नक्कीच कमी करण्यास मदत होत आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
लॉकडाऊनमध्ये टायगर आणि दिशा लिव्ह-इनमध्ये रहात असल्याची चर्चा
लॉकडाऊन संपल्यावरदेखील प्रेक्षकांना नाही पाहता येणार ‘या’ मालिका
लग्न तुटल्याच्या बातमीवर गायिका सुनिधी चौहानचं मौन पण…