झालं बाबा एकदाचं प्रियांका आणि निकचं लग्न. आपल्या देसी गर्लला मानायला हवं पण…एकीकडे बॉलिवूडमध्ये आता जणू प्रथाच पडली होती, की देशापासून लांब जाऊन आपल्या कुटुंबाच्या आणि मित्रपरिवाराच्या साक्षीने लग्न करायचं. हो मान्य आहे, आपल्या हिंदू पध्दतीतच त्यांनी लग्न केलं होतं पण त्यांनी डेस्टिनेशन वेडींगसाठी दूर देश निवडला होता. मात्र आपल्या प्रियांकाचं सगळचं वेगळ आहे… जरी ती अमेरिकेची सून झाली असली तरी तिने आपल्या परंपरा आणि देशाला स्वतःपासून लांब केलं नाही. त्याचबरोबर निकच्या परंपरांचाही मान राखला. दोन्ही परंपरांचा सुंदर मेळ पाहायला मिळाला. प्रियांका आणि निकच्या प्रेमाच्या रंगात सगळेच रंगलेले दिसले.
हो तिने हिंदू आणि ख्रिस्ती पध्दतीने लग्न केलं आणि तिच्या तमाम चाहत्यांना सुखद धक्का दिला. आता आपले लाडके प्रियांका आणि निक जोधपूर मधून निघाले बरं का? जोधपूर एअरपोर्टवरचा त्यांचे फोटोज् नुकताच Instagramवर पोस्ट झालेत.
नववधू प्रियांताने सुंदर साडी नेसली आहे. तिच्या हातांवरची मेंदी आणि चुडा आणि भांगेमध्ये भरलेलं कुंकू, साऱ्यांच लक्ष वेधून घेत होतं.
28 नोव्हेंबरला जोधपूरचं उमेद भवन पॅलेस सजलं होतं. परदेशी वऱ्हाडी देसी गर्लच्या सासरी नेण्यासाठी जोधपूरलाही आले. म्हणता म्हणता 1 आणि 2 डिसेंबरला त्यांचं लग्न झालंही… आता प्रियांका आणि निक जोधपूरवरुन निघाले. आता प्रियांका आणि निकचा रिसेप्शन सोहळा दिल्ली आणि मुंबईत होणार असून, हॉलिवूड गाठलेल्या प्रियांकाच्या रिसेप्शनला कोण कोण देशी विदेशी सेलिब्रेटी येणार, याकडे साऱ्यांचंच लक्ष आहे. असं ऐकीवात आहे की भारताचे पंत प्रधान नरेंद्र मोदी, खुद्द प्रियांकाला आशिर्वाद द्यायला रिसेप्शनला हजेरी लावणार आहेत. आता हे खरं की खोटं हे लवकरचं समोर येईल.
फोटो सौजन्य- Instagram