बिझनेसक्षेत्रात हल्ली महिला फारच अग्रेसर आहेत. घर सांभाळून बिझनेस करणे हे महिलांना आता चांगले जमू लागले आहे. मसाले विक्री, डबे देणे, ब्युटी पार्लर,शिवणकाम असे बिझनेस महिला अगदी आवर्जून करतात. ब्युटी पार्लरचा बिझनेस हा असा बिझनेस आहे ज्यामध्ये महिला या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ज्यांना याची आवड आहे त्यांनी अगदी हमखास हा बिझनेस करायला हवा. पण कोणताही बिझनेस करताना त्यामध्ये फायदे आणि तोटे हे असतातच. ब्युटी पार्लरच्या बिझनेसत्या बाबतीतही अगदी तसेत आहे. तुम्ही हा बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर या बिझनेसचे फायदे आणि तोटे माहीत असायला हवेत.
डी टॅनसाठी वापरा गव्हाचे पीठ, असा करा घरच्या घरी फेसपॅक तयार
सेटअप आहे महत्वाचा
पार्लरचा बिझनेस म्हटले की, सेटअप हा आलाच. पण हा सेटअप उभारण्यासाठी जागा देखील आली. तुम्ही पार्लर सुरु करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी मोक्याची आणि तुमच्या बजेटमध्ये बसेल अशी जागा शोधा. पार्लर हे असेच सहज उघडता येत नाही. तुम्ही कितीही बिझनेस म्हणून त्याचा विचार केला तरी देखील तुम्ही त्यासाठी लागणारे सामान, जागा यांचे मोजमाप करणे गरजेचे असते. त्यामुळे सगळ्यात आधी सेटअप आणि जागेची तयारी करा. आता सेटअप घेण्यामागील फायदा आणि तोटा जाणून घेताना तुम्हाला तोटा असा की, शून्य इन्व्हेस्टमेंटमध्ये हा बिझनेस करता येत नाही. फायदा असा की, आपले नवे साहित्य असेल तर नवी उमेद आणि गिऱ्हाईकांना आकर्षित करणे सोपे जाते.
लग्नाच्या आधी हवी असेल तजेलदार त्वचा तर मुलतानी मातीमध्ये करा ‘हे’ मिक्स
मार्केट जाणून घ्या
कोणताही बिझनेस सुरु करताना त्या गोष्टींची तुम्हाला किती माहिती आहे ते देखील माहीत असायला हवे. मार्केटचे ज्ञान असणे कोणत्याही बिझनेससाठी त्याचे ज्ञान हे खूपच महत्वाचे असते. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही पार्लरची गरज कोणत्या परिसरात जास्त आहे हे देखील माहीत करुन घ्या. त्यानुसार तुम्हाला सेटअप कसा हवा आहे ते देखील माहीत पडेल. जर तुम्हाला फायद्यात राहायचे असेल तर तुम्ही अभ्यासू असायला हवे. आता कोणत्याही बिझनेसच्या सुरुवातीला तुम्ही याची माहिती करुन घेणे जास्त करणे आहे. त्यामुळे तुम्हाला फायदाच होतो.
नव्या टेक्निकची माहिती
पार्लरमध्येही वेगवेगळ्या टेक्निक या कायम येत असतात. त्या नवनव्या गोष्टी तुम्ही जेवढ्या जास्त शिकाल तेवढे तुमच्या पार्लरला अधिक पसंती मिळते. त्यामुळे तुम्ही या गोष्टीही शिकायला हव्यात. तुम्ही नव्या गोष्टी शिकल्या तर तुम्हाला त्याचे फायदेच फायदे मिळतात. जर तुम्ही पार्लर सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्हालाही त्या गोष्टीची माहिती असायला हवी. तरच तुम्हाला कोणाकडूनही काम करुन घेणे गरजेचे असते.
कामासाठी माणसं ठेवणे
पार्लरमध्ये तुम्ही एकटं काम करणं हे कदापी शक्य नाही. त्यामुळे तुम्हाला कामाला माणसंही ठेवावी लागतात. आता कामांसाठी माणसं ठेवताना त्यांचे पगार आणि त्यांना पुरवणाऱ्या सोयी सुविधा यांची देखील माहिती असायला हवी. फायद्याची गोष्ट इतकीच की तुमचे काम पटापट होईल. पण तोटा असा की जितका पसारा वाढत जाईल तितका तुम्हाला ताण वाढलेला जाणवेल.
Daily Skincare Routine At Home In Marathi
प्रॉडक्टसची खरेदी
पार्लर म्हटले की, प्रॉडक्टस खरेदी आलीच. पार्लर हे केवळ सर्व्हिसेसमुळे नाही तर तेथे असणाऱ्या ब्रँडमुळेही चालते. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रॉडक्ट स्वत: कडे जास्तीत जास्त कसे ठेवता येतील ते पाहा. शिवाय त्याचा खप बघून मगच तुम्ही ते तुमच्या पार्लरमध्ये ठेवा. तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल.
आता ब्युटी पार्लर सुरु करण्याआधी या काही गोष्टींची माहिती करुन घ्या.