ADVERTISEMENT
home / Diet
quinoa vs oats

सुपरफूड क्विनोआ खावे की ओट्स, कुठले धान्य आहे अधिक पौष्टीक 

सकाळचा नाश्ता करणे खूप महत्वाचे असते. सकाळच्या न्याहारीचे वर्णन हे अनेकदा ‘दिवसाचे सर्वात महत्त्वाचे अन्न’’ असे केले जाते. रात्रीचे जेवण झाल्यानंतर आपण थेट दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करतो. म्हणजे मधले जवळजवळ बारा तास आपले पोट रिकामे असते. त्यामुळे सकाळी न्याहारी करणे महत्वाचे असते. सकाळची न्याहारी तुमची उर्जा पातळी आणि सतर्कता वाढवण्यासाठी शरीरातील ग्लुकोजचा साठा पुन्हा भरून काढते, तसेच चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक इतर आवश्यक पोषक तत्वे देखील पुरवते. सकाळची न्याहारी तुमची उर्जा पातळी आणि अल्पावधीत लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते आणि अधिक चांगले वजन व्यवस्थापन, टाइप 2 मधुमेह आणि दीर्घकालीन हृदयरोगाचा धोका कमी करण्यात मदत करू शकते. आरोग्यासाठी न्याहारीचे फायदे असूनही, बरेच लोक विविध कारणांमुळे नाश्ता करत नाहीत. 

सकाळचा नाश्ता असावा पौष्टिक  

सकाळचा नाश्ता हा पौष्टिक व आरोग्यदायी असला पाहिजे. सकाळी आपल्याला काहीतरी चविष्ट पण आरोग्यदायी खावेसे वाटते आणि अशा परिस्थितीत ओट्स खाण्याचा पहिला विचार मनात येतो. लोकांना त्यांच्या नाश्त्यामध्ये विविध प्रकारे ओट्सचा समावेश करायला आवडते. पण ओट्स व्यतिरिक्त, क्विनोआकडे देखील एक सुपरफूड म्हणून पाहिले जाते, जे अगदी सहज उपलब्ध आहे. हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पण तरीही, या दोन्हींपैकी नेमके काय जास्त पौष्टिक आहे हा विचार आपल्या मनात येतो. 

क्विनोआ आणि ओटमीलमधील पोषक घटक 

क्विनोआ सेवन करण्याचा एक मुख्य फायदा म्हणजे त्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. एक कप शिजवलेल्या क्विनोआमधून आठ ग्रॅम प्रथिने मिळतात, तर एक कप शिजवलेल्या ओटमीलमध्ये 6 ग्रॅम प्रथिने असतात.क्विनोआ प्रथिनांच्या गुणवत्तेत ओट्सलाही मागे टाकते. क्विनोआमध्ये आवश्यक असलेली सर्व आवश्यक अमीनो ऍसिड्स असतात, तर ओटमीलमध्ये फक्त काही आवश्यक अमीनो ऍसिड्स असतात. याचा अर्थ असा की क्विनोआ तुमच्या शरीराला निरोगी टिश्यूज राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि ऊतींना ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व अमीनो ऍसिड्स पुरवते.

Quinoa Vs Oatmeal
Quinoa Vs Oatmeal

क्विनोआ आणि ओटमीलमधील फायबरचे प्रमाण 

क्विनोआ आणि ओट्स हे दोन्हीही फायबरचे उत्कृष्ट स्रोत आहेत. परंतु क्विनोआ आपल्या शरीराला थोडे अधिक फायबर प्रदान करते. आहारात फायबरचा समावेश केल्याने केवळ अन्नपचनच व्यवस्थित होत नाही तर फायबर हे बद्धकोष्ठतेशी लढा देते आणि डायव्हर्टिकुलोसिस सारख्या पाचन विकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, फायबर खाल्ल्याने आपल्याला जास्त काळ पोट भरलेले असल्याची जाणीव राहते आणि त्यामुळे आपण अनावश्यक कॅलरीजचे सेवन कमी करतो. म्हणजेच क्विनोआ हे लठ्ठपणाशी लढा देण्यात देखील फायदेशीर आहे.  तसेच, ते टाइप 2 मधुमेह प्रतिबंधित करण्यात मदत करते. एक कप शिजवलेल्या क्विनोआमध्ये सुमारे 5 ग्रॅम फायबर असते, तर एक कप शिजवलेल्या ओट्समध्ये 4 ग्रॅम फायबर असते.

ADVERTISEMENT
Quinoa Vs Oatmeal
Quinoa Vs Oatmeal

क्विनोआ आणि ओटमीलमधील सूक्ष्म पोषक घटक 

क्विनोआ आणि ओटमीलमध्ये विविध प्रमाणात सूक्ष्म पोषक घटक असतात. ओटमीलमध्ये 61 मिलीग्राम मॅग्नेशियम असते तर क्विनोआमध्ये 118 मिलीग्राम मॅग्नेशियम असते. पण ओट्समध्ये क्विनोआपेक्षा पाचपट जास्त प्रमाणात लोह असते. मॅग्नेशियम आणि लोह तुमच्या पेशींना ऊर्जा निर्माण करण्यात मदत करतात. तसेच रक्तपेशींच्या कार्यास प्रोत्साहन देतात, तर मॅग्नेशियम निरोगी हाडे आणि दातांसाठी आवश्यक आहे. ओट्स आणि क्विनोआ हे दोन्ही फोलेट किंवा व्हिटॅमिन बी-9 चे उत्कृष्ट स्रोत आहेत. 

क्विनोआ आणि ओट्स हे दोन्हीही पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत. म्हणूनच या दोन्हीचे सेवन करणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

13 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT