हिंदू धर्मात राधे-श्याम किंवा राधे-कृष्ण… हे शब्द अतूट प्रेमाची ओळख मानले जातात. जरी त्यांचे एकमेकांशी लग्न झाले नाही तरी ते नेहमीच एकमेकांच्या नावाने ओळखले जातात. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. तो दिवस गोकुळाष्टमी म्हणून ओळखला जातो. भगवान श्री कृष्ण आणि राधा यांचे नाते सहसा पती-पत्नी नव्हे तर प्रियकर-प्रेयसी म्हणून ओळखले जाते. मात्र, या दोघांच्या विवाहाची कथा ब्रह्मवैवर्त पुराणातही आढळते आणि विवाहाचे ठिकाणही सांगितले आहे. श्रीकृष्णासोबत राधा सर्वत्र दिसते. याचे कारण राधाचे प्रेम अतूट होते. ही गोष्ट खुद्द भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीला सांगितली होती. पण हे प्रेम म्हणजे भौतिक किंवा शारीरिक प्रेम नव्हे तर राधा कृष्णाचे प्रेम हे आध्यात्मिक आहे. एखाद्या आराध्याची भक्त किती तीव्रतेने भक्ती करू शकतो याचे राधा हे मोठे उदाहरण आहे. कृष्णाला रुक्मिणी, सत्यभामा व इतर सोळा हजार एकशे सहा पत्नी होत्या. पण कृष्णाबरोबर नाव मात्र राधेचेच घेतले जाते. इतकी राधेची भक्ती व प्रेम श्रेष्ठ आहे. लोक रोमिओ ज्युलिएट, हिर -रांझा असे काल्पनिक सामान्य प्रेमाचे दाखले देतात पण त्याचवेळी ते राधा-कृष्णाचे प्रेम मात्र विसरतात. लोक हल्ली प्रेम, मैत्री यांची माहिती सांगणारे स्टेटस ठेवतात. राधा-कृष्णाच्या प्रेमासारखे अतूट प्रेम क्वचितच सापडेल. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत राधे कृष्ण कोट्स मराठी (Radha Krishna Quotes In Marathi).
राधा कृष्ण कोट्स मराठी | Radha Krishna Quotes In Marathi
जेव्हा कृष्ण वृंदावनात बासरी वाजवत असे तेव्हा तिथे गायींबरोबर गोपिका देखील येत असत. त्यातील एक गोपिका राधा देखील होती जिचे मन कृष्णमय झाले होते. कृष्णाचे लोभस रूप बघून कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. आज इतक्या वर्षांनी देखील सर्वांनाच कृष्णाचे मनमोहक नटखट रूप बघत राहावेसे वाटते. कृष्णाच्या प्रेमात सगळे जग बुडाले असले तरी कृष्णाच्या मनात मात्र राधेचेच नाव होते. वाचा राधा कृष्ण कोट्स मराठी –
प्रेमाचा खरा अर्थ जर काहीही झालं तरी आपल्या आवडत्या व्यक्तीने आपलंच व्हावं असा असता तर प्रत्येकाच्या हृदयात राधेबरोबर कृष्ण नसता..
राधा कृष्णाने आयुष्यभर विश्वकल्याणासाठी त्याग करून आदर्श प्रस्थापित केला पण अज्ञानी लोक अजूनही केवळ स्वतःच्या स्वार्थासाठीच जगतात.
प्रीती असावी तर राधा आणि कृष्णासारखी.. जी भलेही लग्नाच्या बंधनात बांधली गेली नसेल पण हृदयात कायम जपलेली असेल…
सगळ्याच प्रेमकथांचा शेवट जर लग्नात होत असता तर रुक्मिणीच्या जागी राधा असती.
राधेच्या खऱ्या प्रेमाची ही कहाणी आहे…कृष्णाच्या आधी तिचे नाव घेतले जाते हीच तर तिच्या प्रेमाची निशाणी आहे
एकदा राधेने कृष्णाला विचारले, प्रेम करून काय फायदा आहे. कृष्णाने उत्तर दिले , जिथे फायदा बघितला जातो तिथे प्रेम नसतेच…
अति दिखाऊ प्रेम हे खऱ्या प्रेमाचे पावित्र्य नष्ट करते.
मी अधुरा आहे तुझ्या विना.. जसा अपुरा आहे राधे विना कान्हा!
तुम्ही कुणावर खरे प्रेम केल्याशिवाय तुम्हाला प्रेमाचा अर्थ समजूच शकत नाही.
राधा कृष्णाची भेट हा खरं तर जगाला दाखवण्यासाठी एक देखावा होता, त्याचा खरा उद्देश तर जगाला प्रेमाचा खरा अर्थ सांगायचा होता.
वाचा – श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
बेस्ट राधा कृष्ण लव कोट्स मराठी | Best Radha Krishna Love Quotes In Marathi
जेव्हाही कृष्ण बासरी वाजवत असे तेव्हा त्या नादात मोहित होऊन राधा नृत्य करत असे. हे मनोमर दृश्य बघितल्यावर वृंदावनात जणू स्वर्गच खाली उतरला आहे असे दृश्य असे. कृष्णाला प्रेमाने गोपिका माखनचोर म्हणत असत त्या माखनचोराचे मन मात्र राधेने चोरले होते. राधेचे कृष्णभक्तीप्रती असलेले समर्पण हे प्रेमातील व भक्तीतील एक उच्च स्थान आहे जे गाठणे सर्वसामान्य माणसासाठी अशक्य आहे. राधा कृष्णाचे हे पवित्र प्रेम सांगणारे बेस्ट राधा कृष्ण लव कोट्स मराठी तून वाचा-
राधा कृष्णाचे प्रेम हे भौतिक प्रेम नव्हे, तर तो भक्तीचा, समर्पणाचा परमोच्च बिंदू आहे.
कृष्णाने राधाला विचारले, अशी एक जागा सांग जिथे मी नाही…तेव्हा राधाने हसून उत्तर दिले, “माझ्या नशिबात!”
प्रेमात दोन आत्म्याचे मिलन होते. जसे प्रेमात कृष्णाच्या हृदयात राधा आणि राधेच्या हृदयात कृष्णाचे स्थान असते.
या जगात बदल हाच कायम आहे. परिस्थितीनुसार कोणाचे रूप बदलते तर कोणाची नियत, पण जेव्हापासून तू माझा हात धरला आहेस राधे, तेव्हापासून माझे नशीबच पालटले आहे.
एकीकडे घननिळा ,सावळा कान्हा, तर दुसरीकडे राधिका गोरी… असे भासतात जणू एकमेकांना भेटले आहेत चंद्र आणि चकोरी…
अधुऱ्या कहाणीवर अस्फुट शब्दांचा पहारा आहे… घाव बसलाय हृदयावर म्हणूनच वेदना जरा जास्त आहेत.
माझ्या मनातले जग खूप सुंदर आहे जे कृष्णापासून सुरु होऊन कृष्णाकडेच येऊन संपते.
राधेचे प्रेम आहे कृष्ण, तिच्या हृदयातली भक्ती आहे कृष्ण, तिच्या अस्तित्वाचे कारण आहे कृष्ण, तिच्या मनात केवळ एकच भाव -कृष्ण…
प्रेम ते नव्हे जे बोलून व्यक्त केले जाते… प्रेम तर ते आहे जे न बोलूनही समोरच्याला कळते…प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे समर्पण…न मागताही जे केले जाते अर्पण!
फक्त हवे ते मिळवण्याला प्रेम समजणे ही तर जगाची रीत आहे. प्रेमाचा खरा अर्थ म्हणजे राधा कृष्णाची प्रीत आहे.
वाचा – बाळासाठी कृष्णाची नावे
राधा कृष्ण स्टेटस मराठी | Radha Krishna Status Marathi
राधा कृष्णाचे प्रेम हे आध्यात्मिक स्तरावरचे प्रेम होते. त्यांची शरीरे जरी वेगळी असली तरी त्यांचे मन व हृदय एकच होते. ते अद्वैत पावलेले होते. म्हणूनच त्यांच्या या नात्याला व्यावहारिक बंधनांची आवश्यकता नव्हती. त्यांना त्यांचे हे नाते शारीरिक व भौतिक स्तरावर नेऊन मलीन करायचे नव्हते. म्हणूनच राधेशिवाय कृष्णाचे नाव घेतले जात नाही आणि कृष्णाशिवाय राधेचे नाव अधुरे आहे.
अरे कान्हा, तुला मिळवूनच दाखवणे हे मला जरुरी वाटत नाही… मी तुझे होऊन जाणे हेच माझ्यासाठी पुरेसे आहे.
अरे कृष्णा, अरे मनमोहना…माझ्या स्वप्नांत तुला बघून माझे हृदय पुन्हा पुन्हा हरवते… मी स्वतःला कितीही थांबवले तरी मी परत परत तुझ्याच प्रेमात पडते…
राधेने कृष्णाला पत्र पाठवले, पूर्ण पत्रात तिने फक्त कृष्णनामच लिहिले.
कृष्ण जर संगीत असेल तर राधा त्यातील सूर आहे, कृष्ण जर मध असेल तर राधा त्यातील गोडवा आहे.
प्रत्येक संध्याकाळ कुणाला तरी हुरहूर लावून जाते, दाटुनी येती मेघ जेव्हा सल हृदयात उमटून जाते. दोन प्रेमी जीवांच्या भावनांना काहीतरी अर्थ नक्कीच असेल नाहीतर राधा कृष्णाचे प्रेम जगात श्रेष्ठ ठरले नसते…
कुणास ठाऊक ती गंमत होती की प्रेमाचा पैगाम होता, जेव्हा मी राधा झाले तेव्हा तो श्याम होता…
राधेच्या खऱ्या प्रेमाचे हे बक्षीसच आहे की लोक आजही कृष्णाच्या आधी राधेचे नाव घेतात.
राधा सगळ्या जगाला सांगते , तुमच्या आणि माझ्या प्रेमात फक्त इतकेच अंतर आहे की, प्रेमात पडून तुम्ही तुमचे सगळे हरवता पण मी स्वतःला प्रेमात हरवून सगळे मिळवले.
राधेच्या हृदयात श्याम आहे, राधेच्या श्वासांत श्याम आहे. राधेच्या ध्यासात श्याम आहे आणि म्हणूनच दुनियेच्या मुखात राधा-कृष्ण नाम आहे.
प्रेम हे हट्ट करून मिळत नाही तर ते नशिबातच असावं लागतं… नाहीतर या तिन्हीं जगांचा स्वामी श्रीकृष्ण त्याच्या राधेच्या विरहात राहिला नसता…
वाचा – रक्षाबंधन माहिती आणि महत्त्व
राधा कृष्ण इमेजेस विथ कोट्स मराठी | Radha Krishna Images With Quotes In Marathi
गोकुळ सोडल्यावर कृष्णावर अनेक जबाबदाऱ्या होत्या. त्या पूर्ण करताना तो परत वृन्दावनास गेला नाही व राधेलाही भेटला नाही. पण राधेच्या मनात मात्र शेवटच्या श्वासापर्यंत कृष्णनामच होते. जगाचे पालन करताना कृष्णाच्याही मनात राधेचे स्थान तसेच होते पण त्याच्यावर सगळ्या जगाची जबाबदारी असल्याने त्याला स्वतःच्या प्रेमासाठी वेळच नव्हता. राधा-कृष्ण शरीराने एकमेकांपासून लांब असले तरी मनाने मात्र ते एकच होते. त्यांचा आत्मा एकच होता.
गोकुळामध्ये ज्याचा वास, गोपिकांबरोबर जो खेळला रास, यशोदा -देवकी ज्याची लाडकी मैय्या, तोच साऱ्यांचा लाडका श्रीकृष्ण कन्हैय्या…
गोपिकांचा नंदलाला, गोकुळ ज्याचे गाव.. खऱ्या प्रेमाचा एकच ठाव ज्याच्या मनी राधा कृष्णाचे नाव…
गोपिकांना भुलवी मथुरेचा नंदलाला, शोधता वनी-रानी राधेचा तो कृष्ण सखा…
मथुरा नगरी झाली दंग पाहुनी कृष्णाची खोडी, यमुनेच्या काठावरी दिसे राधा कृष्णाची जोडी..
ओलेत्या सांजवेळी राधा कृष्णाची भेट होई यमुनेच्या किनारी , संगती वेणूचे सूर घुमती देउनी प्रीतीची ललकारी..
सुख शांतीचा झरा वाहतो प्रेमाच्या अंगणी, राधा-कृष्ण नाम मनी उमटले हर्ष दाटे गगनात…
मनी सौख्य उमलले, ओठी हास्य फुलले.. आनंद उमटला मनी…मथुरापती कृष्ण सखा दिसे उभा अंगणी!
प्रेम असल्याचा दावा अनेक लोक करतात पण प्रेमाची शक्ती त्यांनाच मिळते ज्यांच्याजवळ कुठल्याही भयाविना प्रेम निभावण्याचे साहस असते.
वाचा – यंदा दहीहंडी साजरी करा घरीच, ऐका ही हिट बॉलीवूड गाणी
राधा कृष्ण लव्ह स्टेटस मराठी | Radha Krishna Love Status In Marathi
प्रेम हे दोन मनांचे , आत्म्यांचे मिलन आहे, शरीरांचे नव्हे! खरे प्रेम तेच आहे ज्यात शरीरे दोन असली तरी आत्मा मात्र एकच आहे. हीच शिकवण राधा-कृष्णाच्या पवित्र प्रेमाने जगाला दिली आहे. शुद्ध पवित्र प्रेम हे भक्तीचेच एक रूप आहे. यात शारीरिक वासनेला स्थान नाही. जरी शरीराने लांब असले तरी मनाने एकच असणाऱ्या या जीवांना अंतर कितीही असले तरी फरक पडत नाही. अशा प्रेमाचे वर्णन करणारे राधा कृष्ण लव्ह स्टेटस मराठी तून वाचा.
रूप रंगच जर प्रेमाचा आधार असता तर ज्याला कधीच बघितले देखील नाही त्याच्यावर प्रेम कसे जडले असते…
एकदा राधेने कृष्णाला विचारले, तुझे माझ्यावर किती प्रेम आहे… तेव्हा कृष्णाने उत्तर दिले, राधे जर तुला जाणून घ्यायचे असेल की माझ्या हृदयात कोण आहे तर एकदा माझ्या हृदयात बघ. तुझ्या हृदयात मी आणि माझ्या हृदयात तू असे आपण अद्वैत पावलेले आहोत.
नशिबात काही नाती अधुरी लिहिलेली असतात…पण त्यांच्या आठवणी मात्र खूप सुंदर असतात…
प्रेम तर राधेने केले होते. जिला कृष्णाचा विरह सुद्धा मान्य होता आणि कृष्णाच्या आयुष्यातली रुक्मिणी देखील…
प्रेम व्यक्त करण्यासाठी एकत्र राहण्याचीच गरज असते असे नाही.. काही प्रेमकथा या विरहात राहून देखील जगभरात पुजल्या जातात…
हे कान्हा…माझ्या प्रेमाला आता कोणती सीमाच राहीली नाही…आता तक्रारही तुझीच आणि प्रार्थनेत देखील तूच आहेस…
राधा कृष्ण फ्रेंडशिप कोट्स मराठी | Radha Krishna Friendship Quotes In Marathi
राधा ही कृष्णाची फक्त परमभक्तच नव्हती तर ती त्याची प्रिय सखी देखील होती. राधा कृष्णाला आराध्य मानण्याबरोबरच सखा देखील मानत होती. त्यांच्या प्रेमाबरोबरच त्यांची पवित्र मैत्री देखील जगाने बघितली.
पूर्ण आहे श्रीकृष्ण, परिपूर्ण आहे राधा… आदि आहे श्रीकृष्ण, अनंत आहे राधा…
कृष्ण वाजवी वृंदावनी वेणू, ऐकून झाली राधा दिवाणी.. जेव्हा जेव्हा कान्हा वाजवी वेणू, वेगे पळत येई राधा राणी…
कर्तव्याच्या मार्गावर जाताना राधेची आठवण होताच कृष्णाचे पाय क्षणभर थांबले, राधेची अद्वैत भक्ती बघून ब्रह्मदेवही गहिवरले…
राधा -राधा असा जप करून होईल तुझा उद्धार, कारण हेच ते नाव आहे ज्यावर कृष्णाची प्रीती अपार…
जर तुम्हाला राधेचे कृष्णाप्रती असलेले समर्पण कळले तर समजून जा की तुम्हाला प्रेमाचा खरा अर्थ कळला आहे.
प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिनी राधेचे मन कृष्णमय होते, अन त्या कृष्णसख्याच्या मनातही राधेचे स्मरण चालते..
राधा-कृष्ण हे भारतीयांचे आराध्य दैवत आहे. उच्च कोटीचे प्रेम व समर्पण बघायचे असेल तर राधा-कृष्णाच्या नात्याचा अभ्यास करायला हवा. त्यांच्या या पवित्र नात्यातून कळते की पवित्र प्रेम हे भक्तीचेच एक रूप आहे. जिथे शारीरिक वासना नाही, जिथे स्वार्थ नाही, जिथे अपेक्षा नाहीत असे ते प्रेम म्हणजेच खरे प्रेम आहे. राधा कृष्णाच्या या सुंदर भक्तिमय प्रेमाची आठवण करून देणारे राधे कृष्ण कोट्स मराठी (Radha Krishna Quotes In Marathi) तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा.
अधिक वाचा – श्रीमद् भगवत गीता मराठी सुविचार आणि उपदेश