ADVERTISEMENT
home / Mythology
bhagavad gita quotes in marathi

Bhagavad Gita Quotes In Marathi | श्रीमद् भगवत गीता मराठी सुविचार आणि उपदेश

श्रीमद् भगवत गीता हा एक प्राचीन आणि पवित्र ग्रंथ आहे. भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर झालेल्या महायुद्धाच्या सुरूवातीला शिष्य अर्जुनाला गुरू रूपात उपदेश केलेला होता. गुरू शिष्याचा हा संवाद म्हणजेच भगवत गीता ग्रंथ. या ग्रंथातून श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनातील विविध टप्पे आणि प्रसंगाबद्दल मार्गदर्शन केलेले आहे. या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे गीतासार सांगत असताना श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन म्हणजेच साक्षात्कार केला होता. हा ग्रंथ संस्कृत काव्य स्वरूपात असून त्याचे एकूण अठरा अध्याय आणि सातशे ओव्या आहेत. आधुनिक काळानुसार आता या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे. आचार्य विनोबा भावेंनी गीतेचे मराठीत केलेले भाषांतर म्हणजे गीताई. भारतात भगवदगीतेला अतिशय पवित्र ग्रंथ मानले जाते. संकटात अडकलेल्या, मार्गहीन अथवा अपयशाने खचलेल्या लोकांसाठी या ग्रंथातील उपदेश प्रेरणादायी ठरतात. हजारो वर्षांपूर्वी साकार झालेल्या या ग्रंथात आजही लोकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचे दिव्य सामर्थ्य आहे. यासाठीच जाणून घेऊ या भगवत गीता मराठी माहिती (geeta saar in marathi) यासोबतच समजून घेऊ या भगवद् गीता सुविचार (bhagavad gita quotes in marathi) आणि भगवत गीता श्लोक मराठीतून 

भगवद् गीता सुविचार | Bhagavad Gita Quotes In Marathi

bhagavad gita quotes in marathi
bhagavad gita quotes in marathi

भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश मानवी जीवनातील प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक आहे. यासाठीच जाणून घ्या हे भगवद् गीता सुविचार (bhagavad gita quotes in marathi).

  1. जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे.

2. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार तेही चांगलेच होणार

3. मन अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करणे कठीण आहे, पण विशिष्ठ अभ्यासाने मनाला वश करता येते.

ADVERTISEMENT

4. मनाच्या शांती शिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही.

5. कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो.

6. फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेत खरे कर्म आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म

7. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत बदलते.

ADVERTISEMENT

8. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नाही.

9. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदी असू शकत नाही.

10. जर मनाला नियंत्रित केलं नाही तर ते शत्रूसमान काम करेल.

दिवसाची सुरुवात करा सूर्योदय कोट्सपासून (Sunrise Quotes In Marathi)

ADVERTISEMENT

भगवत गीता विचार मराठी | Bhagavad Gita Thoughts In Marathi

bhagavad gita quotes in marathi
bhagavad gita quotes in marathi

भगवत गीता जरी संस्कृत भाषेत आणि काव्य स्वरूपात असली तरी त्याचे मराठी भाषांतर झालेले असल्यामुळे भगवत गीता विचार मराठीतूनही (Bhagavad Gita thoughts in marathi) उपलब्ध आहेत.

1.कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते.

2. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो, तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनते.

3. माफ करणं आणि शांत राहणं शिकाल तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देतील.

ADVERTISEMENT

4. इतिहास सांगतो की, भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म सांगतो की, मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल.

5. अती आनंदी असताना आणि अती दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका. कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत.

6. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणाच करू शकत नाही.

7. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे, जे फक्त त्याच्याच हातात आहे.

ADVERTISEMENT

8. सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मीच सत्य आहे.

9. ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असे नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो.

10. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसंच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात.

जीवन जगताना मानसिक समाधान देतील हे आध्यात्मिक सुविचार (Spiritual Quotes In Marathi)

ADVERTISEMENT

आनंदावरील गीता उपदेश मराठी | Bhagavad Gita Quotes In Marathi On Happiness

bhagavad gita quotes in marathi
bhagavad gita quotes in marathi

माणूस आयुष्यभर आनंदाच्या शोधात असतो. आनंदाच्या शोधात त्याचा संपूर्ण जन्म वाया जातो पण त्याला हवा असलेला खरा आनंद मिळत नाही. यासाठीच जाणून घ्या आनंदावरील गीता उपदेश मराठी (Bhagavad Gita Quotes On Happiness).

1. जेव्हा माणूस त्याच्या कामात आनंद शोधतो तेव्हा त्याला पूर्णत्व येते. 

2. इंद्रिये आणि जाणिवेतून निर्माण होणारा आनंद नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरतो.

3. तुझं, माझं, छोटं, मोठं असे भेद मनातून काढून टाका, मग सगळं तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात.

ADVERTISEMENT

4. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे आणि सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे.

5. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांसाठी कधीच करू नका.

6.  माणसाचे ह्रदय पवित्र असेल तर त्याचे प्रेम बाहेरूनही पाझरू लागते.

7. कृष्णासाठी राधेने प्रेम पत्र लिहीलं, पूर्ण पत्रात फक्त कृष्णाचं नाव लिहीलं

ADVERTISEMENT

8.जेव्हा तुम्ही ईश्वरावर खरे प्रेम करता तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर बिना संशय प्रेम करू लागता.

9. जीवनात शांती हवी असेल तर नेहमी सतुंलित जीवन जगा

10. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता, अंहकाराशिवाय काम करतात.

आर्य चाणक्य नीती आणि कोट्स (Chanakya Quotes In Marathi)

ADVERTISEMENT

भगवत गीता श्लोक मराठी | Bhagvad Gita Shlok In Marathi

Bhagvad Gita Shlok In Marathi
bhagavad gita quotes in marathi

भगवत गीतेतील श्लोकामधून जे सार सांगितेलेले आहे ते समजून त्याप्रमाणे आचरण केल्यास मानवी जीवन नक्कीच सुख, समाधानाचे असू शकते. यासाठीच जाणून घ्या भगवत गीता श्लोक मराठी अर्थ (Bhagvad Gita Shlok In Marathi)

1.परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

मराठी अर्थ – सज्जन व्यक्ती कल्याणासाठी आणि दृष्ट व्यक्ती विनाशासाठी असतात. धर्म स्थापनेसाठी युगोनयुगे मी प्रत्येक युगात जन्म घेत आलो आहे. 

2. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥

ADVERTISEMENT

मराठी अर्थ – कर्मावर माणसाचा अधिकार आहे, मात्र मात्र फळ कधी मिळणार हे त्याच्या हातात नाही. कर्माचे फळ कर्मातच असल्यामुळे माणसाने फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहावे.

3. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत:।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥

मराठी अर्थ – हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माचे पतन झाले आणि अधर्म वाढला, तेव्हा तेव्हा धर्माच्या संरक्षणासाठी मी स्वतः अवतार घेतला.

4. नैनं छिद्रन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत ॥

ADVERTISEMENT

मराठी अर्थ – आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, आग जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, हवा सुकवू शकत नाही. 

5. ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते। सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥ 

मराठी अर्थ – सतत विषयाचा विचार केल्यामुळे माणूस विषयाबाबत आसक्त होतो, ज्यातून त्याच्या मनात कामना म्हणजेच इच्छा निर्माण होते, कामना पूर्ण न झाल्यास त्याच्या मनात त्याबद्दल क्रोध निर्माण होतो. 

भगवद् गीता यशावरील सुविचार | Bhagavad Gita Marathi Quotes On Success

bhagavad gita quotes in marathi
bhagavad gita quotes in marathi

भगवत गीतेत सांगितेलेले सार संपूर्ण मानवी जीवनाच्या कल्याणासाठी हितकारक आहे. जर तुम्हाला जीवनात यश हवे असेल तर त्यासाठी भगवद् गीतेतील यशावरील सुविचार (Bhagavad Gita Marathi Quotes On Success) जरूर वाचा.

ADVERTISEMENT

1. तुम्ही लक्ष्यापासून दूर एखाद्या अडथळ्यामुळे नाही जात तर तुमचे लक्ष्यच कमजोर असते अथवा स्पष्ट नसते.

2. यश मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्म नियंत्रण

3. रिकाम्या हाताने आला होतात रिकाम्या हातानेच या जगातून जाल, हातात असेल फक्त तुमचे कर्म

4. एखादी भेट तेव्हाच शुद्ध असते, तेव्हा ती शुद्ध मनाने, चांगल्या व्यक्तीला, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी निस्वार्थपणे दिली जाते. 

ADVERTISEMENT

5. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे  दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाखमोलाचे आहे

6. कर्माची आसक्तीच माणसाला स्वार्थी बनवते आणि कर्मबंधनात अडकवते.

7. फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म निस्वार्थ आणि उत्तम श्रेणीचे असते.

8. जीवनात हाती आलेले काम करत राहिले पाहिजे कारण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणे नेहमीच चांगले.

ADVERTISEMENT

9. एखादी ज्ञानी हुशार व्यक्तीपण कर्म आणि अकर्मामधील अंतर समजू शकत नाही.

10. जो निस्वार्थ होऊन काम करू शकत नाही त्याला कर्मयोगी म्हणता येणार नाही.

भगवद् गीता सुविचार विद्यार्थ्यांसाठी | Bhagavad Gita Quotes In Marathi For Students

bhagavad gita quotes in marathi
bhagavad gita quotes in marathi

भगवत गीता म्हणजे गुरू शिष्याचा सुंदर संवाद आहे. म्हणूनच विद्यार्थी दशेत असताना प्रत्येक शिष्याने या ग्रंथाची पारायणे केली तर त्याचे जीवन नक्कीच सुख, समाधान आणि यशाचे असेल. यासाठी वाचा भगवद् गीता सुविचार विद्यार्थ्यांसाठी (Bhagavad Gita Quotes In Marathi For Students )

1. फक्त मनच तुमचा मित्र अथवा शत्रू असू शकतो.

ADVERTISEMENT

2. कर्म न करताच फळाची अपेक्षा करणं हे मुर्खपणाचे लक्षण आहे.

3. जर तुम्हाला महान व्हायचं असेल तर तुमचे विचार आधी महान आणि सकारात्मक करा.

4. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, प्रत्येक क्षण बदलत आहे हे त्याचे उदाहरण आहे

5. जीवनात कोणतीच गोष्ट स्थिर नाही, सगळीकडे बदल सुरू आहे, प्रत्येक गोष्ट वाढत आहे. हीच गोष्ट तुम्हाला जमिनीला धरून ठेवते.

ADVERTISEMENT

6. वेळ हरवत अथवा जिंकवत नाही तर ती शिकवते.

7. जे कर्म नैसर्गिक नाही ते तुम्हाला नेहमीच थकवते.

8. प्रार्थना केल्यामुळे परिस्थिती बदलेल अथवा नाही, पण माणसाचे चरित्र मात्र नक्कीच बदलते.

9. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, जी तुम्हाला आतून पोखरत राहते.

ADVERTISEMENT

10. तुम्हाला जे मिळत आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही मात्र देणाऱ्याला नक्कीच माहीत आहे.

18 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT