भारताला राजेशाही परंपरा आहे, पूर्वीच्या काळी भारतात राज्य केलेल्या अनेक राजांची घराणी असूनही आहेत. राज्य नसलं तरी त्यांचे राहणीमाण तसंच राजेशाही आहे. अशा घराण्यांमधील मुलांची नावे त्यांच्या स्टेटसला शोभतील अशीच असतात. बऱ्याचदा राजघराण्यातील मुलांना त्यांच्या पूर्वजांची नावे दिली जातात. ज्यामुळे पुढील पिढीला पूर्वजांचे स्मरण आणि पराक्रम लक्षात राहतो. कोणत्याही घरात मूल जन्माला आलं की, तो मुलगा असो वा मुलगी प्रत्येक पालकासाठी त्याचा जन्मोत्सव हा एक सोहळाच असतो. शिवाय आपलं मूल प्रत्येक पालकाला एखाद्या राजकुमाराप्रमाणेच वाटत असतं. त्यामुळेच अनेक घरात मुलांना राजा, राज, प्रिन्स, युवराज, बाळराजे अशा नावांनी हाक मारली जाते. आजकाल बारशातही राजेशाही थाटमाट असतो. रॉयल थीम बारशात केली जाते. त्यामुळे मुलांना देण्यात येणारी नावे ही खास राजघराण्यातील मुलांची नावे (Rajgharanyatil Mulanchi Nave) असावीत असं प्रत्येकाला वाटतं. आपल्या मुलाला रॉयल जीवनशैली मिळावी, त्याला जीवनात सुख, समृद्धी, यश, किर्ती, ऐश्वर्य मिळावं असं वाटणं स्वाभाविक आहे. बाळ कोणाच्याही पोटी जन्माला आलं तरी ते पुढे भविष्यात स्व कतृत्वाने राजाप्रमाणे किर्ती मिळवू शकतं. पण त्यासाठी बाळाला लहानपणापासून तशी शिकवण मिळायला हवी. भारतीय संस्कृतीत गर्भसंस्कार, बालसंस्कारांना खूप महत्त्व आहे. ज्यामुळे बाळ पोटात असतानाच त्याला पराक्रमी राजांच्या, शूरवीर योद्ध्यांच्या कथा सांगितल्या जातात. जिजाऊंनी असे संस्कार गर्भात असताना केले म्हणून आपल्याला शिवाजे राजे मिळू शकले. हाच वारसा पुढे चालवायचा असेल तर प्रत्येक मातेने, पालकांनी मुलांवर असे चांगले संस्कार करायला हवेत. बाळावर जन्मानंतर केला जाणारा पहिला संस्कार म्हणजे नामकरण विधी… बाळाच्या नामकरण विधीसाठी सुंदर मेसेज लिहून नातेवाईक मित्रमंडळींना बोलावलं जातं. बारशात सर्वांसमोर बाळाला छान नाव देऊन त्याच्यावर पहिला संस्कार केला जातो. नावातूनच बाळावर रॉयल संस्कार करायचे असतील तर तुमच्या मुलांना द्या ही राजघराण्यातील मुलांची नावे (Rajgharanyatil Mulanchi Nave) तसंच वाचा मुलींसाठी रॉयल मराठी नावे, लहान मुलींची नावे (Royal Marathi Names For Girl In Marathi)
Table of Contents
- प्रसिद्ध राजघराण्यातील मुलांची नावे अर्थासह – Royal Baby Names for Boys In Marathi
- युनिक अशी राजघराण्यातील मुलांची नावे – Unique Rajgharanyatil Mulanchi Nave
- राजघराण्यातील मुलांची नावे 2022 – 2022 Royal House Baby Names In Marathi
- दोन अक्षरी राजघराण्यातील मुलांची नावे – Don Akshari Rajgharanyatil Mulanchi Nave
प्रसिद्ध राजघराण्यातील मुलांची नावे अर्थासह – Royal Baby Names for Boys In Marathi
भारतात अनेक शूरवीर, पराक्रमी राजे होऊन गेले. या राजघराण्यांतील मुलांची नावे (Rajgharanyatil Mulanchi Nave) जर तुम्ही मुलांना दिली तर तुमच्या मुलांवर जन्मांपासून त्यांच्या शौर्याचे, धेर्यांचे संस्कार होतील. तुमची मुलं देखील या नावांप्रमाणेच आयुष्यात राजाप्रमाणे जीवन जगतील. यासाठी निवडा यातील एक छान रॉयल नाव…
राजघराण्यातील मुलांची नावे | नावाचा अर्थ |
विजय | जय मिळवणारा |
अजय | जय मिळवणारा |
अभय | निडर |
अभय राज | निडर |
अभिराज | भीतीवर जय मिळवणारा |
आदित्यराज | सूर्य |
अजिंक्यराज | जय मिळवणारा |
अजीतराज | कायम जिंकणारा |
सूर्यभान | सूर्यासारखा |
चंद्रसेन | चंद्रावर राज्य करणारा |
जयदीप | प्रकाशमान |
त्रिविक्रम | तिन्ही लोकांत विक्रम करणारा |
अमर | मृत्यूचे भय नसलेला |
क्रांतिवीर | शूर |
बालभद्र | कृष्णाचा भाऊ |
बलराम | कृष्णाचा भाऊ |
धर्मवीर | धर्मावर विजय मिळवलेला |
दौलत | पैसा |
गजेंद्र | हत्तींचा राजा |
दीपराज | प्रकाशाचा राजा |
भैरव | भगवान शंकर |
चेतन | जीवन |
जीवन | आयुष्य |
हरिष | भगवान शंकर |
जसवंत | लोकप्रिय |
कौशल | प्रतिभावंत |
मुकुंद | भगवान विष्णू |
नितेश | न्याय देणारा राजा |
पुलकित | आनंदी |
आनंद | आनंदी |
हर्षराज | आनंदी राजा |
शार्दुल | चांगला |
सोहम | आत्मा |
सोहन | सुंदर |
तरूणराज | तरूण राजा |
विश्वराज | जगावर राज्य करणारा |
राजपाल | राज्याचे संरक्षण करणारा |
राजनील | मौल्यवान खडा |
रजतशुभ्र | चांदीप्रमाणे शुभ्र |
रजनीकांत | रात्रीवर राज्य करणारा |
युनिक अशी राजघराण्यातील मुलांची नावे – Unique Rajgharanyatil Mulanchi Nave
आपल्या बाळाला एखादं युनिक नाव द्यावं असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. कारण बाळाचे नाव हिच त्याची आयुष्यभराची ओळख असते. पुढे बाळाला त्याच नावाने जग ओळखणार असतं. त्यामुळे बाळाला नाव ठेवताना पालक खूप सावधपणे विचार करतात. बाळाला नाव देताना ते युनिक असण्यासोबत अर्थपूर्ण असावं असंही प्रत्येकाला वाटतं. जर बाळाला एखादं राजघराण्यातील मुलांचे नावे (Rajgharanyatil Mulanchi Nave) दिलं तर त्याला छान रॉयल अर्थ असेलच शिवाय त्यामुळे तुमच्या बाळाची चांगली ओळखही निर्माण होईल.
राजघराण्यातील मुलांची नावे | नावाचा अर्थ |
युवराज | राजकुमार |
राजकुमार | राजकुमार |
गौरव | अभिमान |
चंद्रप्रकाश | चंद्राचा प्रकाश |
देवेंद्र | देवांचा राजा |
धर्मराज | धर्माचा राजा |
धनराज | श्रीमंत राजा |
पृथ्वीराज | पृथ्वीवर राज्य करणारा |
शिवाजी | शिवाजी राजे |
शिवबा | शिवाजा राज |
शंभू | शंभूराजे |
संभाजी | संभाजी राजे |
राजाराम | राजाराम राजे |
विराज | राज्य करणारा |
विरेंद्र | शूरवीर |
विराजस | शूर राजा |
अर्जुन | एक पांडव |
दिग्विजय | पराक्रमी |
इशांत | पराक्रमी |
आयुष | दीर्घायुषी |
कपिल | एक ऋषी |
प्रताप | पराक्रम |
राजनाथ | राजांचा राजा |
समर | संगम |
तेजराज | राजा |
रजक | चांदीसारखे |
रजत | चांदीसारखे |
राजीव | कमळसारखे |
राजन | राजासारखे |
आन | गर्व |
अभिमन्यु | अर्जुनाचा मुलगा |
राजघराण्यातील मुलांची नावे 2022 – 2022 Royal House Baby Names In Marathi
प्रत्येक वर्षी काही नावे ट्रेंडमध्ये असतात. आजकाल मुलांना ट्रेंडमध्ये असलेली नावे ठेवण्याचा काळ आहे. सहाजिकच आईवडील सोशल मीडियावर अथवा इंटरनेटवर अशा नावांचा शोध घेतात जी नावे जास्त प्रमाणात चर्चेत असतात. आम्ही तुमच्यासोबत अशी काही नावे शेअर करत आहोत जी 2022 मध्ये ट्रेंडमध्ये होती. एवढंच नाही तर ही नावे राजघराण्यातील मुलांची नावे (Rajgharanyatil Mulanchi Nave)) ज्यामुळे तुमच्या मुलांवर यामुळे रॉयल संस्कारदेखील होतील.
राजघराण्यातील मुलांची नावे | राजघराण्यातील मुलांची नावे |
युद्धवीर | वर्धन |
वीर | वैभव |
अपराज | उमेश |
तन्वीर | तनूज |
श्रीजय | उदयराज |
शूभम | सौरभ |
समर्थ | सर्वेश |
ऋित्विक | रत्नेश |
राणा | रणवीर |
रणबीर | राधेश्याम |
पुरूषोत्तम | पुलकित |
प्रदीप | दीपक |
निकुंज | निर्भय |
नरेश | किशोर |
नागेंद्र | मेघराज |
लक्ष्मीपती | योगेंद्र |
जगिश | हेमराज |
दुर्गेश | देवेश |
चंद्रादित्य | भुपेन |
बळवंत | आहिल |
अभिराज | अनंत |
राजयोग | ज्ञानयोग |
अभिजीत | राजेश |
आकाश | अमन |
अमित | अमरदीप |
विराट | विक्रमादित्य |
अक्षयराज | आशिष |
दिव्येश | जीतराज |
कनक | करणदीप |
मनमीत | मयुरेश |
योगराज | जितेंद्र |
वीरभद्र | वीरदीप |
उपेंद्र | तीर्थराज |
दोन अक्षरी राजघराण्यातील मुलांची नावे – Don Akshari Rajgharanyatil Mulanchi Nave
मुलांना नाव देताना ते जास्तीत जास्त सोपे, युनिक, अर्थपूर्ण आणि रॉयल असावे अशी पालकांची इच्छा असते. कारण मुल मोठं होताना ते नाव त्याला सहज लिहीता यायला हवं. म्हणूनच दोन अक्षरी नावे जास्त प्रमाणात ट्रेंडमध्ये असतात. आम्ही तुमच्या मुलांसाठी अशीच काही दोन अक्षरी रॉयल नावे सूचवत आहोत. जी सहज सोपी आणि अर्थपूर्ण आहेत.
दोन अक्षरी मुलांची रॉयल नावे | नावाचा अर्थ |
देव | परमेश्वर |
दीप | दिवा |
राज | राजा |
यश | किर्ती |
जय | विजय |
कृष्ण | भगवान कृष्ण |
दत्त | दत्तगुरू |
वीर | पराक्रमी |
शंभू | भगवान शंकर |
शीव | भगवान शंकर |
प्रिन्स | राजकुमार |
ईश | परमेश्वर |
अंश | अर्क |
कान्हा | कृष्ण |
गर्व | अभिमान |
प्रेम | प्रेम |
जीत | जिंकणे |
तेजा | तेजस्वी |
द्रोण | द्रोण |
धर्मा | धर्मा |
ध्रुव | ध्रुव |
नंद | राजा |
युवा | तरूण |
राध्य | राध्य |
वंश | वंश |
लक्ष्य | वेध |
लव | रामाचा मुलगा |
कुश | रामाचा मुलगा |
धेर्य | धीर |
दक्ष | ब्रम्हाचा मुलगा |
रूप | सौंदर्य |
देवा | देव |
शौर्य | पराक्रमी |
आर्य | आर्य |
श्वेत | शुभ्र |
जान | प्रीय |
शीव | शंकर |
श्लोक | श्लोक |
प्रीत | प्रेम |
नम्र | नम्र स्वभाव असलेला |
Conclusion – तुमच्या लाडक्या तान्हुल्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काही युनिक अशी राजघराण्यातील मुलांची नावे (Rajgharanyatil Mulanchi Nave) शेअर केली आहेत. यातील तुम्हाला आवडलेली ट्रेंडी आणि रॉयल नावे तुम्ही तुमच्या राजकुमारासाठी नक्कीच निवडू शकता. तुम्हाला ही नावे कशी वाटली आणि यातील कोणते नाव तुम्ही तुमच्या बाळराज्यासाठी निवडले हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.