ADVERTISEMENT
home / Mythology
जाणून घ्या रामनवमीची संपूर्ण माहिती, कथा, पूजा आणि मुहूर्त | Ram Navmi Information In Marathi

जाणून घ्या रामनवमीची संपूर्ण माहिती, कथा, पूजा आणि मुहूर्त | Ram Navmi Information In Marathi

जय श्रीराम… जय श्रीराम

असा उद्घोष करत भगवान श्रीरामाच्या जन्मदिवसाच्या रूपात रामनवमी संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. आस्था आणि धार्मिक दृष्ट्या हिंदू धर्मामध्ये रामनवमीचं विशेष महत्त्व आहे. भगवान रामाचा जन्म चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या नवमीला पुनर्वसु नक्षत्र आणि कर्क लग्नातला आहे. श्रीरामाची जन्मभूमी म्हणजे अयोध्या, जिथे राजा दशरथाची मोठी राणी कौशल्याच्या पोटी रामाने जन्म घेतला. 2022 मध्ये रामनवमी 10 एप्रिलला आहे. या निमित्ताने आवर्जून आपण एकमेकांना रामनवमीच्या शुभेच्छा देतोच. जाणून घेऊया या निमित्ताने रामनवमीची संपूर्ण माहिती (ram navami information in marathi).

रामनवमीचं महत्त्व – Importance Of Ram Navmi In Marathi

Googlemedia

रामनवमीची माहिती मराठी

पुराण आख्यायिकेनुसार लंकापती रावणाच्या अत्याचाराला संपवण्यासाठी भगवान विष्णूने राम अवतार घेतला. भगवान राम हे विष्णूचा सातवा अवतार म्हटले जातात. जो त्रेतायुगामध्ये धर्माच्या स्थापनेसाठी पृथ्वीवर अवतरला होता. या दिवशी सर्वजण भगवान रामाच्या जन्मानिमित्त आनंद साजरा करतात. रामनवमीच्या सणाच्या दिवशी चैत्र नवरात्र संपन्न होते. शास्त्रानुसार, भगवान रामाने लंकेवर विजय मिळवण्यासाठी माता दुर्गेची उपासना केली होती. याच दिवशी अयोध्येमध्ये चैत्र राम जत्रेचंही भव्य आयोजन केलं जातं. सर्वजन एकमेंकांना या निमित्ताने रामनवमीच्या शुभेच्छा ही देतात.

ADVERTISEMENT

रामनवमीची आख्यायिका

हिंदू धर्म ग्रंथात प्रभू श्रीराम आणि त्यांच्या तीन भावंडांच्या जन्माबाबत एक पौराणिक कथा सांगण्यात आली आहे. या कथेनुसार राजा दशरथाला तीन राण्या होत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. जेव्हा तिन्ही राण्यांना पुत्र प्राप्ती झाली नाही तेव्हा राजा दशरथाने पुत्रेष्टी यज्ञ केला. प्रसादामध्ये यज्ञातून प्रकट झालेली खीर तिन्ही राण्यांना खाऊ घातली. काही काळाने राजा दशरथाच्या राजवाड्यात आनंदवार्ता मिळाली की, तिन्ही राण्या गर्भवती आहेत. त्यानंतर शुक्ल नवमीला कौशल्येने राम, कैकेयी ने भरत आणि सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला. अशाप्रकारे राजा दशरथाला आता त्याचे उत्तराधिकारी मिळाले. तेव्हापासून या तिथीला रामनवमीच्या रूपाने साजरं केलं जातं

राम नवमी तिथी आणि मुहूर्त – Ram Navmi Puja and Muhurt Marathi

Googlemedia

रामजन्म सोहळा

रामनवमीचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी विधीवत भगवान रामाची पूजा केली जाते. या दिवशी हजारो लोकं अयोध्येला जाऊन पुण्य सलिला शरयू नदीमध्ये स्नान करून पुण्यार्जन करतात. स्नान करून ते भक्तगण भगवान रामाला आठवून भजन-पूजन करतात. घरोघरी आणि मंदिरांमध्ये राम चरित्राचा पाठ केला जातो.

रामनवमी तिथी शुभ मुहूर्त 2022

  • राम नवमी तिथी – 10 एप्रिल 2022, रविवार
  • नवमी तिथी प्रारंभ – 10 एप्रिल रात्री 1.32 मिनिटांपासून सुरू
  • नवमी तिथी समाप्ती – 11 एप्रिल सकाळी 3.15 मिनिटं.

राम नवमी पूजेचा शुभ मुहूर्त

पंचांगानुसार पूजेचा मुहूर्त – 10 एप्रिल सकाळी 11:10 ते 1:32 मिनिटांपर्यंत आहे.

ADVERTISEMENT

रामभक्त हनुमान जयंतीसाठी शुभेच्छा

रामनवमीची पूजा कशी करावी?

रामनवमीच्या दिवशी पहाटे उठावे. आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. पूजेचं सर्व सामान घेऊन पूजेच्या ठिकाणी बसावे. भगवान श्रीरामाच्या मूर्तीला शुद्ध पवित्र ताज्या पाण्याने स्नान घालावे. नंतर धूपदीप, आरती, फुलं, चंदन इत्यादी अर्पित करून पूजा करावी. पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. जर तुम्ही नवरात्रीचे उपवास केले असतील तर तुमच्या पूजेच्या साहित्यात तुळशीचं पान आणि कमळ असलंच पाहिजे. त्यानंतर प्रभू श्रीरामाची नवमी पूजा षोडशोपचारे पूर्ण करावी. खीर आणि फळांचा प्रसाद म्हणून दाखवावा. या दिवशी अनेकांकडे राम जन्म सोहळा साजरा केला जातो. काहींकडे चैत्र नवरात्रीनिमित्त कन्यापूजनही असते. कोकणात या निमित्ताने भरपूर ठिकाणी रामाचा पालखी सोहळा आणि जत्रा असतात.

रामनवमीसाठी विशेष नैवेद्य

Freepik

रामनवमीसाठी नैवेद्य

रामनवमीच्या दिवशी अनेकजण चैत्र नवरात्रीचा उपवास सोडून रामजन्म साजरा करतात किंवा काहीजण फक्त रामनवमीला उपवास करतात. मग उपवास कांदा-लसूण विरहीत सात्विक जेवण जेवून सोडतात. बरेच जणांकडे रामनवमीच्या निमित्ताने पूरी-भाजी, शिरा आणि काळे चणे असतात. 

ADVERTISEMENT

श्रीरामाच्या पुजेत पांढऱ्या मिठाई आणि पांढऱ्या फळाचं महत्त्व आहे. या दिवशी प्रसादाच्या रूपात पंचामृत, श्रीखंड, खीर आणि हलवा यांचा प्रसाद दाखवला जातो. श्रीरामाच्या पूजेत दूध आणि तूपाच विशेष महत्त्व आहे. यामुळेच रामनवमीच्या दिवशी तूपापासून बनवलेल्या मिठाया खाल्ल्या जातात. खरंतर उपवास आणि प्रसाद हे दोन्ही उत्सवांचा आवश्यक भाग आहेत. रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाला खीर, केशर भात किंवा धण्याचा नैवेद्य दाखवावा. जर तुम्ही मिठाईचा नैवेद्य दाखवणार असाल तर बर्फी, गुलाबजामून किंवा कलाकंदचा नैवेद्य दाखवणे उत्तम असतं.

श्रीरामाच्या पूजेसाठी खास मंत्र

श्रीराम हे हिंदूंमधील सर्वात लोकप्रिय देवता आहे. रामाची पूजा ही प्रत्येक घरात होते आणि रामाला आदर्श मानवाचं उदाहरण मानलं जातं. अशी मान्यता आहे की, रामनवमीच्या दिवशी भगवान विष्णुंचा सातवा अवतार असलेल्या भगवान श्रीरामाच्या कथांचा पाठ करणं खूप पुण्यदायी असते. या दिवशी जागरण करून रामायणाचं पठण केल्याने आत्मिक शुद्धी होते आणि पापक्षालन होतं. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही रामनामाचा जपही करू शकता. कलियुगात लोकांकडे वेळ कमी असल्याचं लक्षात घेऊ महर्षी वाल्मिकी यांचं एक श्लोकी रामायणाचंही पठण केलं जातं. ज्यामध्ये संपूर्ण रामायणाचं सार आहे. 

अदौ राम तपोवनादि गमनं हत्वा मृगं कांचनम्। वैदेही हरणं जटायु  मरणं सुग्रीव संभाषणम्। वालि निग्रहणं समुद्र तरणं लंका पुरी दास्हम्। पाश्चाद् रावण कुंभकर्ण हननं तद्धि रामायणम्।

संत तुलसीदास यांनीही बालकांडच्या तिसऱ्या दोह्यांमध्ये एक श्लोकी रामायणाची रचना केली आहे. तुम्ही त्याचंही पठण करू शकता. 

ADVERTISEMENT

‘नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागम् पाणौ महासायकचारुचापं युद्ध नमामि रामं रघुवंशनाथम्’

पवित्र मनाने हातपाय धुवून भगवान रामाची मूर्ती किंवा फोटोच्या समोर ध्यान लावून दिवसभरात कोणत्याही वेळी 9 वेळा एक श्लोकी रामायणाचं पठण केल्याने संपूर्ण रामायणाच्या पठणाचं फळ मिळतं. भक्तगण रामाच्या मंत्राचाही रामनवमीच्या निमित्ताने जप करतात. ज्यामुळे त्यांच्यावर प्रभू श्रीरामांची कृपा होते. या मंत्रांमध्ये खालील मंत्रांचा समावेश होतो. 

ॐ श्री रामाय नमः॥

श्रीराम जय राम जय जय राम ।।

ADVERTISEMENT

ॐ दाशरथये विद्महे सीतावल्लभाय धीमहि, तन्नो राम प्रचोदयात्॥

ॐ आपदामपहर्तारम् दाताराम् सर्वसम्पदाम्।

लोकाभिरामम् श्रीरामम् भूयो-भूयो नमाम्यहम्॥

श्री राम जय राम कोदण्ड राम॥

ADVERTISEMENT

अशा प्रकारे यंदा रामनवमीचा सोहळा नक्की साजरा करा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम. 

06 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT