ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘सीता -हरण’ पाहून खुद्द रावण झाला भावुक,व्हिडिओ झाला व्हायरल

‘सीता -हरण’ पाहून खुद्द रावण झाला भावुक,व्हिडिओ झाला व्हायरल

लोकांचे घरबसल्या मनोरंजन करण्यासाठी टीव्हीवर काही जुन्या मालिका पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एक आहे ‘रामायण’ ही मालिका. या मालिकेशी अनेकांच्या आठवणी जोडल्या आहेत. कित्येक रविवार अनेकांनी ही मालिका पाहण्यासाठी घालवली आहे. आज इतक्या वर्षांनी ही मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहे. या मालिकेतील कलाकारांना त्यावेळी कमालीची प्रसिद्धी मिळाली होती. यातील काही कलाकार आजही हयात आहेत. त्यांनीही त्यांच्या आठवणी मालिका सुरु झाल्यानंतर शेअर केल्या आहेत. पण ज्या रावणाने सीतेचे हरण केले अशा रावणालाही आपले आसू आवरता आले नाही. या मालिकेत रावणाची भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी हा सीन पुन्हा एकदा टीव्हीवर पाहून भावुक झाले.

महानायकाच्या आणखी एका चित्रपटाचा रिमेक, आता रणवीर सिंह साकारणार ‘शहेनशाह’

सीता हरण सीनवर जोडले हात

‘रामायण’ या मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी हे आता 80 हून अधिक वर्षांचे आहेत. त्यांनी रावणाची भूमिका इतक्या समर्थपणे सांभाळली की, त्यांचे राक्षसी हसणे, कुत्सित बोलणे, मग्रुरपणे अहंकार दाखवणे त्यांनी त्यांच्या अभिनयातून या गोष्टी अगदी योग्य उतरवल्या होत्या. आता पुन्हा एकदा सीता- हरणाचा सीन पाहिल्यानंतर त्यांना त्यांचे आसू आवरता आले नाही. त्यांनी अगदी हात जोडून हा सीन पाहिला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल माीडियावर व्हायरल झाला आहे. 

या एका सवयीमुळे रामाच्या भूमिकेसाठी अरुण गोविल झाले रिजेक्ट

ADVERTISEMENT

रावणाला अगदी हुबेहूब उतरवले

रावण रुपात अरविंद त्रिवेदी

Instagram

एखाद्या पात्राविषयी ज्यावेळी प्रेक्षकांच्या मनात राग, द्वेष किंवा प्रेम निर्माण होते. हेच त्या अभिनेत्याचे यश असते. रामायण मालिकेतील सगळ्या कलाकारांना त्यांच्या अभिनयामुळे एक वेगळी उंची प्राप्त झाली. रावण हे यामधील निगेटीव्ह कॅरेक्टर अरविंद त्रिवेदी यांनी इतकं चांगलं केलं की, त्यांचा राग त्यावेळी सगळ्यांना येणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळेच इतक्या वर्षांनी स्वत:ला असे पडद्यावर पाहणे अरविंद यांना नक्कीच भावूक करुन गेले असणार.

काहीच दिवसांपूर्वी राम-सीता-लक्ष्मणचे झाले होते दर्शन

रामायणातील प्रमुख पात्र

ADVERTISEMENT

Instagram

मुंबईमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती कधी ओढवेल असे वाटले नव्हते. पण कोरोनामुळे सगळीच गणित बदलून गेली आहेत. रामायणासोबत टीव्हीवर महाभारत आणि अन्य जुन्या मालिका सुरु झाल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी कपिल शर्माने त्याच्या शो मध्ये रामायणाच्या कलाकारांना बोलावले होते. त्यावेळी अरुण गोविल (राम), दीपिका चिखलिया ( सीता) आणि सुनील लहरी ( लक्ष्मण)  हे तिघे आले होते. त्यांना इतक्या वर्षांनी पाहून अनेकांना नक्कीच त्यांच्या त्या रुपाची आठवण झाली असेल. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी मालिकेशी संदर्भात अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या आणि पुन्हा एकदा रामायणाची आठवण ताजी केली. त्यानंतर थेट ही मालिका प्रसारित करण्यात आली. 

महाभारत मालिकेबाबतच्या या गोष्टी वाचून व्हाल अवाक

आणखी मालिका येणार भेटीला

सध्या जुन्या मालिका पुन्हा दाखवल्या जात आहेत. डीडी आणि दूरदर्शनने या मालिका सुरु केल्यानंतर आता अनेक खासगी चॅनेल्ससुद्धा आपल्या जुन्या मालिका प्रसारीत करणार आहेत. यामध्ये हम पाँच, बालिका बधू, खिचडी, साराभाई vs साराभाई अशा मालिकांचा समावेश आहे. 

ADVERTISEMENT

आता जर तुम्ही रामायण अजूनही पाहिले नसेल तर लगचेच डीडी लावा आणि या जुन्या मालिकांचा आनंद घ्या. 

13 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT