ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अण्णा आणि माईंचे टिकटॉक व्हिडिओज व्हायरल

अण्णा आणि माईंचे टिकटॉक व्हिडिओज व्हायरल

टेलिव्हिजन माध्यमांचा प्रेक्षकांवर नेहमीच प्रभाव पडत असतो. सध्या ‘रात्रीस खेळ चाले 2’ ही मराठी टेलिव्हिजन मालिकेने अनेकांना भुरळ पाडली आहे.  कारण या मालिकेच्या दुसऱ्या भागालाही कमी काळात भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या दुसऱ्या भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेच्या यशाचं श्रेय नक्कीच या मालिकेतील सर्व कलाकारांनाही जातं. कारण ‘रात्रीस खेळ चाले 2 मधील सर्वच कलाकार प्रसिद्ध आहेत. या मालिकेतील अण्णा, माई आणि शेवंता यांना पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. या मालिकेत माधव अभ्यंकर अण्णा नाईक, शंकुलता नरे माई तर अपूर्वा नेमळेकर शेवंताची भूमिका साकारत आहे. खरंतर आता  ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. या मालिकेत जरी अण्णा आणि माई यांचं पटत नसलं तरी ऑफस्क्रीन दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि सेटवर सगळ्यांसोबत ते तितकीच धम्माल करताना दिसतात. गेले काही दिवस अण्णा आणि माई यांचे सेटवरील काही टिकटॉक व्हिडिओज तुफान व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. 

सोशल मीडियावर अण्णा आणि माईचा जलवा

अण्णा आणि माई यांचे टिकटॉक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोघांची धम्माल केमिस्ट्री पाहून नेटकरी देखील त्यांच्यावर अक्षरशः फिदा झाले आहेत. त्यांच्या या व्हिडिओजनां चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहेत. जुन्या गाण्यांवरील अण्णा आणि माईंचे  दिलखेचक हावभाव या व्हिडिओज व्हायरल होण्यामागचं महत्वाचं कारण आहे . कारण अण्णा आणि शेवंताची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी कमाल आहे तितकीच अण्णा आणि माईंच्या टिकटॉक व्हिडिओजवरील केमिस्ट्री धमाल आहे. निसर्गराजा ऐक सांगते आणि तुझ्या माझ्या संसाराल आणि काय हवं अशा जुन्या गाण्यांवर अण्णा माईंनी व्हिडिओज केले आहेत. 

मालिकेला नवं वळण

रात्रीस खेळ चाले भाग दोन ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. कारण या मालिकेतील मुख्य पात्र शेवंता तिचं सामान घेऊन थेट अण्णा नाईकांच्या वाड्यावर तळ ठोकायला आली आहे. माईंसमोर अण्णा आणि शेवंताचं प्रकरण उघड झाल्यावर माई मात्र तिला वाड्यात घ्यायला नकार देतात. शेवंता ही हार मानणाऱ्या लोकांमधली मुळीच नाही. ज्यामुळे ती घराशेजारील पारावर बसून रात्र काढते. मात्र पहिल्यांदाच अण्णांना धडा शिकवण्यासाठी माईने नवा अवतार धारण केला आहे. ज्यामुळे ती तिच्या नवऱ्याला मुठीत ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा –

नेहा कक्करविषयी आदित्यच्या मनात आहेत या भावना, आदित्य म्हणाला…

ADVERTISEMENT

‘दबंग’ सलमानचा हळवेपणा पुन्हा दिसला, पूरग्रस्त गाव घेतले दत्तक

मराठीतील लय भारी…. होळीचे गाणे – Marathi Holi Songs List

02 Mar 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT