प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात रवा हा पदार्थ सापडतोच. रव्यापासून आपण अनेक नाश्त्याचे पदार्थ हमखास बनवतो. त्याचे कारण म्हणजे रवा खाल्ल्याने पोट दब्ब भरते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे नाश्त्यामध्ये सहसा रव्याचे पदार्थ करण्यावर भर आपण देतो. विशेषतः महाराष्ट्रीयन आणि दक्षिणेकडील लोकांचा आवडता नाश्ता हा रव्यापासूनच बनतो. त्यासाठी तुम्हाला रव्याच्या वेगळ्या रेसिपीज (rava recipes in marathi) हव्या असतील तर तुमच्यासाठीच हा लेख आहे. घरामध्ये बनणारे रव्याचे लाडूची रेसिपी, रव्याचे डोसे रेसिपी, आप्पे हे सगळे पदार्थ कसे पटकन बनवयाचे आणि स्वादिष्ट करायेच याच्या रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रव्याचे पदार्थ हे करायला सोपेही असतात आणि पटकन तयार होतात. त्यामुळे इथे तुम्हाला आम्ही काही पटकन तयार होणारे रव्याचे पदार्थ आणि त्याची रेसिपी देणार आहोत. तर वाट कसली बघताय. वाचा आणि पटकन रव्याचा अप्रतिम नाश्ता तयार करून खायला घ्या.
अननसाचा शिरा रेसिपी (Pineapple Shira Rava Recipes In Marathi)
अननसाचा शिरा रेसिपी – Pineapple Shira Rava Recipes In Marathi
घरात रव्याचा शिरा आपण नेहमीच बनवतो. अर्थात घरात खूप वेळा पूजा असते तेव्हा प्रसादाचा शिराही बनत असतो. पण तुम्हाला अननसाचा शिरा हादेखील एक प्रकार करून नाश्त्याला खाता येतो. याची अप्रतिम चव तुमच्या जिभेवर दिवसभर तरळत राहते. यासाठी काय साहित्य घ्यायचे आणि कसा बनवायचा पाहूया
साहित्य
- 1 कप रवा
- 2-3 चमचे तूप
- अर्धा कप अननसाचे तुकडे
- 1 कप पाणी
- 1 कप दूध
- ¾ कप साखर
- चिमूटभर केशर अथवा केशरी रंग
- वेलची पावडर
- काजू, बदाम
- चिमूटभर केशर
कृती
- रवा तूपावर भाजून घ्या
- भाजल्यावर एका ताटात काढून घ्या
- नंतर त्याच भांड्यात तुपावर अननस भाजून घ्या
- दूध आणि पाणी मिक्स करून दुसऱ्या भांड्यात तापवून घ्या
- भाजलेला रवा दूध आणि पाण्यात मिक्स करून मंद आचेवर ढवळा आणि 2 मिनिट्स झाकून वाफ द्या
- नंतर त्यात साखर, अननसाचे तुकडे, केशर वा रंग आणि वेलची पावडर, काजू, बदामाचे तुकडे घालून मिक्स करा आणि साखर वितळण्यासाठी केवळ दोन मिनिट्स पुन्हा मंद आचेवर ठेवा आणि ढवळा. गरमागरम शिरा तयार आहे. वरून काजू बदामाचे तुकडे पसरून खायला द्या.
वाचा – Misal Pav Recipe Marathi
ओनियन रवा उत्तपा रेसिपी (Onion Rava Uttapam Recipe In Marathi)
ओनियन रवा उत्तपा रेसिपी – Onion Rava Uttapam Recipe In Marathi
सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही ओनियन रवा उत्तपा बनवू शकता. बनविण्यासाठी अतिशय सोपा आणि पोटभरीचा नाश्ता म्हणून याचा उपयोग होतो
साहित्य
- 1 कप रवा
- 2 चमचे तांदूळ पिठ
- 1 बारीक चिरलेला कांदा
- 2-3 हिरव्या मिरची
- 1 कप दही
- मीठ
- आलं – लसूण पेस्ट अथवा तुम्हाला आवडत असल्यास तुकडे
- पाणी
- बटर अथवा तेल
कृती
- वरील सर्व साहित्य एकत्र करून बऱ्यापैकी मध्यम स्वरूपात भिजवून घ्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दही आणि रवा हे मिश्रण अर्धा तास आधी भिजवून ठेवा. जेणेकरून रवा व्यवस्थित भिजतो आणि उत्तपा अधिक चांगला बनतो
- मध्यम स्वरूपातील हे मिश्रण तव्यावर गोलसर तेलावर घालून परतून घ्या
- मिरचीची चटणी, सॉस अथवा सांभारबरोबर तुम्ही हा ओनियन रवा उत्तप्पा खाऊ शकता
वाचा – मैद्यापासून तयार करा या स्वादिष्ट रेसिपीज (Maida Recipes In Marathi)
ओट्स रव्याची इडली रेसिपी (Oats Rava Idli Recipe In Marathi)
ओट्स रव्याची इडली रेसिपी – Oats Rava Idli Recipe In Marathi
ओट्स हे सध्या नाश्त्यासाठी जास्त वापरले जाते. हेल्दी आणि सध्याच्या लाईफस्टाईल वजन वाढू न देण्यासाठी याचा जास्त वापर करण्यात येतो. ओट्स रवा इडली (idli recipe in marathi) बनवणंदेखील अतिशय सोपं आहे. सकाळच्या घाईत ही रेसिपी बनवू शकता.
साहित्य
- अर्धा कप रवा
- अर्धा कप ओट्स पीठ अथवा ओट्स घेऊन मिक्सरमधून काढून त्याची पावडर करा
- अर्धा कप दही
- 2 चमचे तूप
- किसलेले आले
- जिरे
- हिंग
- मोहरी
- काजूचे तुकडे
- 2 बारीक चिरलेल्या मिरची
- कोथिंबीर
- तेल
- मीठ
- पाणी
कृती
- ओट्स पीठ, रवा, दही, मीठ घेऊन पाण्यात भिजूवन साधारण अर्धा तास तसंच ठेवा
- एका भांड्यात तूप तापवा त्यावर मोहरी टाका
- मोहरी तडतडली की जिरे आणि हिंग घालून हे मिश्रण भिजलेल्या मिश्रणावर टाकून नीट मिक्स करून घ्या
- इडलीच्या भांड्याला तेल लाऊन वरील मिश्रण घालून साधारण इडलीप्रमाणेच वाफवा आणि मग 10 मिनिट्सने इडल्या शिजल्या की चटणी अथवा सांभारबरोबर सर्व्ह करा
वाचा – झटपट अनारसे रेसिपी
रवा खमण ढोकळा रेसिपी (Rava Khaman Dhokla Recipe In Marathi)
रवा खमण ढोकळा रेसिपी – Rava Khaman Dhokla Recipe In Marathi
खमण ढोकळा हा तर सर्वांच्या आवडता नाश्ता आहे. पण बऱ्याचदा लोकांना वाटतं की खमण ढोकळा बनविण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यासाठी आम्ही तुम्हाला इथे ढोकळ्याची रेसिपी (dhokla recipe in marathi) देत आहोत.
साहित्य
- 1 कप रवा
- 1 कप आंबट दही
- पाऊण कप पाणी
- 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट
- तेल
- मीठ
- मोहरी
- जिरे
- पांढरे तीळ
- 2 बारीक कापलेल्या मिरच्या
- 4-5 पाने कडीपत्ता
- कोथिंबीर
कृती
- एका मोठ्या भांड्यात रवा, दही, मीठ पाणी घालून मिक्स करून ठेवा. यात अजिबात गुठळ्या राहू देऊ नका. अर्धा तास तसंच ठेवा
- नंतर एका चमच्यात तेल आणि थोडं इनो घालून यामध्ये मिक्स करून घ्या
- एका भांड्यात तेल लावा आणि हे मिश्रण पसरवा
- दुसऱ्या भांड्यात पाणी घालून भांड मध्यम आचेवर गरम करा त्यात वरील भांडं ठेवा
- साधारण 15 मिनिट्स वाफ येऊ द्या. नंतर थंड झाल्यावर त्याचे तुकडे करा
- एका भांड्यात तेल गरम करा, त्यात मोहरी, जिरे, तिळ, मिरच्या आणि कडीपत्ता घालून फोडणी तयार करा. ही फोडणी वरून ढोकळ्यावर घाला
- वरून कोथिंबीर पेरून खायला द्या
रव्याचे थालिपीठ (Rava Thalipeeth Recipe In Marathi)
रवा खमण ढोकळा रेसिपी – Rava Khaman Dhokla Recipe In Marathi
महाराष्ट्रीय पदार्थांमध्ये थालिपीठ हे अगदी खूपच प्रेमाने खाल्लं जातं. खरं तर भाजाणीचं थालिपीठ खूप प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला नाश्त्यासाठी रवा थालिपीठही करता येतं. यातून तुम्हाला पौष्टिक सत्व मिळतात.
साहित्य
- 1 कप भाजलेला रवा
- ज्वारीचे पीठ
- कापलेला कांदा
- अर्धा वाटी ओलं खोबरं
- 2 बारीक कापलेल्या मिरच्या
- हळद
- कोथिंबीर
- धने – जिरे पावडर
- मीठ
- तेल वा बटर
कृती
- वरील सर्व मिश्रण पाण्याने मिक्स करून घ्या. मात्र भिजवताना हे पातळ होणार नाही याची काळजी घ्या काही वेळ तसंच ठेवा
- नंतर एका पिशवीवर अथवा पानावर घेऊन ते थालिपीठ थापा
- तव्यावर तेल अथवा बटर सोडून शिजवून घ्या
- खोबऱ्याची चटणी अथवा सॉस, चटणीसह खायला द्या
चविष्ट उपमा बनविण्यासाठी रवा आणि पाण्याचे प्रमाण असावे योग्य
रव्याच्या लाडूची रेसिपी (Rava Ladoo Recipe In Marathi)
रव्याच्या लाडूची रेसिपी – Rava Ladoo Recipe In Marathi
रव्याचे लाडू बऱ्याच जणांना आवडतात पण त्याची रेसिपी जमायला हवी अन्यथा लाडू कडक झाले तर त्याची चव लागत नाही. त्यासाठी पाक योग्य करणे आवश्यक आहे आणि साखरेचा गोडवादेखील योग्य असायला हवा.
साहित्य
- 1 किलो रवा
- पाऊण किलो साखर
- साखर भिजेपर्यंत पाणी
- वेलची पावडर
- 200 ग्रॅम तूप
- काजू, बेदाणे, बदाम कापून
कृती
- पाण्यात साखर भिजवून एकतारी पाक करावा
- तूपात रवा भाजून घ्या
- हे मिश्रण एकत्र करा
- तासाभराने हे सुकल्यावर लाडू वळा
रवा केकची रेसिपी (Rava Cake Recipe In Marathi)
रवा केकची रेसिपी – Rava Cake Recipe In Marathi
सध्या रवा केक खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे. रवा केक नक्की कसा बनवायचा हे ठिकठिकाणी सांगितलं आहे. पण सोप्या पद्धतीने तुम्ही रवा केक बनवू शकता.
साहित्य
- अर्धा कप रवा
- अर्धा कप वनस्पती तेल
- पाऊण चमचा बेकिंग सोडा
- पाऊण चमचा बेकिंग पावडर
- पाऊण कप साखर
- वेलची पावडर
- पाऊण कप दूध
- अर्धा कप दही
- 2 कप पाणी
- स्वादानुसार मीठ
- हवं असल्यास, टूटीफ्रूटी
कृती
- एका भांड्यात रवा, वनस्पती तेल, साखर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, टूटीफ्रूटी, वेलची पावडर, दूध, दही सगळं एकत्र करून पाण्यात भिजवून अर्धा तास बाजूला ठेवा
- एका भांड्याला तेल लावा आणि सर्व मिश्रण त्यात ओतून कुकरमध्ये हे भांडं ठेवा
- कुकरमध्ये करणार असाल तर खाली पाणी नीट बघा आणि कुकरची शिटी लाऊ नका
- साधारण 20 मिनिट्स हे शिजू द्या. टूथपिक घालून केक नीट शिजला आहे की नाही ते पाहा. नंतरच बाहेर काढा आणि मग थंड झाल्यावर तुकडे करून खा
घरच्या घरी बनवा 15 मिनिट्समध्ये झटपट रव्याचे गुलाबजाम
रवा अप्पम/आप्पे रेसिपी (Rava Appam / Appe Recipe In Marathi)
रवा अप्पम/आप्पे रेसिपी – Rava Appam / Appe Recipe In Marathi
रव्याचे आप्पे हे चवीला अप्रतिम लागतात. गरमागरम आप्पे आणि खोबऱ्याची चटणी हे समीकरण अप्रतिमच आहे. त्यासाठी नक्की काय करावे लागते पाहूया.
साहित्य
- 1 कप रवा
- पाव कप दही
- आलं-लसूण-मिरची पेस्ट
- मीठ
- पाणी
- तेल
- जिरे
- मोहरी
- कडीपत्ता
- हिंग
कृती
- रवा, दही मिक्स करून थोडं पाणी घालून 6-7 तास भिजवून ठेवा
- सकाळी त्यात आलं-लसूण-मिरची पेस्ट, मीठ घाला
- एका भांड्यात तेल त्यात जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता घालून फोडणी तयार करा
- वरून ही फोडणी घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्या
- आप्पेपात्राला तेल लावा आणि मग मिश्रण त्यात घालून साधारण 5 मिनिट्स वाफ काढा
- गरमागरम आप्पे खोबऱ्याच्या ओल्या चटणीसह खायला द्या
रवा टोस्टची रेसिपी (Rava Toast Recipe In Marathi)
रवा टोस्टची रेसिपी – Rava Toast Recipe In Marathi
सकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरू शकतो. रवा टोस्ट बनवणं अतिशय सोपं आहे. तसंच तुम्हाला अगदी पटापट हा नाश्ता तयार करता येतो
साहित्य
- अर्धा कप रवा
- बारीक चिरलेला कांदा
- बारीक चिरलेली भोपळी मिरची
- बारीक चिरलेला टॉमेटो
- बारीक चिरलेल्या 2-3 मिरची
- कोथिंबीर
- अर्धा कप दही
- 1 चमचा तिखट
- मीठ
- तेल
- ब्रेड
- सॉस
कृती
- एका भांड्यात ब्रेड सोडून वरील सर्व मिश्रण एकत्र करून घ्या
- ब्रेडला बटर लाऊन हे मिश्रण त्यावर घाला
- तव्याला बटर अथवा तेल लाऊन त्यावर हे भाजून घ्या
- कुरकुरीत करून सॉसबरोबर खायला द्या
रव्याच्या डोशाची रेसिपी (Rava Dosa Recipe In Marathi)
रव्याच्या डोशाची रेसिपी – Rava Dosa Recipe In Marathi
तुम्हाला हा रवा डोसा खायलाही मस्त लागतो आणि करायलाही जास्त त्रास होत नाही. त्याशिवाय तुम्ही जर हॉटेलमध्ये जाऊन या रवा डोशासाठी 100 रुपये मोजत असाल तर त्याचीही आता गरज नाही.
साहित्य
- 1 कप बारीक रवा
- 2 ½ कप पाणी
- 2 चमचे तांदळाचे पीठ
- चवीनुसार मीठ
- कोथिंबीर
- दही अथवा लिंबाचा रस
- हिरव्या मिरचीचे तुकडे
- हवे असल्यास, जिरे
- बटर
- तेल
कृती
- एका बाऊलमध्ये बारीक रवा घ्या. त्यात तांदळाचे पीठ मिक्स करा. त्यात पाणी घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर चिरून घाला. दही अथवा लिंबाचा रस जे काही तुम्ही घेतले असेल ते मिक्स करा. मात्र दही अथवा लिंबाचा रस दोन लहान चमच्यांपेक्षा अधिक घालू नका. मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे, जिरे हे सर्व त्यात मिक्स करून व्यवस्थित ढवळा. रवा पटकन तळाशी बसतो. त्यामुळे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- पॅन गरम करा. डोसा करताना नेहमी काठ नसलेला पॅन वापरावा. जेणेकरून डोसा काढणे सहज शक्य होते. मंद आचेवर गॅस ठेवा. अन्यथा डोसा जळण्याची शक्यता असते. बॅटर पॅनवर टाकण्यापूर्वी ढवळून मगच टाकावे. हे बॅटर बऱ्यापैकी पातळसर असायला हवे. तरच त्याला व्यवस्थित जाळी येईल आणि पॅनवरूनही पटकन उकटेल.
- पॅनवर आधी तेल लावा आणि मग हे बॅटर टाका. ते टाकल्यानंतर व्यवस्थित शिजू द्या. डोशाची वरची बाजू परवायची नाही हे नेहमी लक्षात ठेवा. खाली डोसा ब्राऊन व्हायला लागल्यानंतर तो व्यवस्थित उकटत आहे की नाही हे एकदा पाहा. बाजूने तेल आणि बटर सोडा. त्यामुळे त्याला मस्त कुरकुरीतपणा येईल. हा व्यवस्थित शिजला की, चटणी अथवा सॉसबरोबर कुरकुरीत डोसा खायला द्या.
वजन कमी करण्यासह जाणून घ्या रव्याचे फायदे – Benefits Of Semolina In Marathi
रवा बोंडा रेसिपी (Rava Bonda Recipe In Marathi)
रवा बोंडा रेसिपी – Rava Bonda Recipe In Marathi
रवा बोंडा हा खरं तर भजीसारखा पदार्थ असतो. पण खायला खूपच मस्त लागतो. तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा पदार्थ बनवा आणि मस्तपैकी सॉसबरोबर खा
साहित्य
- 1 कप रवा
- 1 कप आंबट दही
- 3 हिरव्या मिरच्या
- 1 चमचा काळी मिरी पावडर
- चिरलेले आले
- हिंग
- पाणी
- मीठ
- कडिपत्ता
- कोथिंबीर
- तेल
कृती
- रवा, दही, मीठ आणि चिमूटभर हिंग मिक्स करून पाण्यात भिजवा, भिजल्यानंतर त्यात मिरी पावडर, आले, मिरच्या घाला आणि मिक्स करा आणि अर्धा तास तसेच ठेवा
- अर्ध्या तासाने तेल तापवा आणि भजीप्रमाणे हे मिश्रण तुम्ही तेलात घालून तळा आणि कोणत्याही चटणीसह अथवा सॉससह खायला द्या
रागी रवा उपमा रेसिपी (Ragi Rava Upma Recipe In Marathi)
रागी रवा उपमा रेसिपी – Ragi Rava Upma Recipe In Marathi
रागी अर्थात नाचणी हे तुमच्या निरोगी आणि हेल्दी आयुष्यासाठी उपयोगी ठरणारे खाद्य आहे. तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर नाचणीचा आपल्या खाण्यात समावेश करून घ्या. हा उपमा चवीलाही छान लागतो.
साहित्य
- 1 कप नाचणी पिठ
- अर्धा कप रवा
- तेल
- मोहरी
- हिंग
- कडीपत्ता
- 3 हिरव्या मिरच्या
- चिरलेला कांदा, गाजर
- कोथिंबीर
- मीठ
- पाणी
कृती
- नाचणी पीठ आणि रवा थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्या
- एका दुसऱ्या भांड्यात तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता टाकून फोडणी द्या
- त्यात मिरची घातल्यानंतर व्यवस्थित परतल्यावर भाजलेले नाचणी पिठ आणि रवा घाला
- वरून कांदा, गाजर घालून नीट मिक्स करा
- पाणी तापवून घ्या आणि ते वरून घाला, मीठ घाला
- उपम्याप्रमाणेच शिजू द्या आणि मग वाफ काढून खायला द्या
वाचा – अप्रतिम चवीच्या स्मूदी बनवा घरच्या घरी, स्मूदी रेसिपीज जाणून घ्या