ADVERTISEMENT
home / मनोरंजन
reena aggarwal

रीना जिंकत आहे ‘मन उडू उडू झालं’ मधून प्रेक्षकांचे मन

ग्लॅमरस अंदाज हा नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालतो. एखादी व्यक्ती नेहमी ग्लॅमरस आणि स्टायलिश लुकमध्ये दिसली की तिची छबी तयार होते पण तीच व्यक्ती जर अगदी साध्या आणि सोबर लूकमध्ये दिसली की आपल्याला आश्चर्य वाटतं. पण तितकाच निरागसपणा किंवा तोच साधेपणा जपण्याचे हे काम ती व्यक्ती करते आणि त्यामुळे प्रेक्षकांवर त्याची जास्त भुरळ पडते असंच काहीसं आहे अभिनेत्री रीना मधुकर उर्फ रीना अगरवाल (Reena Aggarwal) हिच्या बाबतीत.

अधिक वाचा – हमारी अधुरी कहानी’ #sidnaaz च्या चाहत्यांना दुःख अनावर

ग्लॅमरस रीनाचा सोबर अंदाज 

अभिनेत्री रीना मधुकरने (Reena Madhukar) आतापर्यंत तिचा सोशल मीडीया अकाऊंटवरून नेहमीच आपले फोटो शेअर केले आहेत. तिचे फोटो नेहमीच अतिशय ग्लॅमरस असतात आणि तिचा हा लुक तिच्या चाहत्यांनाही आवडतो. पण अभिनय आणि कामाच्या बाबतीत तिने नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आतापर्यंत रीनाने ‘अजिंठा’ या मराठी सिनेमात आदिवासी पात्राची भूमिका साकारली, तर ‘एजंट राघव- क्राईम ब्रांच’  हिंदी टेलिव्हिजन शोमध्ये फॉरेन्सिक डॉक्टरच्या भूमिकेत दिसली. इतकेच नव्हे तर ‘तलाश’ हिंदी सिनेमात पोलिसाचं पात्रं साकारलं आणि ’31 दिवस’ या मराठी सिनेमात अंध मुलीच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली. थोडक्यात काय तर, रीना मधुकरने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत नाविन्य होतं. कोणतीही भूमिका तिने तितक्यात आत्मीयतेने केली आहे. तर आता रीना मंदार देवस्थळी दिग्दर्शित ‘मन उडू उडू झालं’ मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. या मालिकेत ती ‘सानिका देशपांडे’ची भूमिका साकारत आहे जी नायिका साकारत असलेल्या हृता दुर्गुळेची (Hruta Durgule) ऑनस्क्रीन बहीण आहे. 

अधिक वाचा – शनाया कपूरला पाहून म्हणाले ही तर दुसरी अनन्या पांडे

ADVERTISEMENT

पहिलीच मराठी मालिका 

‘मन उडू उडू झालं’ ही रीनाची पहिली मराठी मालिका आहे. याविषयी व्यक्त होताना रीना म्हणाली की, “‘मन  उडू उडू झालं’ ही माझी पहिली मराठी मालिका त्यामुळे मला असं वाटतंय की मी माझ्या मायेच्या, हक्काच्या घरी आले आहे आणि फक्त माझ्याच नव्हे तर मी जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांच्या घरी आले आहे. ज्यांना मी आठवड्यातले सलग ६ दिवस भेटणार आहे आणि त्यांच्याच घरातला एक भाग होणार आहे. तसेच या मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची छान संधी या निमित्ताने मला मिळाली. हृता दुर्गुळेचं काम मी पाहिलं होतं आणि मला तिचं काम आवडलंदेखील आहे.  हृतासोबत आणि इतर कलाकारांसोबत काम करताना खूप मजा येते असंही रीनाने यावेळी सांगितलं. झी मराठी वाहिनीवर काम करणे हीदेखील माझ्यासाठी खास संधी आहे कारण या वाहिनीशी प्रत्येक मराठी कुटुंब जोडलं गेलं आहे. तसेच सेटवरील वातावरण अगदी हलकं-फुलकं, प्रसन्न आहे असं वाटतंय जणू वर्क फ्रॉम होमच चालू आहे. इतक्या छान पद्धतीने सेटवर सर्वांचा वावर असतो.” यापूर्वी रीनाने मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी मनोरंजनसृष्टीमध्येदेखील रीनाने तिची स्वत:ची ओळख तयार केली आहे,  त्यामुळे तिच्या या पहिल्या मराठी मालिकेला मराठी कलाकारांसह हिंदी कलाकारांनीही तिला सोशल मीडियावर भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. ग्लॅमरस रीनाचा ऑनस्क्रिन नवा लुक आणि नवी भूमिका प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ट्रिट ठरणार आहे हे नक्कीच!

अधिक वाचा – एकता कपूरची मराठमोळी ‘कुसुम’ शिवानी बावकर

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Sep 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT