logo
ADVERTISEMENT
home / Mental Health
ड जीवनसत्व, मानसिक आरोग्य आणि उच्च रक्तदाब यांचा परस्पर संबंध काय, तज्ज्ञांचे मत

ड जीवनसत्व, मानसिक आरोग्य आणि उच्च रक्तदाब यांचा परस्पर संबंध काय, तज्ज्ञांचे मत

 

लहान मुले आणि प्रौढ व्यक्तींमध्ये हाडांची घनता राखण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यकआहे. लठ्ठपणा आणि तीव्र आजार असलेल्यांना या सूर्यप्रकाशाच्या जीवनसत्त्वाची कमतरता जास्त असते. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे चयापचय विकार, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, श्वसन विकार, फुड ऐलर्जी आणि दमा यासारख्या आरोग्याच्या समस्येचा धोका उदभवू शकतो. तसेच हाडे ठिसूळ होणे, फ्रॅक्चर होणे या देखील समस्या जाणवतात. याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन डीचा अभाव देखील मानसिक आरोग्यवर दुष्परिणामकारक ठरते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे निराशा आवश्यकतेपेक्षा अधिक वाढते. आपण क्षुल्लक गोष्टींचा विचार करायला लागतो आणि त्याने आपल्याला मानसिक त्रास होतो. या सर्व बाबतीमध्ये आम्ही अधिक जाणून घेतले, मनोविकारतज्ज्ञ डॉ. शिवांगी पवार यांच्याकडून.

पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांमध्ये मानसिक ताणाच्या समस्येत पाच वर्षांत 10% वाढ

याचा कसा असतो एकमेकांशी संबंध

Shutterstock

 

विविध अभ्यासानुसार या सूर्यप्रकाशाच्या जीवनसत्त्वाची कमतरता मानसिक विकारांशी संबंधित आहे. विविध अभ्यासानुसार नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर एक मानसिक विकार आहे, स्किझोफ्रेनिया, ओसिडी सारखे मानसिक आरोग्याशी संबंधित आजार हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंन्ट्सच्या कमतरतेमुळे उद्भवू शकतात. तसे बर्‍याच अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे अनेक व्यक्ती नैराश्याने ग्रासले आहेत. यामागचे कारण म्हणजे व्हिटॅमिन डी रिसेप्टर्स संपूर्ण मानवी मेंदूमध्ये पसरलेले आहेत आणि त्यातील निम्न पातळी ही आपल्याला मानसिक विकारांचा बळी ठरवू शकते. व्हिटॅमिन डी ची कमतरता ही जागतिक आरोग्य समस्या आहे आणि त्यातील उच्च किंवा कमी पातळी या समस्येचे कारण ठरु शकते. आपल्याला आहार किंवा पूरक आहारांद्वारे ड जीवनसत्वाचे योग्य प्रमाणात सेवन करण्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे. कमी व्हिटॅमिन डी केवळ आपल्या मानसिक आरोग्यावरच परिणाम करत नाही तर उच्च रक्तदाबेशी देखील जोडला जातो. व्हिटॅमिन डीची निम्न पातळी हायपरटेन्शनशी जोडली जाते. अशा प्रकारे, योग्य व्हिटॅमिन डी चे योग्य प्रमाणात सेवन करणे उच्च रक्तदाबाची समस्या दूर ठेवण्यास मदत करू शकते.

ADVERTISEMENT

योगासन केल्यामुळे होतं आरोग्य निरोगी (Yoga Information In Marathi)

पुरेसे व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

Freepik.com

 

पुरेसे व्हिटॅमिन मिळवणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. आपण काही उपाययोजना केल्या तर व्यवस्थित ड जीवनसत्व आपल्याला मिळू शकते. त्यासाठी नक्की करायचे ते पाहूया. 

व्हिटॅमिन डी असलेल्या पदार्थांची निवड करा: योग्य वजन राखणे अतिशय गरजेचे आहे. आपल्या दैनंदिन आहारात सॅमन, मॅकेरल, सारडिन, मशरूम,  अंड्यातील पिवळ बलक, आणि तृणधान्ये, कमी चरबीयुक्त डेअरी उत्पादने समाविष्ट करणे गरजेचे आहे. शरीरात दाह निर्माण करणा-या पदार्थांचे सेवन करू नका

ADVERTISEMENT

ड जीवनसत्वाचे अचूक प्रमाणात सेवन करा: आपल्याकडे व्हिटॅमिन डी पूरक आहार किती प्रमाणात असणे आवश्यक आहे याबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला. वेळोवेळी व्हिटॅमिन डीची पातळी तपासा. गरजेपेक्षा अधिक प्रमाणात विटामिन डी चे सेवन करणे धोकादायक ठरू शकते.

मुबलक सुर्यप्रकाश मिळवा: व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात मिळविण्याकरिता सर्वात उत्तम मार्ग म्हणजे सुर्यप्रकाश. सुर्यप्रकाशात अधिक काळ घालविणे देखिल धोकादायक ठरू शकते याची नोंद घ्या.

कोरोना काळात महिलांचे आरोग्य, स्वास्थ्य जपण्यासाठी काही सोप्या टिप्स

ही माहिती आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिलेली आहे.  त्यामुळे तुम्ही याचा उपयोग नक्कीच करून घेऊ शकता.  तुम्हाला याचा कोणताही तोटा होणार नाही. मात्र तुम्हाला तरीही कोणतीही शंका असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्लाही यासह घेऊ शकता. त्यानुसारच तुम्ही पुढचं पाऊल उचला. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

29 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT