ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
मुसळधार पावसामुळे बॉलीवूड कलाकारांवर आली ही वेळ

मुसळधार पावसामुळे बॉलीवूड कलाकारांवर आली ही वेळ

कालपासून मुंबईत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबईत थोडा जरी पाऊस पडला तरी सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात होते. त्यामुळे पावसाचा वेग वाढला की मुंबईचा वेग मात्र फारच कमी होऊ लागतो. मुंबई शहर हे सतत धावणारं शहर मानलं जातं. पावसात मात्र मुंबईकर अक्षरशः हतबल होतात. जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण होते. कालपासून सुरू झालेल्या या पावसाचा फटका सर्वसामान्य जनतेप्रमाणेच कलाकारांनाही बसला होता. कालच्या मुंबईच्या पावसात अभिनेत्री रेणूका शहाणे यांना कारमधून बाहेर पडून चक्क गुडघ्याभर पाण्यातून घरची वाट पकडावी लागली तर बिग अभिताब बच्चन यांच्या बंगल्याबाहेर पाणी साचल्यामुळे त्यांना घरातून बाहेर पडणं कठीण झालं.

रेणूका शहाणेने केलं मुंबईकरांना आवाहन

रेणूका शहाणे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती सतत समाजात घडणाऱ्या अनेक दैनंदिन गोष्टींबाबत स्वतःचे परखड मत तिच्या सोशल मीडियावरून मांडत असते. काल तिने  पावसातून चालत असतानाचा तिचा एक फोटो काढून इन्स्टा अकाउंटवरून शेअर केला आहे. शिवाय यासोबतच तिने शेअर केले आहे की, “मी सुरक्षित माझ्या घरी पोहचले. कामानिमित्त घराबाहेर गेले होते मात्र पावसाच्या पाण्यामुळे माझी गाडी पाण्यात अडकली. ज्यामुळे मला गुडघ्याभर पाण्यातून चालत घरी यावं लागलं. मात्र मी मुंबईकरांना विनंती करते की कारण नसल्यास घराबाहेर पडू नका. जिथे आहात तिथे सुरक्षित राहा. अनेक शाळेतील मुलं त्यांच्या स्कुलव्हॅनमध्ये अडकलेली आहेत. इतरांच्या गाड्या बंद पडल्या आहेत. ही सर्व परिस्थिती अतिशय भयानक आहे.”

बिग बीच्या बंगल्याबाहेर पाणीच पाणी

रेणूका शहाणे प्रमाणेच बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यातदेखील पाणी साचलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील प्रतिक्षा बंगल्यासमोरील रस्त्यावर पाणी  साचलं होतं. ज्यामुळे हळूहळू पाणी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यातील परिसरात शिरू लागलं. बंगल्याच्या बाहेरील भागात पाणी साचल्यामुळे अभिताभ बच्चन यांच्या कुटुंबियांना घराबाहेर पडणं अथवा घरात जाणं कठीण झालं होतं. 

पल पल दिल के पासचं ट्रेलर लॉंच पोस्टपोर्न

सनी देओलचा मुलगा करन देओल पल पल दिल के पास या चित्रपटातून पदार्पण करत आहे. या चित्रपटाचं काल ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार होतं. मात्र जोरदार पावसामुळे हे ट्रेलर लॉंच आज करण्यात येणार आहे. सनी देओलने  याबाबत त्याच्या इन्स्टा अकाउंटवरून माहिती दिली होती. त्याने शेअर केलं होतं की, हाय फ्रेन्डस, आज आम्ही पल पल दिल के पास या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित करणार होतो. पण पावसामुळे आमची मिडिया टीम इथे पोहचू शकली नाही. उद्या याच वेळी हे ट्रेलर प्रदर्शित केलं जाईल. तुम्ही ते नक्की पाहा आणि इतरांनाही सांगा अशी माझी इच्छा आहे.” 

ADVERTISEMENT

पावसामुळे सर्वसामान्य जनतेलाही प्रवास करणं झालं कठीण

पावसाचा जोर वाढत गेल्यामुळे बुधवारचा संपूर्ण दिवस मुंबईत पाणी साचलं होतं. लोकल ट्रेन मंदावल्या होत्या, चारचाकी गाड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्या रस्त्यातच बंद पडल्या होत्या. गाड्या त्याच जागी ठेऊन मग गुडघाभर पाण्यातून लोकांनी घरी जाण्याचा प्रयत्न केला. ट्रेन, बस, गाडी, चालत असे सर्व मार्ग वापरून लोक घरी जाण्याचा प्रयत्न करत होते. एक ते दोन तासांच्या प्रवासासाठी पाच ते सहा तास लागत होते. ऐन सणासुदीला अचानक झालेल्या या पावसाच्या आगमनामुळे प्रवाशांचा पुरता गोंधळ उडला होता. प्रशासनाकडून मात्र याबाबत काहीच प्रयत्न करताना दिसले नाही. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा

मॅडम तुसाद म्युझियममध्ये बॉलीवूडची चांदनी Sridevi चा वॅक्स स्टॅच्यू

ADVERTISEMENT

अवधूत गुप्ते तयार करणार पहिली Crowdsource गणपती आरती

#POPxoMarathiBappa : अंबानींकडे गणपतीचं जंगी सेलिब्रेशन

 

 

ADVERTISEMENT

 

04 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT