ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
how to apply onion juice for glowing face

कांद्याचा रस आहे त्वचेसाठीही फायदेशीर, कसा कराल उपयोग

कांद्याचा उपयोग आपल्याकडे हमखास प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये केला जातोच. कांद्याचे अनेक औषधीय गुणही आहेत आणि कांद्याचे फायदेही आहेत हे तुम्हाला माहीत आहेच. पण कांद्याचा रस (onion juice) त्वचेसाठीही तितकाच फायदेशीर ठरतो याची तुम्हाला कल्पना आहे का? कांद्याच्या रसाचा उपयोग केसांची काळजी (onion juice benefits for hair) घेण्यासाठी करण्यात येते. आजकाल अनेक पार्लरमध्येही सिस्टिनमध्ये कांद्याच्या रसाचा उपयोग केला जातो. त्याशिवाय कांद्याच्या रसाचे गुणधर्म असणारे अनेक शँपूही उपलब्ध आहेत. पण याचा उपयोग त्वचेसाठी (onion juice benefits for skin) कसा बरं करायचा असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल? तर हो तुम्ही कांद्याच्या रसाचा उपयोग त्वचा आणि चेहरा अधिक चमकदार करण्यासाठीही करू शकता. कांद्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट, विटामिन ए, सी आणि ई त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरते. याचे कसे फायदे करून घेऊ शकतो ते आपण पाहूया.

मुरूमांपासून मिळेल सुटका 

pimple free
Shutterstock

कांद्याच्या रसाचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील मुरूमांपासून सुटका मिळवू शकता. कांद्याच्या रसामध्ये असणारे फ्लेवोनॉईड्स आणि अँटिऑक्सिडंट्स हे मुरूमे घालविण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला मुरूमांमुळे सतत त्रास होत असेल तर तुम्ही कांद्याच्या रसाचा वापर करा. कारण सतत चेहऱ्यावर मुरूमं आल्यामुळे चेहऱ्यावर काळे डागही येतात. 

  • यासाठी तुम्ही एक चमचा कांद्याचा रस घ्या आणि त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिक्स करा
  • हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि तुमच्या मुरूमं आलेल्या ठिकाणी त्याचा वापर करा 
  • काही वेळ तसंच ठेवा आणि नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्हाला काही दिवसातच याचा परिणाम दिसून येईल

ऑलिव्ह ऑईलमुळे चेहऱ्यावरील मुरूमे घालविण्यास मदत होते. हेदेखील अँटिऑक्सिडंटयुक्त असल्याने तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. तुम्ही हे डायरेक्ट तुमच्या चेहऱ्यावर वापरू शकता. 

चमकदार त्वचेसाठी होतो फायदा 

कांद्याच्या रसाचा उपयोग – Freepik

कांद्याचा रस हा नैसर्गिक क्लिंन्झरचे काम करतो. या रसामध्ये आढळणारे पोषक तत्व त्वचेच्या अगदी आतमध्ये जाऊन त्वचेचे पोषण करते आणि त्वचेतील घाण काढून टाकते. कांद्याच्या रसाचा वापर हा क्लिंन्झर, टोनर आणि मास्कच्या स्वरूपातही तुम्ही करून घेऊ शकता. चमकदार त्वचा मिळण्यासाठी तुम्ही कांद्याच्या रसाचा फेसमास्क बनवा. 

ADVERTISEMENT
  • फेसमास्क बनविण्यासाठी तुम्ही एक चमचा बेसन, एक चमचा कांद्याचा रस, अर्धा चमचा दुधाची साय घ्या
  • हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याची पेस्ट तयार करून घ्या 
  • पहिले कच्चे दूध घेऊन चेहरा स्वच्छ करून घ्या आणि चेहऱ्यावर ही पेस्ट लावा
  • त्यानंतर साधारण 15 मिनिट्स चेहऱ्यावर पेस्ट तशीच ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा 
  • आठवड्यातून एकदा या फेसमास्कचा वापर करा. काही दिवसातच तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल 

कांद्याचा रस आणि बेसन या दोन्ही गोष्टी चेहऱ्यावरील अगदी आतपर्यंत साचलेली घाण काढून टाकण्यास आणि चेहरा अधिक उजळविण्यास मदत करतात. बेसनात असलेले गुणधर्म चेहऱ्याला अधिक तजेलदार आणि चमकदार बनविण्यास फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुम्ही याचा वापर करून चेहरा अधिक सुंदर बनवा. 

टीप – तुम्हाला यापैकी कोणत्याही गौष्टीची अलर्जी असेल तर तुम्ही चेहऱ्यावर कोणत्याही गोष्टी लावण्यापूर्वी पॅच टेस्ट आवर्जून करून घ्या. तुम्हाला जर हातावर जळजळ जाणवली तर तुम्ही याचा वापर चेहऱ्यावर करू नका. तुम्हाला जर यामध्ये काहीही चुकीचे वाटत असेल तर तुमच्या त्वचारोगतज्ज्ञांकडून याबाबत माहिती घेऊन मगच याचा वापर करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT