ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
how to drape a saree

साडी कशी नेसावी | How To Drape A Saree| Sadi Kashi Nesaychi In Marathi

आपल्याकडे कितीही कपडे असले तरीही साडी हे एक वेगळंच प्रेम आहे. आपल्याला साडी नेसता येत असो वा नसो आपल्यासडे साडी ही असायलाच हवी असंही अनेकांच्या बाबतीत आपण पाहतो. लग्न ठरल्यावर तर लग्नासाठी साड्यांचे प्रकार कोणते निवडायचे आणि साडी कशी नेसावी यावर सारासार विचार सुरू होतो आणि त्यानंतरच साडी खरेदी सुरू होते. साडी कशी नेसायची, साडी नेसण्याची पद्धत (Sadi Kashi Nesaychi In Marathi), लग्नात नऊवारी साडी कशी नेसवावी, गौराईला साडी कशी नेसवावी, ब्लाऊजचे डिझाईन कसे हवे यावर आपल्याला बऱ्याचदा चर्चा होताना दिसून येते. साडी हे नेहमीच भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. साधी साडी कशी नेसवावी अथवा घरात आणि बाहेर एखाद्या कार्यक्रमाला जाताना साडी कशी नेसावी यामध्येही फरक असतो. या लेखातून साडी कशी नेसावी अर्थात साडी कशी नेसायची याबाबत स्टेट टू स्टेप (Step To Step) पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही बारीक असाल, तुमची कंबर मोठी असेल अथवा तुम्ही जाड असाल तुम्हाला साडी नेसायची पद्धत माहीत असेल तर काहीच अडचण येणार नाही. 

साडी कशी नेसावी महत्त्वाच्या गोष्टी (Sadi Kashi Nesaychi In Marathi)

साडी नेसणे हा अनेक महिलांना कठीण विषय वाटतो. तर नेहमीची सवय असणाऱ्या महिलांना साडी नेसणे अतिशय सोपे आहे असं वाटतं. साडी कशी नेसावी यासाठी काही सोप्या आणि महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. साडीशिवाय सर्वात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे पेटीकोट आणि ब्लाऊज. 

पेटीकोटः पेटीकोटशिवाय साडी नीट बसत नाही. पेटीकोटचेही अनेक प्रकार असतात. पण कंबरेला योग्य घट्ट बसणारा आणि योग्य लांबी असणारा पेटीकोट साडी नेसताना घालायला हवा. पेटीकोट घालताना काही चुका टाळूनच तुम्ही पेटीकोट घाला जेणेकरून तुम्हाला साडी नेसणे सोपे होईल. 

ब्लाऊजः कोणत्या साडीवर कोणता ब्लाऊज आणि कसा घालावा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. मात्र रंगसंगती, मिसमॅच ब्लाऊज हे दोन्ही स्टाईल तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायला हवेत. कोणती फॅशन करायची आणि कोणती ब्लाऊज स्टाईल कोणत्या साडीवर चांगली दिसेल याचे योग्य समीकरण जुळून यायला हवे. 

ADVERTISEMENT

साडी कशी नेसवावी (Step By Step How To Wear Saree)

Instagram Sadi Kashi Nesaychi In Marathi

साडी कशी नेसावी (Sadi Kashi Nesaychi In Marathi) अथवा साडी कशी नेसवावी याची आपल्याला स्टेप बाय स्टेप्स माहिती असणे आवश्यक आहे. तुम्हाला या स्टेप्स माहीत असतील तर साडी नेसणे अत्यंत सोपे होते. तसंच तुम्ही जुन्या साडीपासून नवे ड्रेसही शिऊ शकता.

Step 1: साडी नेसण्यासाठी तुम्हाला त्याची आधी संपूर्ण घडी मोडावी लागते. साडीचा फॉल बिडिंगचा भाग आतल्या बाजूला येत आहे की नाही पडताळून तुम्ही त्याच्या शेवटच्या भागाचे टोक आपल्या पेटीकोटमध्ये कंबरेच्या उजव्या बाजूला पहिले खोचा 

Step 2: त्यानंतर आता साडीचा वरचा भाग धरून आपल्या कमरेभोवती व्यवस्थित एकदा गुंडाळून घ्या आणि वरील भाग पेटीकोटमध्ये घट्ट खोचा. साडीची लांबी किती आहे त्याप्रमाणे त्याचा पहिला भाग आपल्या कमेरभोवती गुंडाळा. तसंच साडी पायाच्या अगदी खाली ठेवा ज्यामुळे तुमचा पेटीकोट चालताना दिसणार नाही याची काळजी घेतली जाईल. 

Step 3: यानंतर तुम्ही साडी गुंडाळून झाली की त्याचा पदर काढा आणि तुम्हाला किती लांबीचा पदर हवा याचे माप घेऊन तुम्हाला पदराला निऱ्या काढायच्या असतील तर त्या काढून पदर व्यवस्थित पिन अप करा

ADVERTISEMENT

Step 4: पदर व्यवस्थित पिनअप केल्यावर उरलेल्या साडीच्या निऱ्या काढणं अतिशय सोपं होतं. आपल्या हाताच्या मधल्या बोटाने अथवा तुम्हाला ज्या बोटाने सोयीस्कर ठरते त्या बोटाने निऱ्यांसाठी साडी दुमडायला घ्या. कमीत कमी एका साडीच्या 8-9 निऱ्या येतात. तुम्ही किती लहान आणि मोठ्या निऱ्या काढत आहात त्यावर अवलंबून आहे. साडीच्या निऱ्या काढणं तसं सोपं आहे. निऱ्या व्यवस्थित काढून झाल्यावर त्या पेटीकोटच्या आत रितसर खोचा. खोचल्यानंतर पेटीकोटच्या आत हात घालून निऱ्या खेचून घ्या. जेणेकरून फुगलेल्या राहणार नाहीत.

Step 5: निऱ्या व्यवस्थित खोचल्यानंतर पुन्हा एकदा त्यावर नीट हात लावा आणि पिन अप करा. जेणेकरून साडी फुगलेली दिसणार नाही. साडी पिन लावा. Step 6: साडी पूर्ण नेसून झाल्यावर जर तुम्हाला वरच्या पदराला निऱ्या नको असतील आणि हातावर पदर हवा असेल तर तुम्ही पुन्हा एकदा पदर हातावर सोडू शकता. तुमची साडी नेसून योग्य लुक तयार आहे.

पाचवारी साडी कशी नेसायची

Instagram साधी साडी कशी नेसवावी

पाचवारी आणि सहावारी साडीच जास्त प्रमाणात आपल्याकडे नेसली जाते. काही साड्या या लांबीला जास्त नसतात. त्यांचे पदर आणि निऱ्या या जास्त येत नाहीत. अगदी पाच पदरी अथवा सहा निऱ्या अशाच येतात. त्यामुळेच साधी साडी कशी नेसवावी असा प्रश्न न पडता अगदी सोपं होतं. 

Step 1: साडी नेसण्यासाठी संपूर्ण साडीची घडी मोडा. साडीचा फॉल बिडिंगचा भाग आतल्या बाजूला येत आहे की नाही पडताळून तुम्ही त्याच्या शेवटच्या भागाचे टोक आपल्या पेटीकोटमध्ये कंबरेच्या उजव्या बाजूला पहिले खोचा 

ADVERTISEMENT

Step 2: त्यानंतर आता साडीचा वरचा भाग धरून आपल्या कमरेभोवती व्यवस्थित एकदा गुंडाळून घ्या आणि वरील भाग पेटीकोटमध्ये घट्ट खोचा. साडीच्या लांबीनुसार एकदाच ही कमरेभोवती पेटीकोटला गुंडाळून घ्या

Step 3: यानंतर तुम्ही साडी गुंडाळून झाली की त्याचा पदर काढा आणि तुम्हाला किती लांबीचा पदर हवा याचे माप घेऊन त्यानुसार व्यवस्थित हातावर पदर घ्या आणि पिनअप करा

Step 4: पदर व्यवस्थित पिनअप केल्यावर उरलेल्या साडीच्या निऱ्या काढायला घ्या. पण त्यापूर्वी ब्लाऊजच्या बाजूने एक बाजू व्यवस्थित पेटीकोटमध्ये खेचून घ्या. जेणेकरून साडीचा लुक पूर्ण झाल्यावर तुमची साडी चपखल बसलेली असू शकेल. तो व्यवस्थित एका बाजूला निऱ्यांच्या आत पिन अप करा. त्यानंतर निऱ्या काढून त्या पेटीकोटमध्ये खोचा

Step 5: निऱ्या व्यवस्थित खोचल्यानंतर पुन्हा एकदा त्यावर नीट हात लावा आणि पिन अप करा. साडी फुगलेली दिसणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला हवं असेल तर साडीच्या निऱ्यांना पिन लावा. पाचवारी आणि सहावारी साडी नेसून तयार

ADVERTISEMENT

नऊवारी साडी कशी नेसवावी (How To Drape A Nauvari Saree)

Instagram नऊवारी साडी कशी नेसवावी

अगदी पूर्वीपासून ब्राह्मण पद्धतीच्या नऊवारी साड्या या विवाह सोहळ्याच्या वेळी अथवा आपल्याकडे अनेक सणासमारंभाच्या वेळी नेसल्या जातात. ही नेसायची एक विशिष्ट पद्धत आहे. नऊवारी साडीने तर प्रत्येक स्त्री सुंदर दिसतेच. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमासाठी नऊवारी नेसायची असेल तर त्यावर उत्तम स्टाईलचे लग्नासाठी दागिनेदेखील हवेतच. 

Step 1: या नऊवारी साडीच्या काठाकडचा भाग वर उचलून कमरेला खोचला जातो. ज्याला ओचा असं म्हटलं जातं. या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे घोळदार ओचा. ओचा काढणं ही एक कला आहे. पूर्वी महिला या ओच्यामध्ये बऱ्याच वस्तू ठेवायच्या म्हणून हा ओचा काढला जायचा. कारण हा ओचा साधारणतः 8 ते 10 इंचाचा असतो. शिवाय यामध्ये निऱ्यांचा घोळही जास्त असतो. नऊवारी साडीला अधिक निऱ्या काढाव्या लागतात. या निऱ्या काढून झाल्यानंतर तुम्ही त्या खोचून घ्या आणि मग बाहेरच्या बाजूने काढून त्याचं केळं काढा अर्थात ते फोल्ड करून घ्या. 

Step 2: या साडीमध्ये निऱ्या कमरेला न खोचता त्या एकत्र घेऊन त्याचं ‘केळं’ काढलं जातं. पूर्वी यामध्ये पैसे ठेवले जायचे. ही साडी साधारणतः पायापर्यंत झाकलेली असली तरीही तुमच्या पोटऱ्यांचा काही भाग मात्र उघडा राहतो. सध्या या साडी नेसताना आतमध्ये स्लॅक्सदेखील घातली जाते. पण पूर्वीच्या महिलांना त्याची गरज भासत नव्हती. 

Step 3: साडीचा पदर हा एका सरळ रेषेमध्ये काढलेला नसतो आणि खांद्यावरून वरखाली अशा प्रकारे काढला जातो. त्याशिवाय मागचा काष्टा हा दोन्ही काठ मधोमध यावेत अशा तऱ्हेने काढला जातो. यामुळे याचा काठ नीट एका रेषेत समोर दिसतो. याचा काष्टा हे नऊवारी साडीचे वैशिष्ट्य आहे. काष्ट्याचा भाग हा एका सरळ रेषेत यायला हवा. 

ADVERTISEMENT

Step 4: याचा पदर पाचवारी अथवा सहावारी प्रमाणे अगदी पायघोळ नसतो. तसंच हा पदर अगदी सरळ रेषेतही नसतो. तसंच अधिकतम नऊवारी साड्या या कॉटनच्या असल्याने त्या अंगाला व्यवस्थित चिकटून बसतात त्यामुळे तुम्हाला हा पदर सेट करायलाही त्रास होत नाही. 

पैठणी साडी कशी नेसवावी (How To Drape Paithani Saree)

पैठणी म्हणजे महाराष्ट्राची शान. पैठणीचे अनेक डिझाईन्स आपल्या महाराष्ट्रात तयार होते. सहसा लग्नांमध्ये महाराष्ट्रीयन वधू पैठणीचा पर्याय निवडते. पैठणी साडी ही अगदी हलकी नसते. त्यामुळे ती नेसतानाही काळजी घ्यावी लागते. पैठणी साडी कशी नेसवावी जाणून घेऊया. 

Step 1: पैठणी नेसताना तुम्ही हाय हिल्स घालणार असाल तर आधी हाय हिल्स घाला आणि मगच साडी नेसायला सुरूवात करा. पहिल्यांदा सरळ रेषेत तुम्ही पैठणीचा काठ पेटीकोटमध्ये खोचून घ्या. 

Step 2: त्यानंतर पैठणीच्या डिझाईन्सचा भाग येतो त्याप्रमाणे तुम्ही पदर काढून घ्या. पैठणीच्या पदरावरील डिझाईन्स व्यवस्थित दिसणे महत्त्वाचे आहे कारण त्यानेच अधिक चांगला लुक येणार असतो. त्यामुळे त्यानुसार पदर काढून घ्या. व्यवस्थित पिन अप करून घ्या.

ADVERTISEMENT

पदर पिन अप करून झाल्यावर साडीच्या निऱ्या काढा आणि खोचून घ्या. साडीच्या निऱ्या काढ

Step 3: ताना जितक्या बारीक काढता येतील तितक्या काढा जेणेकरून साडीचा लुक अधिक चांगला येईल. साडीचा काठपदर व्यवस्थित दिसेल अशाच पद्धतीने निऱ्या काढा आणि खोचा 

Step 4: निऱ्या काढून झाल्यावर साडी पिनच्या मदतीने एका सरळ रेषेत राहण्यासाठी पिन अप करून ठेवा 

कोळी पद्धतीची साडी (How To Drape Authentic 12 Twelve Yards Koli Saree)

बऱ्याचदा अगदी शाळेतही आपल्या मुलींना कोळी पद्धतीची साडी कोळी डान्ससाठी नेसवावी लागते. मग प्रत्येकवेळी आपण पार्लरमध्ये किती धाव घेणार? कोळी पद्धतीची साडी नक्की कशी नेसायची जाणून घ्या स्टेप बाय स्टेप. कोळी साडीचा पदर, कोळी साडीचा शेगला, कोळी साडीचा काष्टा, कमरेभोवतालचे आठे हा महत्त्वाचा असतो. ही साडी 12 वार असते. सर्वात मोठी साडी म्हणून ओळखली जाते. 

ADVERTISEMENT

Step 1: सर्वात आधी पदर काढून घ्यावा लागतो. तो गळ्याजवळ गुंडाळून ठेवावा. त्यानंतर उरलेली साडी डाव्या बाजूने गुंडाळून खाली घ्यावी. 

Step 2: खाली घेतलेल्या साडीचे आठे मारावेत. आठे म्हणजे डाव्या बाजूला साडीची गाठ मारायची. गाठ मारून झाल्यावर साडी पुन्हा गोल गुंडाळायची. गुंडाळलेली साडी ओढून त्याचा काष्टा काढून मागच्या बाजूला खोचायचा. काष्टा काढल्यावर साडी गुढघ्यापर्यंत वर येते आणि घट्ट बसते. 

Step 3: त्यानंतर उरलेली साडी गुंडाळून तुमच्या उंचीनुसार अथवा वयानुसार पुन्हा एकदा साडीचा आठा काढायचा. साडी पिळ मारून घेतली की साडी कमरेला घट्ट बसते. ती सुटण्याची भीती राहात नाही. त्यानंतर साडीची काठाची बाजू घेऊन परत गोल गुंडाळावी. वर सोडलेला काष्टा पुन्हा काढून खोचावा. त्यानंतर उरलेल्या साडीची शेगला काढावा. कोळी साडीचा खरा लुक हा शेगल्यावरच असतो. 

Step 4: कमरेभोवती घट्ट पिळ मारून हा शेगला काढावा. दोन वेळा काष्टा काढून पुन्हा पुन्हा खोचावा लागतो. शेगला काढून झाल्यावर पुन्हा एकदा काष्टा खोचून घ्या. कोळी साडी नेसून तयार. 

ADVERTISEMENT

पुढे पदर असलेली साडी (Front Side Pallu Saree)

Instagram

साधारणतः गुजराती अथवा मारवाडी पद्धतीमध्ये पुढे पदर असणारी साडी नेसण्यात येते. पाचवारी अथवा सहावारी, नऊवारी साडीमध्ये पदर हा डाव्या खांद्यावर घेतला जातो. मात्र या साडीमध्ये उजव्या खांद्यावरून पदर पुढे घेण्यात येतो आणि याच्या निऱ्या पुढे काढण्यात येतात. तर डाव्या बाजूला हा पदर खोवण्यात येतो. 

Step 1: साडी नेसण्यासाठी संपूर्ण साडीची घडी मोडा. साडीचा फॉल बिडिंगचा भाग आतल्या बाजूला येत आहे की नाही पडताळून पाहा. त्यानंतर तुम्ही त्याच्या शेवटच्या भागाचे टोक आपल्या पेटीकोटमध्ये कंबरेच्या उजव्या बाजूला पहिले खोचा

Step 2: त्यानंतर पदर काढा आणि तुमच्या पाठीकडून उजव्या बाजूने छातीच्या बाजूला पुढे घ्या. त्यानंतर तुम्ही त्याच्या पदराच्या निऱ्या काढा आणि डाव्या बाजूला पिनअप करा. 

Step 3: हे झाल्यानंतर तुम्ही पाचवारी साडीप्रमाणेच साडीच्या निऱ्या काढायला घ्या. या निऱ्या काढून झाल्यावर खोचा आणि तुमची पुढे पदर असणारी साडी नेसून तयार आहे. 

ADVERTISEMENT

Step 4: ही साडी नेसायला जास्त वेळ लागत नाही. मात्र याचा पदर व्यवस्थित पुढच्या बाजूला येणे गरजेचे आहे. तसंच पदर काढताना छाती खराब दिसणार नाही याची काळजी घ्या. तसंच यामधून पोट अधिक दिसण्याची शक्यता असते. तुम्हाला जर पोट दाखवायला नको असेल तर साडी नीट पिन अप करा. 

मराठी साडी धोती स्टाईलमध्ये (Marathi Saree In Dhoti Style)

Instagram

काही मुलींना साडीमध्ये चालणे आणि साडी सावरणे शक्य होत नाही. त्यामुळे मराठी साडी धोती स्टाईलमध्ये नेसणं अत्यंत सोपं ठरतं. यासाठी नक्की काय करायचं ते पाहूया. 

Step 1: सहावारी साडी घेऊनदेखील तुम्ही धोती स्टाईल साडी नेसू शकता. त्यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा साडीची घडी मोडा. त्याआधी तुम्ही खाली ¾ घट्ट लेगिंग्ज घाला. साडी घेऊन डाव्या बाजूला थोडी जास्त साडी घेऊन मध्यभागी गाठ बांधा.

Step 2: त्यानंतर दोन पायांच्या मधून डाव्या बाजूची साडी आतमध्ये घेऊन काठ बाहेरच्या बाजूला ठेऊन त्याच्या निऱ्या काढा आणि मागच्या बाजूला तो काष्टा खोचा. हा काष्टा काढल्यावर तो व्यवस्थित पिनअप करा आणि मगच खोचा जेणेकरून तो काष्टा निघणार नाही. 

ADVERTISEMENT

Step 3: त्यानंतर उजव्या बाजूची साडी दोन पायांच्या मधून उजव्या साडीने बाहेर काढा. अगदी दोन ते तीन निऱ्या काढून मागे खोचा आणि उरलेल्या साडीचा भाग पुढे काढून तो पदर तुम्ही डाव्या खांद्यावर घ्या. या साडीचा पदर हातावर सोडू नका तर तुम्ही त्याच्या निऱ्या काढून खांद्यावर पिनअप करा. हे झाल्यावर वरून कंबरपट्टा लावा. तुमची मराठी साडी धोती स्टाईलमध्ये तयार. हा लुक तुम्हाला पारंपरिक आणि आधुनिकतेचे मिश्रण करून देतो. इतकंच नाही तर ही स्टाईल तुम्हाला खास बनवते. 

स्टायलिश लुक साडी (Stylish Look Saree)

डिझाईनर ब्लाऊज घातला असेल तर तुम्ही सैलसर पदराची स्टाईल करू शकता. ही स्टाईल करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. असा स्टायलिश लुक तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी चांगला दिसू शकतो.  

Step 1: लूज अर्थात सैलसर पदर साडीचा काढायचा असेल तर त्यासाठी शिफॉन, जॉर्जेट, शिफॉन सिल्क अशा फॅब्रिकच्या साड्या अथवा हलक्या वजनाच्या साड्यांचा उपयोग करा. या साड्या नेसायला आणि सांभाळायला अतिशय हलक्या असतात आणि लुकही अप्रतिम दिसतो 

Step 2: या साडीचा पदर कमरेपासून सैल सोडा आणि खांद्यावर पदराच्या प्लेट्स तयार करा आणि मग पिनअप करा. या तऱ्हेने साडी नेसण्याची स्टाईल असेल तर तुम्ही त्यासह स्ट्रेप ब्लाऊज, टर्टल नेक ब्लाऊज आणि ब्रालेट ब्लाऊज वापरू शकता. यासाठी कमीत कमी वर्क करण्यात आलेली साडी आणि प्रिंट नसणारी साडी तुम्ही वापरावी जेणेकरून तुमचा लुक अधिक स्टायलिश आणि आकर्षक दिसू शकतो.

ADVERTISEMENT

घागरा साडी कशी नेसवावी (How To Wear Ghagara Style Saree)

सहसा महाराष्ट्रीयन पद्धतीत ही साडी नेसली जात नाही. मात्र आता वेगवेगळ्या पद्धतीची फॅशन आणि स्टाईल करण्याची पद्धत आली आहे. दिवाळीचा सण असो अथवा लग्न घागरा साडी ही वेगळी स्टाईल आता दिसून येते आहे. वाचा घागरा साडी कशी नेसवावी.

Step 1: घागरा स्टाईल साडीमध्ये सहसा नेटच्या साड्यांचा वापर होतो. तसंच खाली मोठा घेरदार पद्धतीचा पेटीकोट अथवा घागरा आणि वर ब्लाऊज असं कॉम्बिनेशन असतं. 

Step 2: यावर तुम्हाला केवळ एका बाजूने सैलसर पदर अथवा घट्ट पदर काढून पिन अप करायचे आहे. याचा पदर अत्यंत महत्त्वाचा असतो. तुम्ही हा पदर निऱ्या काढून पिनअप करण्यापेक्षा हातावर सोडावा. 

Step 3: याच्या अजिबात निऱ्या काढण्याची गरज नाही. केवळ पदर काढावा लागतो. त्यामुळे साडी नेसण्याचा वेळ वाचतो. 

ADVERTISEMENT

कोणत्याही सणासाठी आणि कार्यक्रमासाठी तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने साडी नेसू शकता हे या लेखातून पाहिले आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या सणांसाठी तुम्ही काही वेगळ्या पद्धती शोधत असाल तर तुम्हाला नक्कीच आमचा लेख फायदेशीर ठरू शकतो. 

03 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT