ADVERTISEMENT
home / मनोरंजन
#SacredGames : सरताजने केलं रमाचं कौतुक

#SacredGames : सरताजने केलं रमाचं कौतुक

#SacredGames चा दुसरा सिझन सुरू झाला आहे. ज्याची वाट या वेबसीरिजचे चाहते अनेक दिवसांपासून पाहत होते. या बहुचर्चित वेबसीरिजच्या दूस-या पर्वात अनेक मराठी चेहरे आहेत. त्यातच Saif Ali Khan च्या सोबत अभिनेत्री Smita Tambe ही झळकली आहे. 

सैफने स्मिताला दिलीी शाबासकी

न्यू-क्लिअर बॉम्बच्या साखळीला शोधण्यामध्ये सिनीअर इन्स्पेक्टर सरताज सिंगला मदत करणारी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट रमाच्या भूमिकेत स्मिता तांबे यामध्ये साकारत आहे. स्मिता तांबेच्या या भूमिकेबद्दल सध्या तिचे खूप कौतुक होत आहे. पण को-स्टार सैफ अली खानने दिलेली कॉम्प्लिमेन्ट तिच्यासाठी सर्वाधिक महत्वाची आहे. स्मिता याविषयी सांगते की, “सैफ अली खान यांची मी खूप वर्षांपासून चाहती आहे. पहिल्यांदाच मी त्यांच्यासोबत काम करत होते. ते खूप मनमिळावू स्वभावाचे आहेत. सीन सुरू नसताना ते खूप चेष्टा-मस्करी करत असतात. पण एकदा का सीन सुरू झाला की, मग भूमिका वठवताना ते एकदम गंभीर होतात. चित्रीकरणावेळी माझे काम पाहून तू खूप इंटेन्स एक्टरेस आहेस, ही त्यांनी दिलेली शाबासकी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे.”

सिंपल लुकमधील स्मिता तांबेची रमा

सेक्रेड गेम्समध्ये स्मिता साकारत असलेली ‘रमा’ मुंबईतल्या शिवडीमध्ये कुटुंबासमवेत राहणारी आहे. मूळची विदर्भातली असल्याचं दाखवण्यात आलं आहे. आपल्या कामाबद्दल प्रचंड निष्ठावान असलेली रमा. अहोरात्र झोकून देऊन काम करणारी! २६/११ च्या हल्ल्यानंतर देशासाठी काहीतरी करून दाखवण्यासाठी ती पोलिसात भरती होते. मुंबईवर हल्ला करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांचे गुप्त संदेश ‘डिकोड’ करताना ती दाखवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

कसा होता अनुभव

‘मसान’ फेम दिग्दर्शक नीरज घ्यावन या सोबत स्मिताने पहिल्यांदाच काम केले. ती सांगते, “नीरज घ्यावन खूप शांत दिग्दर्शक आहे. तो खूप शांततेत काम करतो. अभिनेत्याला त्याच्या भूमिकेविषयी किंवा एखाद्या सीनविषयी समजावताना भारंभार माहितीने प्रेशराईज करत नाही. गरजेपुरतीच माहिती देऊन त्यावर अभिनेत्यालाही काम करून देण्याची मोकळीक देतो. त्यामुळे आपल्या कामावर आपली वेगळी छाप उमटते.”

स्मितासोबतच अमृता आणि अमेयही महत्त्वपूर्ण भूमिकेत

या वेबसीरिजमध्ये अनेक मराठी चेहरे आहेत, या सर्व चेहऱ्यांना चांगल्या भूमिका देण्यात आल्या आहेत. त्यातला लक्ष वेधणाऱ्या भूमिकेत अभिनेत्री अमृता सुभाष आहे. जिची भूमिका रॉ च्या अधिकाऱ्याची आहे. ही भूमिका खूपच महत्त्वपूर्ण आहे. तसंच अभिनेता अमेय वाघ छोट्या पण लक्षवेधी भूमिकेत यामध्ये झळकला आहे. त्यासोबतच बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये लक्षवेधी ठरलेली कंटेस्टंट नेहा शितोळेही या सिझनमध्ये आहे. नेहा पहिल्या सिझनमध्येही झळकली होती. सरताज सिंगचा साथीदार कॉन्स्टेबल काटेकरच्या पत्नीच्या भूमिकेत ती दिसत आहे. 

सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझनही हिट

रिलीज झाल्यापासून सेक्रेड गेम्स या वेबसीरिज तुफान फॅन फॉलोइंग आहे. याचा पहिला सिझन तर गाजलाच होता पण दुसऱ्या सिझनलाही तेवढीच पसंती मिळत आहे. त्यामुळे याही सिझनला वेबसीरिजच्या फॅन्समध्ये वाढ झाल्याचं दिसतंय. खरंतर हा वेबसीरिजचा प्रीक्वल आहे. ही वेबसीरिज विक्रम चंद्रा यांच्या कादंबरीवर आधारित आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा – 

वेबसीरिजमध्ये सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापूरच सर्वाधिक लोकप्रिय

वेबसीरिजमध्ये ‘मेड इन हेवन’ सर्वाधिक लोकप्रिय

कल्की कोचलिन काय म्हणाली तिच्या ‘भ्रम’मधील भूमिकेबाबत

ADVERTISEMENT
16 Aug 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT