कल्की कोचलिन काय म्हणाली तिच्या 'भ्रम'मधील भूमिकेबाबत

कल्की कोचलिन काय म्हणाली तिच्या 'भ्रम'मधील भूमिकेबाबत

कल्की कोचकिन ही नेहमीच हटके आणि चाकोरीबाहेरील भूमिकांना प्राधान्य देणारी अभिनेत्री आहे. ती तिच्या फार विचारपूर्वक त्या निवडते. लवकरच ती तिच्या चाहत्यांना एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत दिसणार आहे. कल्कीने नुकतच तिच्या आगामी भ्रम या वेबसिरिजच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. भ्रम वेबसिरिजमधील कल्कीची भूमिका आव्हानात्मक असून ती साकारण्यासाठी कल्की सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. कल्की या वेबसिरिजमध्ये एका मानसिक रुग्णाची भूमिका साकारणार आहे. भ्रम ही वेबसिरिजमध्ये कल्की एका कांदबरीकारची भूमिका साकारत  आहे जी एक PTSD पिडीत रूग्ण आहे. हा आजार तिला एका अपघातामुळे झालेला आहे असं दाखविण्यात आलं आहे. या भूमिकेचं नाव अलीशा आहे जी एक रोमॅंटिक लेखक आहे. या वेबसिरिजच्या शूटिंगसाठी कल्की सध्या शिमलामध्ये आहे. या वेबसिरिजचं अर्धे शूटिंग नंतर मुंबईतदेखील केलं जाणार आहे. या वेबसिरिजचं लेखन के हरी कुमार यांनी केलं आहे तर संगीत सिवन याचं दिग्दर्शन करणार आहेत. 

Instagram

काय म्हणाली कल्की...

भ्रम वेबसिरिज आठ एपिसोडमध्ये प्रदर्शित केलं जाणार आहे. जी झी 5 या अॅपवर सप्टेंबरमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. यामध्ये कल्कीसोबत भुमिका चावला, संजय सुरी, इजाज खान, ओंकार कपूर हे कलाकार असणार आहेत. कल्कीने तिच्या भूमिकेबाबत सांगताना तिने शेअर केलं की, भ्रम ही वेबसिरिज तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. कारण शेवट येईपर्यंत तुम्हाला कथेचा अंदाज लावणं कठीण जाईल. मी जेव्हा ही स्क्रिप्ट वाचली तेव्हा मी अक्षरशः हैराण झाले. इतकं छान आणि रहस्यमय हे कथानक आहे. त्यामुळे आता या भूमिकेबाबत आणि शूटिंगबाबत मी नक्कीच उत्सुक आहे. शिवाय प्रेक्षकांनादेखील ही वेबसिरिज नक्कीच आवडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

Instagram

कलाकारांना लागलंय वेबसिरिजचं वेड

आजकाल सर्वच बॉलीवूड कलाकारांना वेबसिरिजमध्ये काम करण्याचा ध्यास लागला आहे. कारण टेलिव्हिजन आणि चित्रपटापेक्षा वेबसिरिजला जास्त चांगला प्रतिसाद मिळत आहे. कल्कीला तर हे माध्यम सर्वात जास्त आवडतं असं वाटत आहे. कारण ती एका पाठोपाठ एक असं वेबसिरिजमध्ये काम करत आहे.यापूर्वी ती मेड इन हेवनमध्ये झळकली होती. कल्की कोचलिन सेक्रेट गेम्सच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. ज्यामुळे तिच्या निरनिराळ्या भूमिका पाहण्यासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक आहेत. कल्कीने गली बॉयमध्ये देखील काम केलं आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट सोबत केलेल्या एका छोट्याशा कामानेदेखील कल्कीने प्रेक्षकांचं मन नक्कीच जिंकलं होतं. कल्की एक नॅशनल अवॉर्ड विनर अभिनेत्री आहे. तिने देव डी, लागा चुनरी में दाग, शैतान, त्रिशा, शांघाय, ये जवानी है दिवानी, हॅपी एंडिंग, एक थी डायन, काश, जिया और जिया अशा निरनिराळ्या चित्रपटांंमधून काम केलं आहे. यासोबतच अनेक शॉर्ट फिल्मसमध्ये तिने काम केलं आहे. आता ती एकाच वेळी अनेक वेबसिरिजमधून चाहत्यांसमोर येत आहे. कल्कीने साकारलेल्या भूमिका नेहमीच हटके असतात त्यामुळे त्या पाहण्यासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक असतात. कल्कीच्या आगामी भूमिकांमधून प्रेक्षकांना काहीतरी नवं गवसण्याची शक्यता आहे. शिवाय यामधून कल्कीच्या अभिनयाचा वेगळा पैलू समोर येणार आहे.

अधिक वाचा

दिया मिर्झाचं 'काफिर'मधून वेबसिरिजमध्ये पदार्पण

बॉलीवूडचे ‘हे’ सेलिब्रेटी सध्या वेबसिरिजमध्ये आजमावत आहेत आपलं नशीब

हुतात्मा’ वेबसिरिजमधून उलगडणार संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम