सैफ अली खान ने मागच्यावर्षी तान्हाजी- दी अनसंग वॉरिअर या चित्रपटात उदय सिंग राठोड ही खलनायिकाची भूमिका साकारली होती. या भूमिकेबाबत सैफ समाधानी नसला तरी प्रेक्षकांनी त्याच्या कामाचे कौतुकच केले होते. आता सैफ पु्न्हा एकदा व्हिलनच्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. कारण सैफ आदिपुरूष चा चित्रपटात सर्वात मोठ्या खलनायकाच्या रूपात दिसणार आहे. या चित्रपटातील लंकेशसाठी सैफच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
सैफ साकारणार इतिहासातील सर्वात मोठा खलनायक
सैफ अली खानने त्याच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नुकताच त्याने वयाच्या पन्नाशीचाटप्पा पार केला आहे. वयानुसार आलेल्या शहाणपमातून तो नेहमी विविध छटांमधील भूमिका निवडताना आढळतो. सध्या चित्रपटसृष्टीत हटके कंसेप्ट आणि कंटेटवर भर देणारे चित्रपट निर्माण केले जात आहे. अशावेळी सैफही नवववीन प्रयोगांना सामोरं जाण्यासाठी तयार झाला आहे. सैफ अभिनयात इतका परफेक्ट आहे की तो कोणत्याही भूमिकेला योग्यच न्याय देतो. आता तो इतिहासातील सर्वात मोठ्या खलनायक म्हणजे लंकेशच्या रूपात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज होत आहे.
सैफच्या पोस्टवर करिनाने अशी दिली प्रतिक्रिया
सैफ अली खानने या प्रोजेक्टबाबत स्वतःच खुलासा केला आहे. त्याने शेअर केलं आहे की, “मी ओमी दादा (म्हणजेच ओम राऊत) सोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी उत्साहित आहे. सैफने पुढे शेअर केलं आहे की, “त्याच्याकडे एखाद्या कथेला जिवंत करण्याची विलक्षण दृष्टी आणि टेक्निकल ज्ञान आहे. त्याने ज्या पद्धतीने तान्हाजीचे शूटिंग केले होते त्यातून त्याने चित्रपटसृष्टीला या अत्याधूनिक युगात एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं आहे. त्यामुळे यावेळी ही आपल्या सगळ्यांना या चित्रपटातून त्याच्या कौशल्याचा एक वेगळाच अनुभव पुन्हा मिळणार आहे. हा एक असामान्य प्रोजेक्ट असेल आणि मी याचा एक भाग असणं हे मला नक्कीच रोमांचित करणारं आहे. ज्यात मी शक्तिशाली प्रभाससोबत तलवारीने लढण्यासाठी आणि व्हिलनची भूमिका साकारण्याची वाट पाहत आहे ” या सैफच्या पोस्टवर प्रभासने ही त्याला सैफसोबत काम करण्याचा आनंद असून एवढ्या मोठ्या कलाकारासोबत एकत्र काम करायला मिळणं ही गौरवास्पद गोष्ट आहे अशी कंमेट केली आहे. एवढंच नाही तर यावर सैफची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री करिनाने “ऐतिहासिक काळातील एक रुबाबदार व्हिलन” अशी कंमेट केली आहे. ज्यामुळे या चित्रपटात पुन्हा एकदा सैफ अली खान, निर्माता ओम राऊत आणि निर्माता भूषण कुमार यांची कमाल पाहायला मिळेल हे सिद्ध झालं आहे. आदिपुरूषचे हिंदी आणि तेलुगू दोन्ही भाषांमध्ये चित्रीकरण केले जाणार आहे. शिवाय या थ्री डी चित्रपटाचे नंतर तामिळ, मल्याळम, कन्नड आणि अनेक परदेशी भाषांमध्ये डबिंग केले जाईल. त्यामुळे आदिपुरूष पुढच्या वर्षीचा एक सुपरहिट चित्रपट ठरेल यात शंकाच नाही.
सैफच्या या आधीच्या खलनायक भूमिका
सैफने याआधीदेखील अनेक खलनायकाच्या भूमिका साकरलेल्या आहेत. ओमकारामध्ये लंगडा त्यागी, तानाजीमध्ये उदयभान राठोड… मात्र आदिपुरूष म्हणजे भारतीय महाकाव्यचे ऑन स्क्रीन भव्य, दिव्य रूपांतरण असणार आहे. ज्यातून वाईटावर चांगल्याचा प्रभाव दर्शवण्यात येणार आहे. अशा एपिक ड्रामामध्ये सैफला पुन्हा मुख्य खलनायकाच्या भूमिकेत पाहणं चाहत्यांसाठी नक्कीच उत्सुकता वाढवणारं असणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
बिग बींची नात ‘नव्या नवेली’ या आजारावर घेत होती उपचार, उघड केली स्ट्रगल स्टोरी
प्रेग्नेंसीनंतर नताशा पंड्याचा हॉट अंदाज, फोटो वायरल
Masaba Masaba Review:नीना गुप्ता आणि मसाबाचे खासगी आयुष्य उलगडणारी सीरिज