ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
सुनिल ग्रोव्हरच्या उपचारांसाठी सलमान खानचा मदतीचा हात

सुनिल ग्रोव्हरच्या उपचारांसाठी सलमान खानचा मदतीचा हात

कॉमेडियन सुनिल ग्रोव्हर सध्या त्याच्या प्रकृती अस्वास्थामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला ह्रदयविकाराचा झटका आला होता. उपचारांसाठी त्याला तातडीने रूग्णालयात भरती करण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या आरोग्यासाठी आता चक्क बॉलीवूडचा सलमान खान स्वतः लक्ष देत आहे. कारण सलमानने सुनिलच्या उपचारांसाठी स्वतःच्या पर्सनल डॉक्टरांची टीम पाठवली आहे. आता सलमानच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली सुनिलवर उपचार सुरू आहेत त्यामुळे तो लवकर बरा होईल अशी आशा निर्माण झाली आहे. 

या कारणामुळे लता मंगेशकर राहिल्या अविवाहित

हार्ट सर्जरीसाठीही सलमानने केली मदत

सलमान त्याचं कुटुंब आणि मित्रमंडळींवर खूप प्रेम करतो. मित्रमंडळींना तो त्याच्या आयुष्याचा आणि कुटुंबाचा भाग समजतो. त्यामुळे त्यांच्या जवळच्या लोकांसाठी तो काहीही करायला तयार होतो. सुनिल ग्रोव्हरची तब्येत बिघडताच सलमानला खूप चिंता वाटू लागली. सुनिलने सलमान खानसोबत भारत चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. यासोबतच सुनिल सलमानच्या अनेक चित्रपटांमध्ये झळकला आहे. सुनिलने त्याच्या विनोदी शैलीने चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. मात्र आता सुनिल त्याच्या आजारपणामुळे त्रस्त झाला आहे. अशा वेळी प्रत्येकाला एखाद्याच्या आर्थिक आणि मानसिक मदतीची गरज असते. सुनिलच्या मदतीसाठी सलमान खान पुढे आला आणि त्याच्या हार्ट सर्जरीसाठी त्याने मदतीचा हात पुढे केला. सलमान खानने यासाठी स्वतःच्या डॉक्टरांची टीम सुनिलच्या उपचारांसाठी पुढे केली. शिवाय त्यांना अशा सूचनाही दिल्या की, “सुनिलवर योग्य उपचार कराच पण त्याला लवकरात लवकर बरं करा “

मीरा जगन्नाथ, जय दुधाणे बिग बॉसनंतर पहिल्यांदाच एकत्र

ADVERTISEMENT

कपिल शर्मालाही वाटतेय चिंता

कपिल शर्माच्या शोमध्ये सुनिल ग्रोव्हरने अनेक वर्ष काम केलं होतं. कालांतरांने सुनिल आणि कपिलच्या नात्यात काही वाद निर्माण झाले. मात्र जेव्हा कपिलला सुनिलची तब्येत बिघडली आहे असं समजलं तेव्हा त्यालाही सुनिलची चिंता वाटू लागली. त्याने लगेच त्याला मेजेस केला मात्र सुनिलला सध्या आरामाची गरज आहे. त्यामुळे त्याने कपिलच्या मेसेजला प्रतिक्रिला दिलेली नाही. मात्र सलमान खानने स्वतः लक्ष घालून सुनिलवर उपचार सुरु केल्यामुळे तो लवकर बरा होईल अशी आशा चाहत्यांना वाटू लागली आहे. सुनिल एका वेबसिरिजचं शूटिंग करता करता आजारी पडला. त्याला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. चेकअप केल्यावर त्याच्या ह्रदयात ब्लॉकेज असल्याचं निदान झालं. त्यानंतर डॉक्टरने बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सध्या सुनिलला हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आलं आहे. मात्र त्याला आरामाची गरज आहे. 

जॉन अब्राहमचा ऍक्शन थ्रिलर चित्रपट अटॅक 1 एप्रिलला प्रदर्शित होणार

07 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT