ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
सलमान खान पनवेलमध्ये चालवत आहे रिक्षा, चाहत्यांना बसला धक्का

सलमान खान पनवेलमध्ये चालवत आहे रिक्षा, चाहत्यांना बसला धक्का

बॉलीवूडचा दबंग सलमान खान त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो वेकेशनवर आहे. पनवेलमधील फार्म हाऊसवर तो बर्थ डे सेलिब्रेशनसाठी गेला होता. सलमानचा हा 56 वा वाढदिवस होता. बर्थ डे सेलिब्रेशनंतर नववर्षाच्या स्वागतासाठी तो काही दिवस फार्म हाऊसवर राहणार आहे. वाढदिवशी पनवेलमध्ये असताना त्याला साप चावल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. सलमान या अपघातातून बरा झाला नाही तोच त्याने आता पनवेलमध्ये नवा उपक्रम करून चाहत्यांना धक्का दिला आहे. सलमान खान पनवेलच्या रस्त्यावरून चक्क रिक्षा चालवताना दिसून आला. सलमानचा हा रिक्षावाला अवतार असा होता की चाहत्यांनी त्यांचा हॅंडसम रिक्षावाला सोशल मीडियावर व्हायरलच केला आहे.

बिग बॉस फेम सोनाली पाटील होतेय दिवसेंदिवस हिट

सलमान पनवेलमध्ये का चालवत आहे रिक्षा

सलमान सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. त्यामध्ये तो एक रिक्षा चालवत आहे. सलमानने साधे कपडेच घातले आहे. निळं शर्ट आणि शॉर्ट घालून तो चक्क रिक्षा चालवत पनवेलच्या रस्त्यावर उतरला. त्याच्या रिक्षात काही प्रवासी देखील दिसत होते. रिक्षात बसलेले प्रवासी त्याच्या ओळखीचे होते की अनोळखी याची माहिती मिळू शकली नाही. मात्र जेव्हा लोकांना समजलं की रिक्षा चालक चक्क अभिनेता सलमान खान आहे. तेव्हा लोकांना धक्काच बसला आणि त्यांनी सलमानचा व्हिडिओ तयार करण्यास सुरूवात केली. ज्यामुळे सध्या प्रत्येकाच्या मोबाईलवर सलमानच्या रिक्षावाला अवताराचीच चर्चा सुरू आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक दुसऱ्यांदा होणार आईबाबा

ADVERTISEMENT

सलमान पनवेलमध्ये घालवतो क्वालिटी टाईम

सलमान खानला नेहमीच त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर राहायला आवडतं. बऱ्याचदा तो तिथे त्याचे कुटुंबिय आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवतो. लॉकडाऊनमध्ये सलमान पनवेलच्या फार्म हाऊसवरच राहिला होता. तेव्हा घोड्यावरून सवारी करताना, ट्रॅक्टर चालवताना दिसून आला होता. आता मात्र सार्वजनिक रस्त्यावरून रिक्षा चालवत त्यांने चाहत्यांना थक्कच केलं आहे. चाहत्यांनी त्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहेच. शिवाय कंमेटचा अक्षरशः पाऊसच त्यावर पाडण्यास सुरूवात केली आहे. यावरून सलमानचे हटके छंद आणि सेलिब्रेटी असूनही सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहण्याची वृत्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

‘वन फोर थ्री’ चित्रपटातील खलनायक अनंता देतोय साऊथच्या खलनायकांना टशन

30 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT