बॉलीवूडचा भाईजान आणि त्याच्या वांद्रे येथील घराची त्याच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा असते. अभिनेता सलमान खान लहानपणापासून वांद्रे येथे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये त्याच्या कुटुंबासोबत राहतो. त्याच्या घराबाहेर शुभेच्छा देण्यासाठी नेहमीच चाहत्यांची गर्दी दिसून येते. ज्यामुळे सलमानचा हा पत्ता त्याच्या चाहत्यांच्या आता तोंडपाठ झाला आहे. मात्र आता लवकरच सलमान खानचा हा पत्ता बदलण्याची शक्यता आहे. सलमान खान आता त्याच्या नव्या घरात शिफ्ट होणार अशी चर्चा आहे. ज्यामुळे सलमान खानच्या नव्या घराबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत.
सलमान का घेतला ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ सोडण्याचा निर्णय
सलमान खान त्याच्या जन्मापासून ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’मध्ये राहतो आहे. या घराने त्याला बरंच काही दिलं आहे. ज्यामुळे सहाजिकच जुन्या घराची नाळ तोडून नव्या घरात गृहप्रवेश करणं सलमानसाठीदेखील नक्कीच सोपं नसणार आहे. मात्र त्याने हा निर्णय त्याच्या कुटुंबासाठी घेतला आहे. आजकालच्या विभक्त कुटुंबपद्धतीतदेखील सलमानने त्याच्या कुटुंबाला जोडून ठेवलं आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही तो त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र राहतो. पूर्वी सलमान खान त्याचे वडील सलीम खान, आई सलमा खान, हेलन, भाऊ अरबाज आणि सोहेल खान आणि त्यांची मुलं असे सगळेच या गॅलेक्सी अपार्टंमध्ये राहत होते. मात्र आता हे कुटुंब वाढत चालल्यामुळे त्यांना गॅलेक्सी अपार्टमेंटमधली जागा त्यांच्यासाठी सोयीची नाही. शिवाय सलमानच्या बहिणी आर्पिता आणि अलविरा आणि इतर नातेवाईक यांचं या घरात सतत येणं-जाणं असतं. प्रत्येक सणसमारंभ सर्व कुटुंब एकत्र येऊन साजरे करतात. ज्यामुळे सलमान खानला आता मोठ्या घराची गरज भासत आहे आणि म्हणूनच एक प्रशस्त घर कुटुंबियांसाठी बांधण्यासाठी सलमानने त्याच्या जुन्या घराला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सलमानचं जुनं घर त्याच्या फॅन्ससाठीदेखील खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सलमान आता गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार याचं त्यांना दुःख वाटत आहे. मात्र त्यासोबतच त्याच्या नव्या घराबाबत जाणून घेण्यासाठी ते तितकेच उत्सुकदेखील आहेत
सलमान खानचं नवं घर
सलमान खानच्या नव्या घराचं काम वांद्रे येथे चिंबई या भागात सुरू झालं आहे. सलमान खान काही दिवसांपासून वांद्रे येथील चिंबई भागात घराच्या साईटची पाहणी करताना दिसून येत आहे. बऱ्याच दिवसांपासून तो त्याच्या नव्या घरासाठी आणखी एखादी चांगली जागा शोधत होता. मात्र आता त्याने वांद्रेमध्येच त्याच्या नव्या बंगल्याच्या कामाला सुरूवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खानच्या आई-वडीलांनी या ठिकाणी 4,000 स्वेअर फिटची प्रॉपर्टी 2011 साली खरेदी केली होती. ज्याची किंमत अंदाजे 14.30 कोटी असण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणीच आता सलमान खानचं नवं घर उभारलं जाणार आहे.बीमएमसीला सलमानने या घराच्या बांधकामाचा आराखडा दिला आहे. बीमएमसीकडून हा आराखडा पास झाल्यानंतर त्याच्या नव्या घराच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. या ठिकाणी सलमान खान लवकरच सहा मजली बंगला उभारणार आहे. ज्यामध्ये विविध सुविधा असणार आहेत. या बंगल्यामध्ये तळमजल्यावर किचन, लिव्हिंग रूम आणि भव्य प्रवेशद्वार असेल. शिवाय वरच्या मजल्यांवर प्रत्येकी दोन बेडरूम असतील. ज्यामुळे सलमानच्या कुटुंबातील सर्व एकत्र राहू शकतील. या घराच्या बेसमेंटला कमीत कमी 16-18 गाड्या पार्क करता येतील अशी पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. अशा प्रकारे आधूनिक सुख सुविधांनी समृद्ध अशा या बंगल्यात सलमान आणि त्याचं कुटुंब लवकरच शिफ्ट होणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
Bigg Boss 13: बंद करण्याची मागणी, सलमानचा शो पुन्हा एकदा विवादात