Bigg Boss 13: बंद करण्याची मागणी, सलमानचा शो पुन्हा एकदा विवादात

Bigg Boss 13: बंद करण्याची मागणी, सलमानचा शो पुन्हा एकदा विवादात

Bigg Boss आणि विवाद हे समीकरण गेले कित्येक वर्ष चालू आहे. पण तरीही या शो चे अनेक चाहते आहेत. अगदी पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत न चुकता फॉलो करणारेदेखील बरेच आहेत. मात्र या सीझनमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यासाठी हा शो बंद करण्याची मागणी वाढू लागली आहे. सलमानचा शो पुन्हा एकदा विवादामध्ये सापडला आहे. सलमानही या ना त्या कारणाने विवादामध्ये फसत असतो. या सीझनमध्ये बेड फ्रेंड फॉरेव्हर या संकल्पनेमुळे सोशल मीडियावर हा शो बॅन करण्याची मागणी करण्यात येत आहे. ट्रेड असोसिएशननंतर आता करणी सेनेनेही सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून हा शो बंद करण्याची मागणी केली आहे.  आपल्या संस्कृतीविरोधातील अशा बऱ्याच गोष्टी या शो मध्ये दाखवण्यात येत असल्याचं या पत्राद्वारे सांगण्यात आलं आहे. हा शो नॅशनली दाखवण्यात येतो त्यामुळे अशा गोष्टी दाखवणं योग्य नाही असंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. 

दुसरं लग्न करून काही अभिनेत्रींना मिळाला आनंद तर काहींच्या नशीबी आलं दुःख

व्यापारी संगठनेनेदेखील केलं होतं अपील

बिग बॉस या शो विरोधात करणी सेनेपूर्वी व्यापार संगठन फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (कॅट) यांनीदेखील प्रकाश जावडेकर यांना या संदर्भात पत्र लिहून अपील केलं होतं. हा शो त्वरीत बंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या शो मध्ये अश्लीलता दाखवण्यात येत असून आपल्या कुटुंबासह बसून हा शो पाहता येत नाही असंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसंच बिग बॉसमध्ये दाखवण्यात येणाऱ्या दृष्यांमुळे देशामध्ये पारंपरिक आणि सांस्कृतिक मूल्यांना धक्का लागत आहे असंही यामध्ये सांगण्यात आलं आहे. हा शो सुरू होऊन केवळ दहा दिवस झाले आहेत. पण यामध्ये दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींमुळे सध्या अनेक संघटना याच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. इतकंच नाही या शो मुळे #unfollowsalman हा हॅशटॅगदेखील ट्रेंडिंग आहे. 

अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा करणार लग्न, केला व्हिडिओ शेअर

बिग बॉसने संपवला BFF टास्क

या सगळ्या विवादानंतर वास्तविक मंगळवारच्या भागामध्ये बिग बॉसने बेड फ्रेंड फॉरेव्हर हा टास्क संपवला होता. आता स्पर्धक आपल्याला हव्या त्या व्यक्तीबरोबर बेड शेअर करू शकतात असा आदेश बिग बॉसमध्ये देण्यात आला आहे. पण त्यानंतर ही परिस्थिती अधिक वेगळी झाली आहे. आता तर अजून सूट दिल्यासारखं वातावरण झाल्याची सध्या चर्चा आहे. या शो मध्ये काही अश्लील दृष्यं दाखवण्यात येत असल्याचं आणि ती दृष्यं आपण आपल्या कुटुंबासह बसून पाहू शकत नसल्याचं मत अनेक जणांनी सोशल मीडियावर मांडलं आहे. यावेळी सगळ्या गोष्टीची हद्द पार करण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे. तोंडाने भाजी पास करणं असो अथवा बेड शेअर करणं असो या सगळ्यातून अतिशय वाईट मेसेज समाजामध्ये पसरत असल्याचंही अनेक संघटनांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता पुढे बिग बॉस 13 मध्ये या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होणार आणि सध्या दाखवण्यात येत असलेली अश्लीलता थांबवण्यात येणार का? हा शो बंद करण्यात येणार का? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांंच्या मनात आहेत. कारण बिग बॉस शो चा चाहता वर्गदेखील मोठा आहे. त्यामुळे यामध्ये काही बदल करून नंतर त्याचं प्रक्षेपण करण्यात येणार का हे आता पाहावं लागेल.

तमन्नाला भेटस्वरूपात मिळाला जगातील मौल्यवान ‘हिरा’

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.