home / xSEO
Sambhaji Maharaj Quotes In Marathi

Chatrapati Sambhaji Maharaj Status And Quotes In Marathi 2022 | संभाजी महाराज स्टेटस आणि सुविचार मराठीतून

स्वराज रक्षक छत्रपती संभाजी राजे यांनी लहान वयातच मोठी किर्ती मिळवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे स्वराज रक्षणार्थ स्वतःच्या प्राणाचीही पर्वा न करणारे संभाजी राजे म्हणजे अवघ्या रयतेचे शंभूराजे… छत्रपती संभाजी महाराज एक पराक्रमी, धाडसी आणि शक्तिशाली योद्धा होते. त्यांनी एकूण 120 लढाया जिंकत पराक्रम गाजवला होता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे ते खरे उत्तराधिकारी होते. 16 जानेवारी 1681 मध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि शंभूराजे मराठा साम्राज्याचे ते दुसरे छत्रपती झाले. महाराष्ट्रात आजही संभाजी राजे यांची जयंती आणि राज्याभिषेक सोहळा थाटामाटात साजरा केला जातो. या निमित्ताने सर्व स्वराज्याच्या मावळ्यांना सोशल मीडियावर या दिवशी स्टेटस अपडेट करण्यासाठी आम्ही शेअर करत आहोत… छत्रपती संभाजी महाराज कोट्स (Chhatrapati Sambhaji Maharaj Quotes In Marathi), संभाजी महाराज स्टेटस (Sambhaji Maharaj Status In Marathi) आणि संभाजी महाराज राज्याभिषेक कोट्स मराठीतून (Sambhaji Maharaj Rajyabhishek Quotes In Marathi)

Shiv Jayanti Information In Marathi

Chatrapati Sambhaji Maharaj Status In Marathi | छत्रपती संभाजी महाराज स्टेटस मराठीतून

Chatrapati Sambhaji Maharaj Status In Marathi
Chatrapati Sambhaji Maharaj Status In Marathi

छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तुमच्या सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करण्यासाठी काही खास स्टेटस (Chatrapati Sambhaji Maharaj Status In Marathi)

1. जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते, पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता. स्वराज्याचं धाकले धनी शंभुराजे 

2. पाहुनी शौर्य तुझपुढे, मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला

3. कोंढाण्यासाठी तानाजी गेला, घोडखिंडीसाठी समोर बाजी आला, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी, स्वराज्य रक्षक संभाजी झाला

4. शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी, स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथे, असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा

5. हिमालयाएवढे शौर्य असलेले महापराक्रमी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन!

6. मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी  पंचारती तो फक्त राजा शंभाजी महाराज

7. सह्याद्रीच्या शुराचा जगती, गाजावाजा दरीदरीतून नाद गुंजला शिवशंभू राजा

8. जगाच्या इतिहासात एक पराक्रमी योद्धा, राजकारणीस साहित्यिक व रसिक असं मिश्रण एकाच राजाच्या नशिबी आलं ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे

9. जेव्हा कधी वाटलं ना, की आयुष्यात खूप दुःख आहे एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा, सारं दुःख हरून जाईल

10. उजळता सूर्याने पुरंदराचा माथा, सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा, काळजात जेव्हा अंधार दाटतो, शिव शंभुच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो

Shivaji Maharaj Books In Marathi

Chatrapati Sambhaji Maharaj Quotes In Marathi | छत्रपती संभाजी महाराज कोट्स मराठीतून

Chatrapati Sambhaji Maharaj Quotes In Marathi
Chatrapati Sambhaji Maharaj Quotes In Marathi

शंभूराजे हुशार आणि चाणक्ष्य होते, त्यांना संस्कृतसह अनेक भाषांचे ज्ञान अवगत होते. अशा या संभाजी महाराजांविषयी माहिती सांगणारे हे काही सुविचार (Chatrapati Sambhaji Maharaj Quotes In Marathi). तसंच तुम्ही शिवराजमुद्रा माहिती मराठीही वाचू शकता.

1. भाग्याच्या भरवशावर नाही तर, तलवारीच्या भरवशावर आम्ही भविष्य निर्माण करतो.

2. शुन्यातून स्वराज्य निर्माण करणे सहज शक्य तर नव्हतच, पण त्याहून कठीण होत ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं

3. ज्यांचं मस्तक फक्त मातृभूमीसाठी झुकतं, त्यांना कुठंच मस्तक झुकवावे लागत नाही.

4. सिंहाची चाल, गरूडाची नजर, स्त्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण

5. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा संभाजी छत्रपती

6. मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हा दिला, शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणूनी अमर झाला

7. राजे शंभाजी हे असं नाव आहे जे ऐकल्यावर अंगात शंभर हत्तीची शक्ती येते.

8. संघर्षातल्या दुनियेतले कधीही न आटणारे महासागर छत्रपती शिवशंभू

9. वाघाचा बछडा वाघासारखाच जगतो आणि वाघासारखाच मारतो…. तो वाघ म्हणजे छत्रपती शंभाजी महाराज

10. कतृत्व एवढं महान असावं, नुसता साज बघून स्वाभिमान जागा व्हावा.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि हार्दिक शुभेच्छा

Chatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Quotes In Marathi | छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक कोट्स मराठीतून

Chatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Quotes In Marathi
Chatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Quotes In Marathi

छत्रपती संभाजी राजांच्या राज्याभिषेकानिमित्त काही कोट्स आणि सुविचार (Chatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Quotes In Marathi) जे तुम्ही सोशल मीडियावर अपडेट करू शकता. 

1.जो आत्मविश्वास जागा करतो तो संभाजी, जो स्वतःला ओळखतो आणि मानवजातीच्या कल्याणाचा विचार करतो तो संभाजी

2. आम्हाला आमचं स्वराज्य आमच्या जीवापेक्षाही अधिक प्रिय आहे

3. प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुश्मनाचे सदा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म सईराणीच्या पोटी, हे संभाजी राजा प्रणाम तुजला जन्माोजन्मी कोटयान कोटी…

4. नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, असा मर्द मराठा राजा शिवराय एकला

5. पाठीवर शिवाजी आणि छाताडावर संभाजी कोरलाय, अन जीवाचं नाव भंडारा ठेवलंय, उधळला तरी येळकोट आणि नाय उधळला तरी बी येळकोटच…!

6. सह्याद्रीच्या उरात खदखदणारा ज्वालामुखी, लाखात एक असे लाख मोलाचे अमुल्य शिवरत्न म्हणजे… छत्रपती संभाजी महाराज

7. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून, जनतेकडे मायेने हात फिरवणारे ते आपले संभाजी राजे होते

8. हदा दिशांनी दहा संकटे आली, कोणी उरला नाही वाली, तरिही तो लढला, असं असताना त्याने चार ग्रंथ लिहीले, अनेक भाषा शिकला, ज्ञान मिळवले… जय शंभूराजे

9. ज्याने मैत्री अशी केली की मित्राने ज्याच्यासाठी जीव दिला, शत्रूत्व असे केले की वैरी वेडा होऊन मेला, कतृत्व असे केले की सूर्य चंद्र संपतील पण हा सह्याद्रीचा सूर्य अखंड तळपतच राहिल… जय शंभूराजे!

10. पौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय!!!

Chatrapati Sambhaji Maharaj Status For Whatsapp In Marathi | छत्रपती संभाजी महाराज व्हॉटसअप स्टेट्स

Chatrapati Sambhaji Maharaj Status For Whatsapp In Marathi
Chatrapati Sambhaji Maharaj Status For Whatsapp In Marathi

शिवराय आणि शंभूराजांवर मनापासून प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व मावळ्यांसाठी हे काही व्हॉटसअप स्टेटस (Chatrapati Sambhaji Maharaj Status For Whatsapp In Marathi).

1. महत प्रतापी शिवरायांचा शूरवीर छावा, वंदन करितो बलिदानाला जय शंभूराया

2. शिवाजी महाराज म्हणजे पहिले संभाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हणजे दुसरे शिवाजी महाराज

3. अरे!!! जबान काढली त्याची बोटं ही छाटली, मरण पावले ज्याने माझा देव तो संभाजी, अहो लाख केली बदनामी तुम्ही पण त्याच्या सारखा स्वराजसेवक नव्हता कोणी…

4. वीर योद्धा, कुशल सेनापती, पराक्रमी संभाजी, अलौकिक महापराक्रमी शूरवीर योद्धा संभाजी

5. मृत्युसमोर असूनही ज्याची झुकली नाही मान, धर्मवीर छावा ऐसा स्वतःच एक शौर्यगान, भय नाही कशाचेच दरबार कुणाचाही असो, राज्य आपलेच हीच आपली शान… ए भगव्या मावळ्या ठेव संस्काराची जाण

6. शिवबाचा पुत्र तू, रयतेचा जीव तू, स्वराज्याचा सूर्य तू , मुघलांचा काळ तू, तळपते तेज तू, पेटता अंगार तू, उसळते रक्त तू, संस्कारांची खाण तू, माझा संभाजी राजा

7. मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हा दिला, शिवरायांचा शंभू छावा. राजा म्हणूनी अमर जाहला

8. मृत्यूला मारण्याचा होता कावा, हे धाडस बाळणारा फक्त तोच एक छावा

9. ज्यांच्या पराक्रमाची उंची आभाळ ही मोजू शकत नाही, ज्याच्या ज्ञानाचे गोडवे गाण्यास पोवाडेही कमी पडावे असे आमचे शंभूराजे

10. टाप नाय कुणाची नजरेला नजर द्यायची, हिंमत नाय केली त्यांच्या समोर आडवं जायची, ताकद नव्हती कुणात सर्जाला हरवायची, तो अंजिक्य होता, अंजिक्यच राहिला… जय शंभू राजे

Chatrapati Sambhaji Raje Messages In Marathi | छत्रपती संभाजी राजे मेसेज

Chatrapati Sambhaji Raje Messages In Marathi
Chatrapati Sambhaji Raje Messages In Marathi

छत्रपती संभाजी राजांविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी तुमच्या मित्रपरिवाराला पाठवा हे काही खास मेसेज (Chatrapati Sambhaji Raje Messages In Marathi).

1.उभ्या आयुष्यात फक्त एकच ध्यास असू दे, हातात भगवा आणि काळजात शंभू राजे

2. संभाजी जयंती हा फक्त उत्सवच नाही तर संभाजीकडून त्याच्यासारखे होण्याची प्रेरणा देणारा आर्शीवाद आहे

3. माता तुळजापूरची झाली, पावन तुझ्या रक्ताने, ते साखळदंड झालेत, धन्य तुझ्या स्पर्शाने, पाहुनी शौर्य तुज पुढे, मृत्युही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभूराजा अमर झाला.

4. असे स्थान जिथे, जीवनात हरलेल्याला, झुंजण्याची ताकद मिळते ती म्हणजे….माझ्या राजाचे चरण

5. नियतीने एकदा माझ्या राजाला सोडवलं असतं तर औरंगजेब हे नाव इतिहासाच्या पानामधून गायब झालं असतं

6. उजळला सूर्याने, पुरंदराचा माथा, सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा, काळजात जेव्हा अंधार दाटतो, शंभू इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो!!!

7. झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा, ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्मावा…

8. ताठ होती माना, उंच होती नजरा, रयतेच्या राजाला मानाचा मुजरा

28 Mar 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text