Advertisement

भविष्य

प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या असतात वृश्चिक राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या

Dipali NaphadeDipali Naphade  |  Apr 3, 2021
प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या असतात वृश्चिक राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या

Advertisement

वृश्चिक (Scorpio) राशीच्या व्यक्तींचा जन्म महिना 23 ऑक्टोबरपासून ते 21 नोव्हेंबरपर्यंत समजला जातो. या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या व्यक्तींना खूपच रहस्यमयी असल्याचे मानले जाते. यांच्या मनाचा थांगपत्ता लागणं कठीण असतं. या महिन्यात जन्म घेणाऱ्या आणि वृश्चिक राशीच्या व्यक्ती या अत्यंत प्रभावशाली असतात. या व्यक्ती जिथे जिथे जातात तिथे तिथे आपली छाप सोडून येतात. मात्र या व्यक्तींना मेहनत केल्याशिवाय कधीही फळ मिळत नाही. कोणतीही गोष्ट सहजपणाने प्राप्त या व्यक्तींना होत नाही. पण जेव्हा या व्यक्तींना यश मिळते तेव्हा त्यांच्या यशाचा हेवा वाटावा असं यश त्यांना प्राप्त होतं. तुमच्या जवळच्या व्यक्तीपैकी कोणाची रास वृश्चिक असेल तर नक्की त्यांना टॅग करा. 

सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास असतो भारी, जाणून घ्या स्वभाव

वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव (Scorpio sign people Positive and Negative Characteristics in Marathi)

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म योग्य वेळी, तारखेला आणि वर्षात होत असतो. प्रत्येक महिन्यात जन्म घेणारी व्यक्ती ही वेगळ्या राशीची असते. जन्मदिवसानुसार त्या त्या व्यक्तीची रास, त्याचा स्वभाव, त्याचे गुण ठरतात. यावेळी आपण वृश्चिक राशीच्या (Scorpio) व्यक्तींच्या बाबतीत अधिक माहिती जाणून घेऊया. 

 • आयुष्यात या व्यक्तींना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. प्रतिभा, पैसा आणि भाग्य यांची साथ देते.
 • करिअरपासून ते अगदी नात्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत पॅशनशिवाय या व्यक्ती कामच करत नाहीत. यांच्यामध्ये असणारी ही पॅशनच त्यांना अपयश पचवायला मदत करते आणि अपयश मिळूनही यश मिळेपर्यंत या व्यक्ती प्रयत्न करत राहतात. 
 • राशी चक्रामध्ये ही राशी सर्वात जास्त रहस्यमयी म्हणून ओळखली जाते. या व्यक्ती अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या असतात. आपल्या व्यक्तिमत्वाने कोणालाही या व्यक्ती सहज आकर्षित करू शकतात. आपल्या स्वभावाने आणि व्यक्तीमत्वाने या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात आपली छाप सोडून येतात. 
 • जोडीदाराची प्रत्येक लहान – मोठी इच्छा पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे असंच यांना वाटते आणि त्याबदल्यात त्यांना जोडीदाराच्या प्रेमाशिवाय कोणतीही अपेक्षाही नसते. प्रेम या व्यक्तींसाठी केवळ एक भावना नाही तर एक पॅशन आणि जबाबदारी आहे. पण प्रेम न मिळाल्यास, या व्यक्ती अत्यंत दुखावल्या जातात. 
 • तुम्ही या व्यक्तींचा विश्वास जिंकलात तर या व्यक्ती कधीही तुम्हाला दूर करत नाहीत. एखाद्या व्यक्तीसाठी कायम उभं राहणं आणि अगदी मनापासून प्रेम करणं आणि सतत पाठिंबा देणं हे या व्यक्तींचे वैशिष्ट्य आहे. प्रेमासाठी कोणत्याही थराला जाण्याची यांच्यामध्ये हिंमत असते. 

तूळ राशीच्या व्यक्ती असतात राजकारणात माहीर, कसा असतो स्वभाव

 • परफेक्ट मॅचबद्दल सांगायचे झाले तर वृषभ आणि वृश्चिक या दोन्ही राशी योग्य मॅच आहेत. यांचे नाते हे अत्यंत मजबूत आणि नजर लागावे असे असते. दोन्ही राशींमध्ये काही ना काही कमतरता आहेत. पण या दोन्ही राशी एकमेकांसह या कमतरतांची उणीव भरून काढतात. दोघांचा स्वभाव भिन्न असूनही या राशींच्या व्यक्ती एकमेकांसह अप्रतिम संसार करतात. कारण एक आगीप्रमाणे काम करते तर एक पाण्याप्रमाणे. 
 • या राशीचे जोडीदार आपले प्रेम मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आपले प्रत्येक काम योग्य असावे आणि ते व्यवस्थितच पार पडायला हवे याचा कायम प्रयत्न या व्यक्ती करतात. तसंच आपल्या जोडीदाराकडूनही त्यांची हीच अपेक्षा असते. कोणीही काहीही बोललं तरीही या व्यक्तींना फरक पडत नाही. पण जर जवळच्या व्यक्तींपैकी कोणी मन दुखावलं तर मात्र यांचा स्वतःवर ताबा राहत नाही. आपल्या व्यक्तींकडून झालेला अपमान सहन करण्याची ताकद यांच्यामध्ये नसते. 
 • वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये कामाच्या बाबतीत अत्यंत संयम असतो. तसंच कोणत्याही गोष्टीत कितीही वेळा अपयश आले तरीही न डगमगता पुन्हा त्याच जिद्दीने या व्यक्ती ती गोष्ट मिळविण्याचा प्रयत्न करतात. गोष्टी मिळेपर्यंत सतत प्रयत्न करत राहणं हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांना कोणत्याही गोष्टी सहजासहजी मिळत नाहीत. त्यासाठी लागणारी मेहनत करायची  त्यांची तयारी असते. मेहनतीशिवाय कधीच या व्यक्तींना फळ मिळत नाही. 
 • करिअरबाबत सांगायचे झाले तर या व्यक्ती आत्मप्रेरित असतात आणि त्यांना आयुष्यात नक्की काय करायचे आहे ते मनात स्पष्ट असते. करिअर असो अथवा उद्योगधंदा असो एकदा त्यामध्ये उडी घातली की, ती पूर्णत्वाला नेणे हा एकमेवे उद्देश असतो. बऱ्याचदा या महिन्यात जन्माला येणाऱ्या व्यक्ती या संवेदनशील लेखक, पोलीस, पत्रकार, कलाकार अथवा डिटेक्टिव्ह हा व्यवसाय निवडतात. 
 • भूतकाळात घडलेल्या गोष्टींशी यांचे अतूट नाते असते. आपल्या प्रत्येक पहिल्या गोष्टीबाबत या व्यक्ती अत्यंत हळव्या असतात आणि त्या गोष्टी जपून ठेवतात. या व्यक्तींची इंट्यूशन पॉवर अफलातून असते. पुढे होणाऱ्या घटनांबाबत यांना बऱ्याचदा आधीच कल्पना आलेली असते. तसंच लोकांचा चेहरा वाचण्यात आणि लोकांचा स्वभाव जाणून घेण्यात या व्यक्ती तरबेज असतात. चेहरा पाहून समोरची व्यक्ती कशी असू शकते याचा अचूक अंदाज या व्यक्ती लावतात. 
 • आपल्या अप्रतिम व्यक्तित्वासाठी या व्यक्ती ओळखल्या जातात. यांचा सेन्स ऑफ ह्यूमर अफलातून असतो आणि कोणतीही परिस्थिती अतिशय व्यवस्थित हाताळतात. या व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा वेगळ्या असतात आणि त्यामुळेच सर्वांना प्रिय असतात. या व्यक्ती इतक्या वेगळ्या असतात की, त्यांच्यासारखी दुसरी व्यक्ती मिळणं कठीण असतं. जगापेक्षा वेगळाच विचार करण्याची ताकद या व्यक्तींमध्ये असते. 
 • विशेषतः वृश्चिक राशीच्या मुलींचे डोळे आणि व्यक्तिमत्व हे अधिक आकर्षक असते. या दिसायला जास्त सुंदर नसतीलही पण तरीही आपल्या स्वभावाने इतरांना पटकन आकर्षिक करून घेणाऱ्या असतात. 

भाग्यशाली क्रमांक – 1,3,7
भाग्यशाली रंग –  मरून, नारिंगी आणि गुलाबी
भाग्यशाली दिवस – गुरूवार आणि मंगळवार
भाग्यशाली खडा – पोवळं 

वृश्चिक राशीचे बॉलीवूड स्टार्स – शाहरुख खान, ऐश्वर्या राय, यामी गौतम, जूही चावला, तब्बू, सुष्मिता सेन, तुषार कपूर, आदित्य राय कपूर, कमल हसन, आथिया शेट्टी

वृश्चिक राशीचे मराठी कलाकार – सुबोध भावे, भाग्यश्री लिमये, अमेय वाघ

अतिशय संवेदनशील असतात कन्या राशीच्या व्यक्ती, कसा आहे स्वभाव जाणून घ्या

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक