ADVERTISEMENT
home / Fitness
सावधान! सतत एका जागी बसून वाढतंय ढुंगण आणि मांड्यांवरील फॅट

सावधान! सतत एका जागी बसून वाढतंय ढुंगण आणि मांड्यांवरील फॅट

सध्याच्या वर्क फ्रॉम होममुळे तुम्हीही सतत एकाच जागी बसून काम करत असाल आणि फिटनेसकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष केले असेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या शरीरात बदल जाणवत असतील. तुमच्या ढुंगणाकडील भाग हा वाढू लागला आहे का? तुमच्या मांड्यावर सेल्युलाईट दसू लागले आहेत? तुमच्या जीन्स पँट तुम्हाला मांड्याकडे घट्ट होऊ लागल्या असतील तर तुम्हाला वेळीच हे आवरण्याची गरज आहे. जर तुम्ही आता याकडे दुर्लक्ष केले तर पुढे जाऊन तुम्हाला याचा त्रास अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच तुम्ही याकडे लक्ष देण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

लिक्विड डाएटच्या मदतीने महिन्याभरात करा वजन कमी

जेवताना तरी उठा
जर तुम्ही जाड होत आहात हे तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला थोडासा व्यायाम करणे हे गरजेचे आहे पण कामाच्या नादात खूप जणांना उठण्याचा इतका कंटाळा असतो की, ते जेवायलाही उठत नाही. आहेत त्या जागी बसूनच जेवतात आणि पुन्हा तसेच कामाला बसतात. पण असे बसणेच हे त्रासदायक ठरते. त्यामुळे अपचनाचा त्रास तर होतोच. पण स्थुलता देखील येते. जर तुम्ही जेवायलाही उठत नसाल. जेवल्यानंतर चालत नसाल तर तुम्हाला तुमच्या शरीराला जडत्व आलेले नक्की जाणवेल. हे जडत्व तुम्हाला स्थुलतेकडे घेऊन जाते. त्यामुळे तुम्ही या गोष्टींची अगदी आवर्जून काळजी घ्या. 

 घ्या ब्रेक
ब्रेक हा कोणत्याही कामातून घेणे फार महत्वाचे असते.  सतत लॅपटॉपवर काम करताना आपण शरीराला ब्रेक हवा हे देखील विसरुन जातो. पण असे विसरुन चालत नाही. तुम्ही मध्ये मध्ये ब्रेक घ्यायला हवा. अगदी 5 मिनिटांचा ब्रेक ही तुमच्या शरीरासाठी आणि अवयवासाठी पुरेसा आहे. त्यामुळे शक्य असेल तेव्हा ब्रेक घ्या. म्हणजे तुम्हाला थोडासा आराम नक्कीच मिळेल. शिवाय शरीरही वाढणार नाही. उठून थोडेसे चाला. शक्य असेल तर स्कॉट मारा. त्यामुळे तुमच्या मांड्या आणि ढुंगणाचा व्यायाम अगदी नीट होतो. थोडासा का असेना तुम्हाला फरक पडल्यासारखे नक्की वाटेल.

ADVERTISEMENT

वजन वाढवायचे असेल तर जाणून घ्या वजन वाढवण्यासाठी फळं (Weight Gaining Fruits In Marathi)

वज्रासनात बसा
वज्रासन हे आसन सगळ्या आसनांमध्ये सोपे असे आसन वाटत असले तरी देखील हे आसन म्हणावे तितके सोपे नाही. कारण हे आसन करताना तुम्हाला घोटांवर बसायचे असते. पचनासाठी हे आसन फारच चांगले आहे. अधूनमधून खाली बसत असाल तर तुम्ही वज्रासनात बसा शक्य तेवढे वेळ अशा आसनात बसाल तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे शक्य असेल तेव्हा वज्रासनात बसा तुम्हाला फायदा होईल. 

पाय स्ट्रेच करा 

पायांचे स्ट्रेचिंग हे नेहमीच चांगले. जर बसून बसून तुमच्या पायांना मुंग्या आल्या असतील तर तुम्ही पायाचे स्ट्रेचिंग करायला विसरु नका. पायांचे स्ट्रेचिंग करणे हे फार चांगले त्यामुळे शक्य असेल तेव्हा तुम्ही मस्त स्ट्रेच करा. काही स्ट्रेचिंगच्या प्रकारानेही तुम्हाला नक्कीच बरे वाटू शकते. बसूनही काही सोप्या स्ट्रेचिंग करु शकता. 

ADVERTISEMENT

आता घरी राहून तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या म्हणजे तुम्हाला नक्कीच फिट राहण्यास मदत मिळेल.

आहारात गव्हाचा समावेश करुनही कसं कमी करावं वजन

04 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT