ADVERTISEMENT
home / Diet
वजन वाढवायचे असेल तर जाणून घ्या वजन वाढवण्यासाठी फळं (Weight Gaining Fruits In Marathi)

वजन वाढवायचे असेल तर जाणून घ्या वजन वाढवण्यासाठी फळं (Weight Gaining Fruits In Marathi)

वजन कमी करणे या संदर्भातील अनेक चर्चा आणि टीप्स तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील. योग्य पद्धतीने वजन कमी करण्याचे अनेक व्हिडिओही पाहिले असतील. पण अशी ही काही लोक असतात त्यांचे शरीर त्यांच्या उंचीच्या तुलनेत फारच कृश असते. अशा व्यक्तींकडे पाहिल्यानंतर जाड व्यक्तींनाही अजिबात त्यांच्या इतके बारीक व्हावे असे वाटणार नाही. तुमचीही प्रकृती तुमचे वय, उंची याच्या तुलनेत फारच कृश असेल आणि तुम्हालाही तुमची पर्सनॅलिटी योग्य पद्धतीने भरगच्च आणि छान करायची असेल म्हणजेच तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. पण आज आम्ही तुम्हाला कोणताही कठिण असा डाएट सांगणार नाही. तर फळांच्या सेवनाने तुमचे वजन कसे वाढेल हे सांगणार आहोत. मग सुरुवात करुया आज जाणून घेऊया वजन वाढविण्यासाठी फळं.

आंबा (Mango)

आंबा - Weight Gaining Fruits In Marathi

Instagram

ADVERTISEMENT

फळांचा राजा म्हणून ‘आंबा’ ओळखला जातो. साधारण एप्रिल महिना सुरु झाला की, बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे दिसू लागतात. आंबा हे बलवर्धक फळ म्हणून ओळखले जाते. या सीझनमध्ये तुम्हाला एनर्जीचा पुरेपूर साठा आंब्यातून मिळू शकतो. शिवाय यामध्ये असलेली साखर आणि इतर घटक तुमचे वजन नैसर्गिकपद्धतीने वाढण्यास मदत मिळते. आंब्यामध्ये हापूस, केशर, पायरी, बदामी, लंगडा, दशहेरी, तोतापूरी, रायवळ असे बरेच प्रकार असतात. त्यापैकी तुम्हाला जो आंबा आवडतो तुम्ही त्याचे सेवन करु शकता. प्रत्येकामध्ये कॅलरीजचे प्रमाण वेगळे असले तरी त्यांच्यामुळे वजन वाढण्यास मदत होऊ शकते. 

*पोषकतत्व (Nutritional value): साधारण 100 ग्रॅम आंब्यामध्ये 60 कॅलरीज असतात. यामध्ये व्हिटॅमिन A, B-6,C,D असते. याशिवाया यामध्ये कॅल्शियम, लोहदेखील असते. याची जमेची बाजू म्हणजे यामध्ये तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास होऊ शकत नाही. पण मधुमेहींनी आंबा खाताना तो थोडा जपून खायला हवा.

*खाण्याची योग्य वेळ (Best time to eat) : फळ खाण्याची तशी कोणतीही वेळ नसते. तुम्ही अगदी कोणत्याही वेळी फळं खाऊ शकता. पण रात्रीच्या जेवणानंतर फळ खाणं टाळा कारण ती पचायला जड जातात. विशेषत: आंब्यासारखे फळ तुम्ही रात्री खाल तर तुम्हाला तुमचे पोट जड वाटेल. त्यामुळे जर तुम्ही आंबा खायचा विचार करत असाल तर तो सकाळच्या नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या जेवणाच्या वेळी खा.

संध्याकाळी कधीही खाऊ नका हे पदार्थ नाहीतर वाढेल वजन

ADVERTISEMENT

केळी (Banana)

केळ्यांमुळे वाढू शकते वजन

Instagram

बारमाही आणि स्वस्त अशा फळांमध्ये ज्याची गणना होते ते म्हणजे केळं. अगदी कोणत्याही सीझनमध्ये तुम्हाला हे फळ मिळणारचं. खिशाला परवडणाऱ्या या फळाचा महिमा सांगावा तेवढा कमीच आहे. तुम्ही जीमला जात असाल डाएट करत असाल तर तुम्हाला केळी खाण्याचे फायदे कळतील. केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण खूप असते. ज्यांना वजन वाढवायचे असेल त्यांना अगदी हमखास केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. केळ्यामध्ये इतरही आवश्यक घटक असतात जे तुमच्या शरीरासाठी फारच उपयुक्त असता. 

ADVERTISEMENT

*पोषकतत्व (Nutritional value): केळ्यामध्ये डाएटरी फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन A  असते.यामध्ये पोटॅशिअम आणि कार्बोदकाचे प्रमाण जास्त असते. साधारण 100 ग्रॅम केळ्यामध्ये 10 टक्के पोटॅशिअम आणि 7 टक्क्यांइतकी कार्बोदके असतात. 

*खाण्याची योग्य वेळ (Best time to eat) : केळ कधी खावे यापेक्षा वजन वाढवू इच्छिणाऱ्यांनी ते कसे खावे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. वजनवाढीसाठी तुम्ही केळ्याचे सेवन करत असाल तर तुम्ही केळ्याचा मिल्कशेक करुन प्या. जर तुम्हाला सकाळी आणि अरबटचरबट खाण्याची वेळी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मिल्कशेक पिऊ शकता. 

सालीसकट सफरचंद खाल्ल्याने होते वजन कमी, जाणून घ्या फायदे

ADVERTISEMENT

नारळ पाणी (Tender Coconut)

नारळ पाणी

Instagram

अनेक गोष्टींसाठी नारळपाणी हे फारच उपयुक्त असते. जर तुम्ही वजन वाढविण्याचा विचार करत असाल तर नारळपाणी तुमच्यासाठी चांगले आहे. नारळ पाणी आणि त्यामध्ये असलेली नारळाची मलई तुमचे वजन योग्य पद्धतीने वाढवण्यासाठी तुमची मदत करते. नुसते नारळाचे पाणी जर तुम्ही पीत असाल तर वजनवाढीसाठी तुम्हाला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. नारळपाण्यामधील वजन वाढीसाठी असलेला महत्वाचा घटक म्हणजे नारळातील खोबरे 

*पोषकतत्व (Nutritional value): नारळपाण्यामधील पोषकतत्वाचा विचार केला तर नारळाच्या पाण्यामध्ये मिनरल्स, मॅग्नीझ, सेल्यिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम आणि आर्यन असते. नारळाच्या खोबऱ्यामध्ये कॅलरीज भरपूर असतात जे तुम्हाला वजन वाढवायला मदत करते. 

ADVERTISEMENT

*खाण्याची योग्य वेळ (Best time to eat) : नारळ पाणी तुम्ही कधीही पिऊ शकता. वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही फक्त नारळपाणी प्यायला हवे. पण जर तुम्ही वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर मात्र तुम्ही नारळाची मलई खायला हवी. जर तुम्ही दिवसातून दोन नारळपाणी प्याल तरी ते तुमच्यासाठी पुरेसे आहे.

अवाकाडो (Avocados)

अवाकाडो - Weight Gaining Fruits In Marathi

Instagram

ADVERTISEMENT

अवाकाडो हे भारतात शेती केले जाणारे फळ नाही. हल्ली मात्र हे मोठ्या प्रमाणात भारतात मिळते. सूपरफुड्समध्ये अवाकाडोचा समावेश होतो. अवाकाडोला स्वत:शी अशी चव नसते. पण त्याचा उपयोग वजन कमी करणे आणि वजन वाढवणे दोन्हीसाठी केला जातो. अवाकाडोमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. ज्याचा उपयोग तुम्हाला वजन वाढविण्यासाठी होतो. एका शोधामध्ये असे समोर आले आहे की, अवाकाडोमध्ये वजन वाढविण्यासची क्षमता अधिक असते. याच्या अधिक सेवनामुळे तुमचे वजन वाढू शकते

*पोषकतत्व (Nutritional value): अवाकाडोमध्ये पोटॅशिअम, कार्बोहायड्रेट,सोडियम, व्हिटॅमिन A,C,B-6, मॅग्नेशिअम असते. 

*खाण्याची योग्य वेळ (Best time to eat) : अवाकाडो हे सलाद आणि त्याचा उपयोग डिप म्हणून अधिक केला जातो. त्यामुळे जर तुम्हाला अवाकाडो खायचे असेल तर तुम्ही जेवणाला किंवा स्नॅकमध्ये ते खाऊ शकता. 

एकाच ठिकाणी बसून काम करणं आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक

ADVERTISEMENT

सुके जर्दाळू (Dried Apricot)

सुके जर्दाळू

Instagram

साधारण थंडी सुरू झाली की बाजारात जर्दाळूची फळे मिळतात. ही फळं बाराही महिने उपलब्ध नसली तरी वर्षभर सुके जर्दाळू मिळतात. जर्दाळूच्या सेवनामुळे वजन वाढवण्यास मदत मिळते. त्यामुळे जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्ही सुके जर्दाळू खाऊ शकता.पण तुम्ही योग्य पद्धतीने जर्दाळूचे सेवन करायला हवे. वजन वाढविणाऱ्या फळांमध्ये सुके जर्दाळूचा समावेश आहे. 

ADVERTISEMENT

*पोषकतत्व (Nutritional value):  जर्दाळूमध्ये फॅट आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्याचा उपयोग तुम्हाला वजन वाढवण्यासाठी होतो. जर्दाळूमध्ये सोडिअम, पोटॅशिअम, व्हिटॅमि A,C,B-6, मॅग्नेशीअम असते. त्यामुळे वजनवाढीसोबतच तुम्हाला इतरही फायदे जर्दाळूच्या सेवनामुळे मिळतात. 

*खाण्याची योग्य वेळ (Best time to eat) : सुके जर्दाळू म्हणजे डायफ्रुटचा एक प्रकार आहे. तुम्ही ड्रायफ्रुटप्रमाणे त्याचे सेवन करु शकता. एकावेळी किमान दोन ते तीन जर्दाळूची फळे खायला काहीच हरकत नाही.

अंजीर (Fig)

अंजीर

ADVERTISEMENT

Instagram

अंजीर हे फळ आणि ड्रायफ्रुट अशा दोन्ही प्रकारामध्ये मिळते. सुके आणि ओले अंजीर वजन वाढीसाठी चांगले असतात. सुके अंजीर वजन वाढीसाठी चांगले असते. म्हणून अनेकदा वजनवाढीसाठी अंजीर खाण्याचा सल्ला दिला जातो. अंजीर खाण्याचे अजूनही खूप फायदे आहेत  

*पोषकतत्व (Nutritional value): अंजीरमध्ये मोठ्याप्रमाणात कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. तसेच याच्यामध्ये पोटॅशिअमही खूप असते. याच्या खाण्यामुळे तुमचे वजन अगदी योग्य पद्धतीने वाढते.

*खाण्याची योग्य वेळ (Best time to eat) : अंजीर खाण्याची योग्य अशी वेळ नाही. तुम्ही कधीही अंजीर खाऊ शकता. एकावेळी साधारण दोन ते तीन अंजीर खायला काहीच हरकत नाही.

ADVERTISEMENT

काळे मनुके (Black Currents)

काळे मनुके

Instagram

वजन वाढविण्यासाठी काळे मनुके चांगला पर्याय आहे. तुम्ही वजन कमी करत असाल किंवा वजन वाढवत असाल तरी देखील तुम्हाला काळ्या मनुकांचे सेवन करायला सांगितले जाते. तुम्हालाही योग्य पद्धतीने वजन वाढवायचे असेल तर तुम्ही काळ्या मनुक्यांचे सेवन करु शकता. 

*पोषकतत्व (Nutritional value): काळ्या मनुक्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असते. यामध्ये असलेले फॅट तुमचे वजन वाढवण्यास मदत करते. काळ्या मनुक्यामध्ये 82 टक्के पाणी असते. 15 टक्के कार्बोदके असतात. त्यामुळे तुमचे पोट भरल्यासारखे वाटते.

ADVERTISEMENT

*खाण्याची योग्य वेळ (Best time to eat): काळे मनुके खाण्याची वेळ अशी नाही. पण तुम्ही सकाळी नाशत्यानंतर किंवा संध्याकाळी स्नॅक्सच्या वेळेत काळे मनुके खाऊ शकता. तुम्ही एखाद्या शेकमध्येही हे घालून पिऊ शकता.

मनुके (Raisins)

मनुकेही आहेत फायदेशीर

Instagram

ADVERTISEMENT

द्राक्ष सुकल्यानंतर त्याचे मनुके तयार होतात. मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते. मनुकामधील कॅलरी आपल्याला वजन वाढविण्यात मदत करतात.. वेगवेगळ्या द्राक्षांप्रमाणे त्यातील कॅलरीजचे वर खाली होते. पण त्यातून तुम्हाला वजन वाढायला होते.

*पोषकतत्व (Nutritional value): साधारण 100 ग्रॅम मनुक्यांमध्ये 299 कॅलरीज असतात. त्यामध्ये साखर 59 ग्रॅम इतकी असते. त्यामुळे तुम्हाला वजन वाढवायला मिळते. मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन C, B-6 आणि मॅग्नेशीअम असते.

 *खाण्याची योग्य वेळ (Best time to eat) : तुम्हाला काही गोड खाण्याची इच्छा होत असेल अशावेळी तुम्ही मनुके खाऊ सकता. मनुके चावून आणि व्यवस्थित खायला हवे.कारण ते योग्य पद्धतीने खाल्ले नाही तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. 

स्ट्रॉबेरीज (Strawberries)

स्ट्रॉबेरीज

ADVERTISEMENT

Instagram

आंबट-गोड स्ट्रॉबेरीज तुमचेही आवडीचे फळ असेल तर थोडं सावकाश कारण जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर स्ट्रॉबेरीजच्या अतीसेवनामुळे तुमचे वजन वाढू शकते. योग्य पद्धतीने वजन वाढवायचे असेल तर मात्र तुम्ही अगदी हमखास आणि बिनधास्त स्ट्रॉबेरीज खायला हवी. नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरीज मदत करतात.

*पोषकतत्व (Nutritional value): स्ट्रॉबेरीजमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट असतात. यामध्ये पोटॅशिअम आणि फायबर असते. त्यामुळे तुमचे पोट भरते. यामध्ये असलेली साखर आणि इतर पोषक घटक तुमचे वजन वाढविण्यास मदत करते. 

*खाण्याची योग्य वेळ (Best time to eat): स्ट्रॉबेरीज तुम्हाला नुसत्या खायला आवडत नसतील तर तुम्ही स्ट्रॉबेरीपासून मिल्कशेक किंवा सलाद करुन खाऊ शकता. एक ग्लासभर मिल्कशेक तुमच्या वजनवाढीसाठी पुरेसा आहे. त्यामुळे दिवसातून एकदा तरी मिल्कशेक किंवा बाऊलभर सलाद खा. 

ADVERTISEMENT

सफरचंद (Apples)

सफरचंद

Instagram

इट अॅपल अ डे किप डॉक्टर अ वे असे म्हटले जाते. ते अगदी खरे आहे. सफरचंद तुमच्या शरीरासाठी नक्कीच चांगले आहे. पण तुम्हाला वजन वाढवायचे असेल तरीही तुमच्यासाठी सफरचंद एकदम चांगला पर्याय आहे. सफरचंदामध्ये कॅलरीज जास्त नसतात. पण ते पचण्यास इतर फळांच्या तुलनेत थोडे कठिण असते. पण तुम्ही एक मध्यम आकाराचे सफरचंद खाल्य्यानंतर तुम्हाला नक्कीच जाणवेल की, तुमच्या वजनात वाढ होते. 

*पोषकतत्व (Nutritional value): एका मध्यम आकाराच्या सफरचंदामध्ये साधारण 95 कॅलरीज असतात. यामध्ये फॅट अजिबात नसते. त्यामुळे तुमच्या शरीरातील फॅट वाढत नाही तर तुमचे वजन वाढते. 

ADVERTISEMENT

*खाण्याची योग्य वेळ (Best time to eat) : सफरचंद तुम्ही अगदी कोणत्याही वेळी कोणत्याही स्वरुपात खाऊ शकता. पण रात्रीच्या वेळी सफरचंद खाऊ नका. तुम्ही मॉर्निग स्नॅक किंवा संध्याकाळच्या भुकेच्या वेळी सफरचंद खा. तुम्हाला महिन्याभरात फरक जाणवेल

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ)

पटकन वजन वाढविण्यासाठी फळ कशी मदत करतात? 

फळांमध्ये फायबरचे प्रमाण असते हे खरे असले तरी फळांमध्ये अधिक प्रमाणात चांगल्या कॅलरीज असतात. याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होत नाही. तर वजन वाढू इच्छिणाऱ्यांचे अगदी योग्य पद्धतीने वजन वाढण्यास मदत मिळते. कोणत्याही बेरी किंवा इतर फळांमध्ये असलेले व्हिटॅमिन्स तुमच्या शरीरासाठी वजनवाढीव्यतिरिक्तही चांगला परिणाम करतात. 

ADVERTISEMENT

वजन वाढविण्यासाठी दिवसातून कितीवेळा फळ खायला हवी?

फळ खाण्याची एक अशी वेळ ठरलेली नाही. पण तुम्ही नाश्ता झाल्यानंतर साधारण तासाभराने फळ खाण्यास काहीच हरकत नाही. साधारण संध्याकाळी तुम्हाला ज्यावेळी तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा होते. त्यावेळी तुम्ही फळ खा. उपाशी पोटी फळ खाण्याचा विचार करु नका. कारण अनेकांना उपाशी पोटी फळं खाल्यामुळेही त्रास होण्याची शक्यता असते. जर तुम्ही वजन वाढविण्यासाठी फळांचे सेवन करत असाल तर तुम्हाला फळ खाणेही खूप ठेवायला हवे. दिवसातून फळ किती खायला हवी यापेक्षा तुम्हाला ती किती खावी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

रात्री फळांचे सेवन केल्यामुळे जाड व्हायला होते का? 

फळांचे सेवन केल्याचे कोणतेही दुष्परिणाम नाही. तुम्ही फळांचे सेवन कधीही आणि कोणत्याही वेळी करु शकता. रात्री फळांचे सेवन करु नका हे सांगण्यामागे कारण हे आहे की, फळ पचायला अनेकदा जड असतात. त्यामुळे तुम्हाला झोपही पटकन येत नाही. झोपेचे आणि दिवसाचे गणित बिघडून जाते. त्यामुळे रात्री फळं खाऊ नका.

ADVERTISEMENT

आता जर तुम्ही वजन वाढविण्याचा विचार करत असाल तर  योग्य पद्धतीने वजन वाढविण्यासाठी या फळांचे सेवन अवश्य करा.

09 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT