ADVERTISEMENT
home / पालकत्व
बालदिनाच्या निमित्ताने आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करूया

बालदिनाच्या निमित्ताने आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करूया

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. लहान मुलांचे कौतुक करून, त्यांना भेटवस्तू देऊन आणि मुलांसाठी खास कार्यक्रम आयोजित करून हा दिवस साजरा केला जातो. या सगळ्या गोष्टीत तुम्ही विचार केला आहे का की, आपण आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित केले आहे का?

मुलं त्यांच्या पालकांसाठी जणू जग असतात. त्यामुळे प्रत्येक पालक आपल्या मुलास सर्वात चांगली गोष्ट देऊ इच्छितात. यानुसार प्रत्येक पालकाने हे सुनिश्चित केले आहे की, आपल्या मुलास उत्कृष्ट शिक्षण, योग्य आहार, चांगले कपडे आणि त्याने निरोगी रहावे. परंतु आपण कधी कल्पना केली आहे का की, हे देण्यासाठी जर तुम्हीच नसलात तर तुमच्या मुलाच्या भविष्याचं काय होईल?

मुलांचं शिक्षण

सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगलं शिक्षण. जे निश्चितच स्वस्त नाही. त्यामुळे आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला शिक्षण निधी जमा करावा लागेल. जो तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी उपयोगी पडेल. आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पैशांची आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही सहजपणे थोड्याफार प्रमाणात निधी नियमितपणे बाजूला ठेवू शकता. ज्यामुळे दहा ते पंधरा वर्षांत एक चांगला राखीव निधी जमा होईल. पण जर तुमचा अकाली मृत्यू झाला तर काय? हे नुसतं वाचायलाही किती कठोर वाटत ना. असं असलं तरीही तुम्हाला हे माहीतच असेल की,  मृत्यू ही अशी गोष्ट आहे जी अकस्मात होऊ शकते. म्हणूनच या अकस्मात संकटासाठी आपण तयार असणं आवश्यक आहे आणि एक निधी तयार करणं आवश्यक आहे आणि असा निधी जमा करणं आवश्यक आहे. ज्यामुळे आपण भविष्यात हयात नसलो तरी या राखीव निधीवर त्याचा परिणाम होणार नाही. यातूनच बाल विमा योजना दृष्टीक्षेपात येते.

बालदिन शुभेच्छा संदेश

ADVERTISEMENT

Shutterstock

बाल विमा योजना (चाईल्ड प्लॅन) म्हणजे काय ?

बाल विमा योजना (चाईल्ड प्लॅन) ही एक जीवन विमा योजना आहे. ज्याचा हेतू आपल्या जिवंतपणी किंवा आपल्या पश्च्यात आपल्या मुलासाठी एक राखीव निधी तयार करणे हा आहे. या पॉलिसीमध्ये इनबिल्ट प्रीमियम माफी राईडर असतो जो पॉलिसीच्या कालावधीत जर पालकांचा मृत्यू झाल्यास पुढील प्रीमियमही माफ करतो. विम्याचे पुढचे प्रीमियम विमा कंपनीकडूनच दिले जातात आणि जेव्हा योजना पूर्ण होते तेव्हा वचन दिलेला मॅच्युरिटी लाभ दिला जातो. हा लाभ आपल्या अनुपस्थितीत आपल्या मुलाच्या आर्थिक गरजांसाठी वित्तपुरवठा करतो.

बाल विमा योजना (चाईल्ड प्लॅन) का विकत घ्यावी?

बाल विमा योजनाही इतर गुंतवणूकी पद्धतींपेक्षा चांगला पर्याय आहे कारण या योजनेत आपण हयात नसताना सुद्धा हा राखीव निधी जमा होतो. जरी योजनेच्या कालावधीत पालकांचा मृत्यू झाला आणि प्रीमियम भरणे शक्य नसले तरीही विमा कंपनीद्वारे प्रीमियमचे योगदान दिले जाते. त्यामुळे पॉलिसी चालूच राहते. पालकांच्या मृत्यूचा राखीव निधीवर काही परिणाम होत नाही. म्हणूनच, जर आपण आपल्या मुलासाठी बाल विमा योजना विकत घेत असाल तर आपल्याला आपल्या अनुपस्थितीत आपल्या मुलाच्या आर्थिक गरजेची चिंता करण्याची गरज नाही. बाल विमा योजना या स्थितीतही संरक्षण देते.

ADVERTISEMENT

Shutterstock

मुलांचे आरोग्यही आहे महत्त्वाचे

बाल विमा योजनाने आपण आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करता तेव्हा आपल्या मुलाच्या आर्थिक ध्येयाची काळजी घेते. पण तुमची जबाबदारी इथेच संपत नाही. शिक्षणानंतर गरजेची दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य. ज्यासाठी आपल्या मुलाच्या वैद्यकीय खर्चासाठी आपल्याला योजनेची आवश्यकता असते. ज्या संदर्भात कौटुंबिक आरोग्य विमा योजना कामी येते. आपल्या मुलं आजारी पडल्यास किंवा त्याला दुखापत झाल्यास आणि वैद्यकीय लक्ष देण्याची गरज असल्यास येणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा समावेश या योजनेत असतो. औषधाचा वाढता खर्च पाहता, तुम्हाला आरोग्य विमा योजनेची आवश्यकता आहे ज्यामध्ये तुमच्या मुलाचा समावेश असेल जेणेकरून आपल्या मुलास रुग्णालयात दाखल करतांना आपण दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवू शकाल.

बाल विमा योजना आणि कौटुंबिक विमा योजना या आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी दोन आवश्यक बाबी आहेत. बाल विमा योजना आपल्या मुलाच्या भविष्यासाठी एक सुरक्षित राखीव निधी तयार करतो आणि कौटुंबिक विमा योजना हे सुनिश्चित करते की, आपात्कालीन परिस्थितीत आपल्या मुलास आवश्यक त्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होतील.

ADVERTISEMENT

लेखक श्री धीरेंद्र मह्यावंशी हे टर्टलमिंटचे सह संस्थापक आहेत.

हेही वाचा –

लहान मुलांना वाचनाची गोडी कशी लावाल

लहानपणीचा हा खाऊ तुमच्या आठवणी करेल ताज्या

ADVERTISEMENT

तुमच्या मुलालाही आहे का मोबाईल बघत जेवण्याची सवय

13 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT