ADVERTISEMENT
home / Make Up Products
लिपस्टिकचा रंग निवडताना करा या गोष्टींचा विचार

लिपस्टिकचा रंग निवडताना करा या गोष्टींचा विचार

 

मेकअपचा लुक पूर्ण करण्याचे काम लिपस्टिक करत असते. पण तुम्ही कोणत्या ब्रँडची लिपस्टिक लावता यापेक्षाही महत्वाचे आहे ते म्हणजे तुम्ही कोणत्या रंगाची लिपस्टिक लावत आहात ते महत्वाचे असते. तुमच्याकडे असलेल्या लिपस्टीक तुम्ही कोणत्या कार्यक्रमांसाठी वापरता तुमचा वयोगट काय ? या सगळ्याचा विचार करुन आम्ही तुम्हाला लिपस्टिकच्या रंगासंदर्भातील काही टीप्स देणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सगळ्या लिपस्टिकचे रंग काढून ठेवा.

तुमच्या कामाच्या स्वरुपानुसार निवडा तुमच्यासाठी बेस्ट लिपस्टिक शेड

लाल रंग

Instagram

ADVERTISEMENT

 

सगळ्यांकडे अगदी आवर्जून असलेला रंग म्हणजे लाल. लाल या रंगाच्या कित्येक वेगळ्या शेड प्रत्येकाकाडे असतात.जर तुमच्याकडे लाल भडक रंग असेल तो तुम्हाला चांगला दिसत असेल. तुम्ही रोज त्याचा वापर करत असाल तर हा रंग तुमची पर्सनॅलिटी जितकी खुलवू शकतो तितकीच वाईटही करु शकतो. कारण हा शेड फारच भडक असल्यामुळे त्याचा वापर रोज ऑफिससाठी किंवा मिटींगसाठी करु नका. एखाद्या पार्टीसाठी हा रंग राखून ठेवा. 

गोड गुलाबी

Instagram

आता खूप जणांना नेलपेंट किंवा लिपस्टिकच्या शेडमध्ये गोड गुलाबी रंग आवडतो. पण सगळ्याच वयोगटात गोड गुलाबी रंग चांगला दिसत नाही. अनेकदा हा रंग तुम्ही लहान असल्याचे इंप्रेशन देतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही फॉर्मल मिटींग किंवा कामाच्या ठिकाणी वापरु नका. कारण हा रंग तुम्ही अल्लड असल्याचे दाखवतो. तुम्ही कॉलेज गोईंग असाल तर तुम्हाला हा रंग वापरायला हरकत नाही. पण तुम्ही 25 च्या पुढे असाल तर याचा वापर करु नका.

ADVERTISEMENT

फाऊंडेशन आधी चेहऱ्याला प्राईमर लावणे म्हणून असते आवश्यक

मरुन रंग किंवा मर्जेंटा

Instagram

तुमचा रंग कोणताही असो हा रंग तुमच्यावर खुलून दिसतोच. हा रंग तुम्हाला अगदी कधीही लावता येतो. आता हा रंग लावताना तुम्हाला खूप गडद लावायचा नाही. कारण तुम्ही हा जितका गडद कराल तितके तुम्ही यामध्ये बोल्ड दिसाल.त्यामुळे अगदी एक स्ट्रोक या रंगामध्ये चांगला दिसू शकतो. हा रंग तुम्ही कुठेही लावू शकता. किंवा कोणत्याही समारंभासाठी हा रंग चालू शकतो. यातील गडद रंग तुम्ही पार्टीसाठी वापरु शकता.

ADVERTISEMENT

न्यूड शेड

Instagram

 

सध्या न्यूड लिपस्टीक शेड्सची फारच चलती आहे. हे रंगसुद्धा तुम्हाला कधीही लावता येतात. तुम्हाला यामध्ये भगवा,पिंक, चॉकलेटी असे काही शेड मिळतात. ते तुम्हाला टांगले दिसतात. त्यामुळे तुम्ही हा रंग कोणत्याही प्रसंगी लावू शकता.

वाचा : लिपस्टिक लावण्याची पद्धत

ADVERTISEMENT

चॉकलेटी

Instagram

अनेकांना चॉकलेटी रंग अजिबात आवडत नाही. त्यांना हा रंग त्यांची पर्सनॅलिटी खराब करतो असे वाटते. पण हा रंग जर तुम्ही डार्क निवडण्यापेक्षा थोडा लाईट आणि फ्रेश असा निवडला तर तो तुम्हाला अधिक चांगला दिसू शकेल. पण तुम्हाला ब्राऊनमधील उत्तम शेड निवडता आली पाहिजे. तरच ती तुम्हाला चांगली दिसेल. 

केशरीचे काही शेड्स

ADVERTISEMENT

Instagram

आता केशलरी रंग ऐकून तुम्ही घाबरुन जाऊ नका. किंवा तोंड वाकडे करु नका. केशरी रंगामधील काही शेड्स या चांगल्या असतात. त्या तुम्हाला अगदी रोड लावता येतील. म्हणजे तुम्ही ऑफिस किंवा इतर ठिकाणी तुम्ही या वापरु शकता. पंजाबी ड्रेस किंवा ऑफिसवेअर कशावरही तुम्हाला ही लिपस्टिक लावता येईल.

आता तुमच्याकडे लिपस्टिकच्या कितीही शेड असल्या तरी तुम्हाला त्या तुमच्यासाठी योग्य आहेत का नाही ते माहीत असणेही गरजेचे आहे. 

Also Read How To Do Makeup At Home In Marathi

ADVERTISEMENT

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

01 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT